Used Cars : घरी आणा Maruti Suzuki Swift फक्त 75 हजारांत, 'इथे' स्वस्तात विकल्या जातात कार
Maruti Suzuki Used Cars : मारुती सुझुकी ट्रू व्हॅल्यूच्या वेबसाईटवर अनेक वापरलेल्या कार आहेत ज्या विक्रीसाठी उपलब्ध आहेत. यापैकी आज आम्ही तुमच्यासाठी काही स्विफ्ट कारची माहिती घेऊन आलो आहोत.
Maruti Suzuki Second Hand Cars : तुम्ही जर Maruti Suzuki Swift कारचे फॅन असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. मारुती सुझुकी ट्रू व्हॅल्यूच्या वेबसाईटवर अनेक वापरलेल्या कार विक्रीसाठी उपलब्ध आहेत. यापैकी कमी किंमतीत जास्त फायदा देणाऱ्या काही स्विफ्ट कारची माहिती आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. मारुती सुझुकीची ट्रू व्हॅल्यू कंपनी वापरलेल्या कारमध्ये डील करते. वापरलेल्या मारुती सुझुकीच्या गाड्या येथे स्वस्तात विकल्या जातात. मारुती सुझुकी ट्रू व्हॅल्यूच्या वेबसाइटवर उपलब्ध असलेल्या कारची माहिती आम्ही येथे तुम्हाला देणार आहोत.
मारुती सुझुकी स्विफ्ट व्हीडीआय (Maruti Suzuki Swift VDI) ही कार गुवाहाटीमध्ये आहे. ही कार फक्त आणि फक्त 75,000 रूपयांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहे. 2007 ची ही मॉडेल कार असून या कारने आतापर्यंत एकूण 282281 किमी अंतर कापले आहे. या कारमध्ये डिझेल इंजिन आहे, जे मॅन्युअल ट्रान्समिशनवर काम करते. या कारचा नोंदणी क्रमांक गुवाहाटीचा आहे.
तर, मारुती सुझुकी स्विफ्ट VXI (Maruti Suzuki Swift VXI) कार महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात आहे. ही कार अवघ्या 80 हजार रुपयांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहे. ही 2006 मॉडेलची कार असून तिने आतापर्यंत एकूण 112169 किमी अंतर कापले आहे. यात पेट्रोल इंजिन आहे, जे मॅन्युअल ट्रान्समिशनवर काम करते. या कारचा नोंदणी क्रमांक साताऱ्याचा आहे.
याच कारचं Maruti Suzuki Swift VXI दुसरं मॉडेल रायपूरमध्ये आहे. ही कार फक्त 90,000 रुपयांना विक्रीसाठी उपलब्ध आहे. ही 2006 मॉडेलची कार असून तिने आतापर्यंत एकूण 300,000 किमी अंतर पार केले आहे. या कारमध्ये पेट्रोल इंजिन आहे, जे मॅन्युअल ट्रान्समिशनवर काम करते. त्याचा नोंदणी क्रमांक रायपूरचा आहे. या कारचा कलर व्हाईट आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Skoda Slavia : लवकरच येणार स्कोडा स्लाव्हिया, पुण्यात प्रोडक्शनला सुरुवात; 'ही' आहे खासियत
- BMW X3 SUV : BMW X3 SUV कारचं नवीन व्हर्जन भारतात लॉन्च, फक्त 6.6 सेकंदात गाठेल 100kmph चा वेग
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha