Odysse Vehicles: ई2गो इलेक्ट्रिक स्कूटरचं ग्रॅफिन व्हेरिएंट लाँच; किंमत फक्त...
New Scooter Launch: ओडीसी इलेक्ट्रिक वेईकल्सकडून ई2गो इलेक्ट्रिक स्कूटरचं ग्रॅफिन व्हेरिएंट लाँच करण्यात आलं आहे, ज्याची एक्स-शोरुम किंमत फार कमी आहे.
E2Go Graphene Variant: भारतीय बाजारात इलेक्ट्रिक गाड्यांची मागणी वाढत आहे. मागणी लक्षात घेत वाहन उत्पादक कंपन्या इलेक्ट्रिक गाड्यांचे (EV) नवनवीन मॉडेल्स लाँच करत असतात. यातच आता ओडीसी इलेक्ट्रिक व्हेईकल्स (Odysse Electric Vehicles) या भारतातील झपाट्याने विकसित होत असलेल्या प्रिमिअम इलेक्ट्रिक व्हेईकल उत्पादक कंपनीने नवीन स्कूटर व्हेरिएंट लाँच केलं आहे. कंपनीने ई2गो इलेक्ट्रिक स्कूटरचं (E2Go Electric Scooter) ग्रॅफिन व्हेरिएंट लाँच करुन नवीन बेंचमार्क स्थापित केला आहे. स्वदेशी उत्पादित करण्यात आलेली ग्रॅफिन ई2गो 63,650 रूपयांच्या किंमतीत (एक्स-शोरूम अहमदाबाद) उपलब्ध होणार आहे.
स्कूटरमध्ये काय खास?
ओडीसीची ई2गो ग्रॅफिन इलेक्ट्रिक स्कूटर प्रतिचार्ज 100 किमीची प्रभावी रेंज, कीलेस इलेक्ट्रिक स्टार्ट सिस्टम आणि वाहन परवाना आणि नोंदणीशिवाय ड्रायव्हिंग करण्याच्या सोयीसुविधा देते. ई2गो ग्रॅफिन अद्वितीय प्रवास गरजांसह रायडर्सच्या रेंजसंदर्भातील गरजांची पूर्तता करण्यासाठी डिझाईन करण्यात आली आहे. इकोनॉमिक सुसंगता आणि वैविध्यपूर्ण रेंजसह ई2गो आनंददायी रायडिंग अनुभव देते.
प्रत्येक रायडरच्या स्टाईलला जुळून जाण्यासाठी ही स्कूटर मॅट ब्लॅक, कॉम्बॅट रेड, स्कार्लेट रेड, टील ग्रीन, अझुरे ब्ल्यू आणि कॉम्बॅट ब्ल्यू या आकर्षक रंगांमध्ये उपलब्ध आहे.
आकर्षक वैशिष्ट्यांनी सुसज्ज
ई2गोची नवीन लाँच करण्यात आलेली ग्रॅफिन बॅटरी आरामदायी आणि विश्वासार्ह प्रवासाची खात्री देते. ही बॅटरी 8 तासांमध्ये संपूर्ण चार्ज होते. इतर वैशिष्ट्यं जसे यूएसबी चार्जिंग, अँटी-थेफ्ट लॉक आणि कीलेस एण्ट्री, डिजिटल स्पीडोमीटर या स्कूटरला सर्वसमावेशक आणि युजर-फ्रेंडली बनवतात. आपला दर्जा कायम राखत ओडीसी इलेक्ट्रिक व्हेईकल्स स्कूटरवर व्यापक तीन-वर्षांची वॉरंटी देत आहे.
काय म्हणाले कंपनीचे अधिकारी?
याप्रसंगी आपलं मत व्यक्त करताना ओडीसी इलेक्ट्रिक वेईकल्स प्रा. लि.चे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. नेमिन वोरा म्हणाले, "ई2गो साठी ग्रॅफिन व्हेरिएंटमधून इलेक्ट्रिक मोबिलिटी क्षेत्रातील नाविन्यता, दर्जा आणि किफायतशीरपणाबाबत आमची कटिबद्धता दिसून येते. आमचा भारतीय रायडर्सना डायनॅमिक मोडसह सक्षम करण्यावर विश्वास आहे, जे स्टाईल किंवा कार्यक्षमतेसंदर्भात तडजोड करत नाही आणि ही स्कूटर किफायतशीर दरामध्ये उपलब्ध आहे."
हे उत्पादन आता ऑर्डरसाठी फ्लिपकार्टवर आणि कंपनीच्या अधिकृत डिलर्सकडे उपलब्ध आहे. ग्रॅफिन व्हेरिएंटच्या सादरीकरणामधून ओडीसी इलेक्ट्रिक वेईकल्सची भारतीय ग्राहकांना नाविन्यपूर्ण, विश्वसनीय आणि किफायतशीर इलेक्ट्रिक मोबिलिटी सोल्यूशन्स प्रदान करण्याप्रती कटिबद्धता अधिक दृढ होते.
ओडीसी इलेक्ट्रिक व्हेईकल्स प्रा. लि. बाबत
मुंबई स्थित इलेक्ट्रिक व्हेईकल स्टार्ट-अप ओडीसी वोरा ग्रुप ऑफ कंपनीजचा भाग आहे. कंपनीच्या इलेक्ट्रिक स्कूटर्स आणि बाईक्स तरूणांपासून वृद्धांपर्यंत, फॅशनेबल खरेदीदार आणि आरामदायीपणाचा शोध घेणाऱ्यांपासून व्यस्त व्यावसायिक रायडर्सपर्यंत सर्वांसाठी उपलब्ध आहेत. प्रत्येक उत्पादन प्रखर टिकाऊपणा आणि विश्वसार्हता चाचण्यांचे पालन करते. ओडीसी प्रत्येक ग्राहकाला किफायतशीर दरामध्ये दर्जा, आरामदायीपणा आणि स्टाईलचे सर्वसमावेशक पॅकेज देते.
सध्या ब्रँड उत्पादन पोर्टफोलिओमध्ये पुढील उत्पादनांचा समावेश आहे
- इलेक्ट्रिक मोटरसायकल वेडर (7 इंच अँड्रॉईड डिस्प्ले, आयओटी, चार ड्राइव्ह मोड्स, 18-लीटर्स स्टोरेज जागा, गुगल मॅप नेव्हिगेशन)
- इलेक्ट्रिक बाइक ईव्होकिस (चार ड्राइव्ह मोड्स, कीलेस एण्ट्री, अँटी-थेफ्ट लॉक आणि मोटर कट-ऑफ स्विच)
- इलेक्ट्रिक स्कूटर हॉक (क्रूझ कंट्रोल व म्युझिक सिस्टम असलेली भारतातील पहिली इलेक्ट्रिक स्कूटर)
- ई2गो, ई2गो+, ई2गो प्रो व ई2गो ग्रॅफिन (पोर्टेबल बॅटरी, यूएसबी चार्जिंग, डिजिटल स्पीडोमीटर आणि कीलेस एण्ट्री असलेली इलेक्ट्रिक स्कूटर)
- इलेक्ट्रिक स्कूटर व्ही2 आणि व्ही2+ (वॉटरप्रूफ मोटर, व्यापक बूट स्पेस, ड्युअल बॅटरी आणि एलईडी लाइट्स)
- लास्ट-माइल डिलिव्हरीसाठी इलेक्ट्रिक स्कूटर ट्रॉट (250 किग्रॅची लोडिंग क्षमता आणि आयओटी)
हेही वाचा: