Ola Electric Scooter: आता ओला ई-स्कूटर होणार आणखी हायटेक, लवकरच मिळणार MoveOS3 अपडेट
Ola Electric Scooter Moveos 3 Update: इलेक्ट्रिक स्कूटर सेगमेंटमध्ये आपला दबदबा निर्माण करणारी कंपनी ओला इलेक्ट्रिक (Ola Electric) पुढील आठवड्यापासून आपल्या इलेक्ट्रिक स्कूटरसाठी MoveOS 3 अपडेट आणणार आहे.
Ola Electric Scooter Moveos 3 Update: इलेक्ट्रिक स्कूटर सेगमेंटमध्ये आपला दबदबा निर्माण करणारी कंपनी ओला इलेक्ट्रिक (Ola Electric) पुढील आठवड्यापासून आपल्या इलेक्ट्रिक स्कूटरसाठी MoveOS 3 अपडेट आणणार आहे. MoveOS 3 चे अपडेट Ola S1 आणि S1 Pro इलेक्ट्रिक स्कूटरसाठी असेल. नवीन ऑपरेटिंग सिस्टम अपडेटच्या माध्यमातून कंपनी आपल्या स्कूटरच्या परफॉर्मन्स आणि फीचर्समध्ये मोठे अपडेट देणार आहे. कंपनीने अलीकडेच MoveOS 3 ची बीटा आवृत्ती जारी केली आहे, जी निवडक ग्राहकांसाठी उपलब्ध होती. आता हे अपडेट सर्व S1 आणि S1 Pro इलेक्ट्रिक स्कूटरसाठी उपलब्ध असेल.
Ola Electric Scooter Moveos 3 Update: कोणते मिळणार नवीन फीचर्स
MoveOS 3 अपडेट कॉल आणि मेसेज अॅलर्ट, Advanced regeneration mode, मूड प्रोफाइल, पार्टी मोड आणि हायपरचार्जिंग यांसारखी नवीन फीचर्स मिळणार आहेत. याशिवाय हिल होल्ड असिस्ट, विजेट, डॉक्युमेंट स्टोरेज, व्हेकेशन मोड, हॅझार्ड लाइट आणि राइड रिपोर्ट यांसारखे नवीन फीचर्सही उपलब्ध असतील. हायपरचार्जिंगच्या अपडेटनंतर ओला स्कूटर (Ola Electric) आता फक्त 15 मिनिटांत 50 किलोमीटरपर्यंत चालवण्यासाठी कंपनीच्या हायपरचार्जिंग नेटवर्कवर चार्ज केल्या जाऊ शकतात. कंपनी सध्या देशातील विविध शहरांमध्ये 50 हायपरचार्जर स्टेशन चालवते.
Ola Electric Scooter Moveos 3 Update: स्पोर्ट्स मोड आणि हायपर मोडमध्ये स्कूटरचा वेग वाढणार
कंपनीने प्रॉक्सिमिटी अनलॉक देखील अपडेट केले आहे. जे अॅप न उघडता किंवा पासकोड प्रविष्ट न करता स्कूटरला लॉक किंवा अनलॉक करण्यास परवानगी देते. MoveOS 3 ला पार्टी मोडचे अपडेट देखील मिळते, ज्यामुळे आता गाण्यांचा आनंद घेणे आणखी मजेदार होईल. पार्टी मोडमध्ये, स्कूटरचे हेडलाईट आणि टर्न इंडिकेटर म्युझिक फास्ट फ्लॅश होतात. नवीन अपडेटमध्ये स्कूटरमधून बाहेर पडणाऱ्या आवाजाकडेही लक्ष देण्यात आले आहे. आता ओला स्कूटर हलवताना मोडनुसार वेगवेगळे आवाज काढेल. नवीन अपडेटमुळे स्पोर्ट्स मोड आणि हायपर मोडमध्ये स्कूटरचा वेग वाढला आहे, असा कंपनीने (Ola Electric) दावा केला आहे. Ola MoveOS 3 OTA अपडेटद्वारे रिलीज केला जाईल.
इतर ऑटो सेगमेंट संबंधित बातमी: