Car Tyre: नायट्रोजन गॅस गाडीच्या टायरसाठी चांगला; नॉर्मल हवेमुळे चाकांना पोहोचतं नुकसान, कसं? जाणून घ्या
Car Tyre: नायट्रोजनच्या तुलनेत साधारण हवा टायरमध्ये कमी वेळ टिकते आणि ती फार लवकर कमी होते, त्यामुळे वारंवार रिफिलिंगची आवश्यकता भासते.
Nitrogen Gas Vs Normal Air: संपूर्ण देशात हवामान बदलत आहे आणि हळूहळू थंडी (Winter) वाढू लागल्याने लोकांना उष्णतेपासून दिलासा मिळत आहे. अशात, बदलत्या हवामानात स्वत:सोबत वाहनाची काळजी (Car Care) घेणं देखील गरजेचं आहे. हवामानातील बदलामुळे वाहनाच्या इंजिनपासून (Engine) ते टायरपर्यंत (Tyre) सर्वच गोष्टींवर परिणाम होतो, त्यामुळे टायर फुटण्याची शक्यताही वाढते. अशा परिस्थितीत, आपल्या कारची काळजी घेणं आपल्यासाठी महत्त्वाचं आहे.
गाडीच्या टायर्सची देखभाल कशी करावी?
बदलत्या हवामानात टायरची काळजी घेण्यासाठी त्यात भरलेल्या हवेची सर्वात आधी काळजी घेतली पाहिजे. तुम्ही तुमच्या कारच्या टायरमध्ये कोणत्या प्रकारची हवा भरता, यावर टायरचं आयुष्य अवलंबून असतं. बरेच लोक त्यांच्या कारच्या टायरमध्ये नॉर्मल हवा भरतात, जी कारच्या टायरसाठी चांगली नसते. कारच्या टायरमध्ये नायट्रोजन हवा भरणं योग्य मानलं जातं. असं मानलं जातं की, गाड्यांचे टायर सुरक्षित ठेवण्यासाठी त्यात नायट्रोजन गॅस भरणं उत्तम आहे.
नायट्रोजन गॅसचे फायदे काय?
नायट्रोजन टायरवर जास्त दाब पडू देत नाही, ज्यामुळे टायरला दीर्घायुष्य मिळण्यास मदत होते. याशिवाय गाडीला मायलेजही चांगला मिळतो आणि त्यामुळे गाडीवर कंट्रोलही चांगला मिळतो.
नायट्रोजनच्या वापरामुळे कोणाला फायदा होतो?
नायट्रोजन वायूचा वापर केल्याने हवेतील ऑक्सिजन पातळ होतो. यासह, ते ऑक्सिजनमध्ये उपस्थित पाण्याचं प्रमाण देखील काढून टाकते, यामुळे टायरच्या रिम्सला गंजण्यापासून प्रतिबंध होतो आणि आर्द्रता देखील दूर होते.
नायट्रोजन साधारण हवेपेक्षा चांगला आहे का?
नॉर्मल हवा नायट्रोजनपेक्षा टायरमध्ये कमी वेळ टिकते आणि ती वारंवार कमी होत राहते, त्यामुळे वारंवार रिफिलिंगची आवश्यकता असते. त्यामुळे नायट्रोजन वायूचा वापर फॉर्म्युला वन रेसिंग कारमध्येही केला जातो. सामान्य हवेतही आर्द्रता असते, त्यामुळे टायर लवकर खराब होतात. याशिवाय, यामुळे रिम किंवा मिश्रधातूच्या चाकांना देखील नुकसान होतं.
तज्ज्ञांच्या मते, सामान्य हवेच्या तुलनेत नायट्रोजन भरल्याने अनेक फायदे आहेत. नायट्रोजन वायू गाडीत पुन्हा पुन्हा टाकल्याने हवा कमी-जास्त होण्याची समस्याही दूर होते. टायर हे रबराचे बनलेले असतात, त्यामुळे ते कमी पसरतात आणि टायरमधील दाब जास्त नसतो, परंतु सामान्य हवा उन्हाळ्यात पसरते आणि हिवाळ्यात आकुंचन पावते, ज्यामुळे वारंवार वायुप्रवाह होतो.
हेही वाचा:
Car Insurance Claim : गाडीचा अपघात झाल्यानंतर इन्शुरन्स क्लेम झटपट कसा मिळवाल? जाणून घ्या