Narendra Modi's Car: जगातील सर्वात सुरक्षित कारने प्रवास करतात पंतप्रधान मोदी, इतकी आहे किंमत
Car of Indian Prime Minister: आज स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त संपूर्ण देश अमृत महोत्सव साजरा करत आहे.
Car of Indian Prime Minister: आज स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त संपूर्ण देश अमृत महोत्सव साजरा करत आहे. यानिमित्ताने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी 15 ऑगस्टला सकाळी लाल किल्ल्यावर तिरंगा फडकवण्यासाठी बाहेर पडले, तेव्हा संपूर्ण जगाचे लक्ष त्यांच्याकडे होते. यावेळी त्यांनी रेंज रोव्हर सेंटिनेल कारमधून आपल्या निवासस्थानापासून लाल किल्ल्यापर्यंत प्रवास केला. जगातील सर्वात सुरक्षित कारमध्ये याची गणना केली जाते. चला तर जाणून घेऊ या कारची किंमत आणि काय खास आहे कारमध्ये.
Range Rover Sentinel लहान असो वा मोठ्या कोणत्याही प्रकारच्या हल्ल्याला अगदी आरामात तोंड देऊ शकते. या गुणवत्तेमुळे ती जगातील सर्वात सुरक्षित कार मानली जाते. या गाडीवर कोणताही बॉम्ब किंवा गोळीबार केल्यास त्याचा काही परिणाम होत नाहो. IED स्फोटानेही या पंतप्रधानांच्या गाडीचे कोणतेही नुकसान होऊ शकत नाही.
हल्ल्यात टायरला नुकसान पोहोचल्यानंतरही पंतप्रधान मोदींची ही कार 100 किलोमीटरपर्यंत आरामात धावू शकते. पाणी, चिखल आणि खडतर रस्तेही या गाडीसाठी अडथळा ठरू शकत नाहीत. या कारचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्यावर कोणत्याही जैविक हल्ल्याचा कोणताही परिणाम होत नाही, म्हणजेच हे वाहन गॅस आणि रासायनिक हल्ल्यांनाही आळा घालण्यास सक्षम आहे. एकूणच या कारमध्ये बसलेल्या व्यक्तीला कोणत्याही हल्ल्यापासून सुरक्षित ठेवणे शक्य आहे.
इंजिन
या कारमध्ये जगातील सर्वात शक्तिशाली इंजिन आहे.Range Rover Sentinel मध्ये जग्वार सोर्स केलेले 5.0-लिटर, सुपरचार्ज केलेले V8 इंजिन आहे. हे शक्तिशाली इंजिन 375 bhp ची पॉवर आणि 508 Nm टॉर्क जनरेट करू शकते.
किती आहे किंमत?
मिळालेल्या माहितीनुसार, पंतप्रधान मोदींच्या या रेंज रोव्हर सेंटिनेलची किंमत 10 ते 15 कोटी रुपये आहे. पंतप्रधानांची सुरक्षा आणि आवडीनिवडी लक्षात घेऊन ही कार डिझाइन करण्यात आली आहे.
महत्वाच्या बातम्या :
- OLA Electric Car : स्वातंत्र्यदिनी Ola चा दुहेरी धमाका, सर्वात वेगवान इलेक्ट्रिक कार भारतात लॉन्च; 4 सेकंदात 100 किमीचा वेग गाठणार
- Ola Electric Car: OLA ची पहिली इलेक्ट्रिक कार उद्या होणार लॉन्च, किती असेल रेंज?
- Hyundai Tucson review: लक्झरियस आणि ADAS सारखे आधुनिक फीचर्स, जाणून घ्या कशी आहे नवीन Hyundai Tucson