(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Yamaha RD350 चालवताना दिसला धोनी, जुने मॉडेल केले रिस्टोअर
Yamaha RD350: जर तुम्हाला क्रिकेट आणि कारचे शौकीन असाल, तर तुम्हाला भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या महागड्या कार आणि बाईकच्या कलेक्शनची माहिती असेलच.
Yamaha RD350: जर तुम्हाला क्रिकेट आणि कारचे शौकीन असाल, तर तुम्हाला भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या महागड्या कार आणि बाईकच्या कलेक्शनची माहिती असेलच. धोनीकडे सर्व प्रकारच्या जुन्या आणि आधुनिक बाईक आहेत. पण त्याला Yamaha RD 350 ची विशेष आवड आहे. या वर्षाच्या सुरुवातीला त्याने त्याच्या कलेक्शनमध्ये Yamaha RD350 LC चा समावेश केला आहे. आता हीच बाईक चालवताना त्याचा एक व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ त्याच्या घराबाहेरचा असल्याचं बोललं जात आहे.
या व्हिडीओत धोनी त्याच्या बाईकवर घरी जाताना दिसत आहे. तर त्याचे चाहते त्याची एक झलक पाहण्यासाठी बाहेर थांबले आहेत. माही जी बाईक चालवत आहे ती चंदीगड येथील ब्लू स्मोक कस्टम्सची रिस्टोअर केलेली Yamaha RD350LC आहे. Yamaha RD350LC अद्याप भारतात अधिकृतपणे लॉन्च करण्यात आलेली नाही. काही लोकांनी ही बाईक भारतीय बाजारपेठेत आयात केलीआहे. या बाईकमध्ये 347cc पॅरलल ट्विन टू-स्ट्रोक इंजिन आहे, जे लिक्विड-कूलिंग (LC) आहे.
धोनीने खरेदी केलेल्या RD 350 LC ला काळ्या आणि पिवळ्या रंगाच्या मिश्रणाची सानुकूल लिव्हरी मिळते. Yamaha RD350 LC ला लेक्ट्रॉन कार्बोरेटर, मोटो त्सिनारीद्वारे VForce 4 रीड व्हॉल्व्ह सिस्टम, Uni Air फिल्टर, Geltronic प्रोग्रामेबल CDI, NGK स्पार्क प्लग, JL ट्विन एक्झॉस्ट, Metmachex अॅल्युमिनियम स्विंगआर्म आणि LMC सिलिकॉन कूलंट रेडिएटर मिळतात.
दरम्यान, Yamaha RD350LC च्या डिझाइनमध्ये फारसा बदल करण्यात आलेला नाही. गोल हेडलॅम्प आणि टर्न इंडिकेटर, आयताकृती टेल लॅम्प आणि ब्लॅक -थीम असलेले इंजिन आणि रीअरव्ह्यू मिररसह बाईकमुळे ही बाईक आपल्या मूळ मॉडेल प्रमाणेच दिसते.
स्टॅंडर्ड Yamaha RD350 च्या तुलनेत, RD350 LC वेगळ्या दिसणार्या इंधन टाकीसह स्पोर्टी सीट, टेल लॅम्पच्या मागे स्लोपिंग रीअर आणि रियर टेल सेक्शनसह दिसते. बाईक दोन-स्ट्रोक, parallel-twin, 347 सीसी इंजिनद्वारे समर्थित आहे. जे जास्तीत जास्त 49 bhp पॉवर जनरेट करते. याच्या Yamaha RD350S आणि RX100S च्या कलेक्शन शिवाय धोनीकडे हार्ले डेव्हिडसन फॅट बॉय, कावासाकी निन्जा H2 आणि अल्ट्रा-एक्सक्लुझिव्ह कॉन्फेडरेट X132 हेलकॅट यासह आधुनिक बाईक देखील आहेत.
महत्वाच्या बातम्या :
Diwali 2022: दिवाळीआधी टीव्हीएस करणार धमाका, नवीन अपडेटसह येत आहे TVS Raider 125