एक्स्प्लोर

लूक खतरनाक, पॉवर ही जबरदस्त! Royal Enfield Super Meteor 650 चा टीझर रिलीज, जाणून घ्या कधी लॉन्च होणार

Royal Enfield Super Meteor 650: दुचाकी उत्पादक कंपनी रॉयल एनफील्डच्या बाईक भारतात खूप पसंत केल्या जातात. कंपनीच्या बाईकची विक्रीही भारतात मोठ्या प्रमाणात होते. अशातच कंपनीने आपल्या नवीन Royal Enfield Super Meteor 650 चा टीझर रिलीज केला आहे.

Royal Enfield Super Meteor 650: दुचाकी उत्पादक कंपनी रॉयल एनफील्डच्या बाईक भारतात खूप पसंत केल्या जातात. कंपनीच्या बाईकची विक्रीही भारतात मोठ्या प्रमाणात होते. अशातच कंपनीने आपल्या नवीन Royal Enfield Super Meteor 650 चा टीझर रिलीज केला आहे. कंपनी आपल्या नवीन बाईकचे अनावर 8 नोव्हेंबर रोजी मिलान (इटली) येथे होणाऱ्या EICMA 2022 मोटर शोमध्ये करणार आहे. कंपनी आपल्या या नवीन बाईकचे नाव अद्याप जाहीर केलं नाही. मात्र याचे नाव 'Super Meteor 650' असेल अशी शक्यता वर्तवली जात आहे. याची डिझाइन सध्याच्या Meteor 350 सारखी असण्याची शक्यता आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत लॉन्च केल्यानंतर ही बाईक भारतात लॉन्च केली जाऊ शकते. कंपनी  2023 च्या सुरुवातीस याची देशात विक्री सुरु करू शकते.

नवीन Super Meteor 650 त्याच 650cc प्लॅटफॉर्मवर आधारित असेल जी कंपनी सध्या इंटरसेप्टर INT 650 आणि Continental GT 650 सारख्या मॉडेल्समध्ये वापरण्यात आले आहे. याचे इंजिन आणि ट्रान्समिशनमध्ये जास्त बदल किंवा कोणतेही मोठे अपडेट होण्याची शक्यता कमी आहे. Super Meteor 650 ही एक क्रूझर बाईक आहे. यात 648 cc, इन-लाइन ट्विन-सिलेंडर, एअर-कूल्ड इंजिन दिले जाऊ शकते. जे 47 Bhp पॉवर आणि 52 Nm पीक टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे. यामध्ये गिअरबॉक्स 6-स्पीड युनिट आहे. तसेच स्लिप आणि असिस्ट क्लच उपलब्ध असेल. 

बाईकवरील चेसिस नवीन आवश्यकतांनुसार अपडेट केले जाण्याची शक्यता आहे. Super Meteor 650 मध्ये LED लाइट्स, सेमी-डिजिटल मीटर क्लस्टर, ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी, डिस्क ब्रेक्स, स्लिप आणि असिस्ट क्लच, ड्युअल-चॅनल ABS आणि ट्रिपर टर्न-बाय-टर्न नेव्हिगेशन सिस्टम यासारखे फीचर्स दिले जाऊ शकतात. टीझरमध्ये बाईकचा फक्त मागील भाग दिसत आहे. यात Meteor 350 प्रमाणे LED टेल लॅम्प युनिट मिळते. यात ट्विन एक्झॉस्ट आणि स्प्लिट सीट आहेत. याच्या पुढे इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आहे. जो Meteor 350 आणि Scrum 411 मध्ये देखील आढळतो. टीझरमध्ये ट्रिपर नेव्हिगेशन सिस्टम देखील दिसत आहे. दरम्यान, Royal Enfield Super Meteor 650 2022 बाईक भारतात याच महिन्यात लॉन्च केली जाऊ शकते. मात्र कंपनीने याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती जाहीर केलेली नाही. याबाईक बद्दल अद्याप तपशीलवार माहिती उपलब्ध झालेली नाही.

इतर महत्वाची बातमी: 

Maruti Suzuki Cars: मारुतीने 40 वर्षात केलं 2.5 कोटी कारचे उत्पादन, जाणून घ्या कंपनीच्या यशाचे रहस्य

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Virat Kohli & Rohit Sharma : किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
Mumbai News : पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
IND vs SL : टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
Sujata Saunik : सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

MLC Election : विधानपरिषदेसाठी राष्ट्रवादीच्या उमेदवारांची नावं उद्या जाहीर होणार?Ajit Pawar NCP Special Report : पिंपरीत दादांना काकांचा धक्का? 16 नगरसेवक शरद पवारांच्या संपर्कातSpecial Report Beed Crime : बीडचा गोळीबार, राजकीय वॉर? परळीत संरपंच बापू आंधळेंची हत्याSpecial Report Maharashtra Firing | महाराष्ट्र आहे की बंदुकराष्ट्र? राज्यात गोळीबाराच्या घटना वाढल्या

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Virat Kohli & Rohit Sharma : किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
Mumbai News : पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
IND vs SL : टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
Sujata Saunik : सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
धक्कादायक! पोलीस भरतीचं स्वप्न अधुरं, चाचणीदरम्यान 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू तर एकाची प्रकृती चिंताजनक
धक्कादायक! पोलीस भरतीचं स्वप्न अधुरं, चाचणीदरम्यान 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू तर एकाची प्रकृती चिंताजनक
सुप्रिया सुळेंचे वडील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांनी अशा पद्धतीनं बोलणं शोभत नाही; रावसाहेब दानवेंचा टोला
सुप्रिया सुळेंचे वडील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांनी अशा पद्धतीनं बोलणं शोभत नाही; रावसाहेब दानवेंचा टोला
विश्वचषक जिंकल्यानंतर हार्दिक पांड्याने ट्रोलर्सना सुनावलं, जी लोकं मला 1 टक्काही ओळखत नाहीत त्यांनी...
विश्वचषक जिंकल्यानंतर हार्दिक पांड्याने ट्रोलर्सना सुनावलं, जी लोकं मला 1 टक्काही ओळखत नाहीत त्यांनी...
Rohit Sharma : टी20 क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचं मनात नव्हतं, परिस्थितीमुळं निर्णय घेतला, रोहित शर्मा असं का म्हणाला?
टी 20 क्रिकेट मधून निवृत्तीचा विचार नव्हता, परिस्थितीच तशी आली अन् निर्णय घेतला : रोहित शर्मा
Embed widget