Grand Vitara Review: नवीन ग्रँड विटारा लॉन्च, 21 किमीचा मायलेज आणि बरेच काही, वाचा संपूर्ण रिव्ह्यू
Grand Vitara Review: प्रसिद्ध वाहन उत्पादक कंपनी मारुतीने आपली बहुप्रतीक्षित कार Grand Vitara भारतात लॉन्च केली आहे. ही एक हायब्रीड कार असून इलेक्ट्रिकपेक्षा हायब्रीड कारचा पर्याय हा उत्तम मानला जातो.
Grand Vitara Review: प्रसिद्ध वाहन उत्पादक कंपनी मारुतीने आपली बहुप्रतीक्षित कार Grand Vitara भारतात लॉन्च केली आहे. ही एक हायब्रीड कार असून इलेक्ट्रिकपेक्षा हायब्रीड कारचा पर्याय हा उत्तम मानला जातो. ही कमी इंधनात अधिक मायलेज देते. तसेच ही कार पेट्रोल आणि इलेक्ट्रिक या दोन्ही पर्यायाचा वापर करून धावत असल्याने ग्राहकांना रेंजची काळजी करण्याची गरज नाही. तुम्ही ही कार पेट्रोल किंवा इलेक्ट्रिक मोडवर चालवत असताना तुम्हाला याच्या शांत इंजिनचा आनंद घेता येतो.
हायब्रीड कार एक उत्तम पर्याय
शहरातील ट्रॅफिकमध्ये तासंतास अडकून पावसाळ्यातील खराब रस्त्यांशी झुंज दिल्यानंतर तुम्हाला ही वाटेल की हायब्रीड हाच सध्याचा सर्वात चांगला पर्याय आहे. असं असलं तरी इलेक्ट्रिक कार प्रमाणेच हायब्रीड कारचा प्रचार का केला जात नाही, याच आश्चर्य वाटते. पेट्रोल/डिझेलवरून थेट ईव्हीपर्यंत पोहोचण्याचा अवघड रस्ता सध्या हायब्रीडद्वारे कव्हर केला जाऊ शकतो.
मायलेज
ही कार आम्ही दिल्लीत चालवली. येथे चार्जिंग स्टेशनचा मोठा अभाव आहे. मात्र ग्रँड विटारा हायब्रिडने 21kmpl ची इंधन कार्यक्षमता पाहिली. ही मोठी कॉम्पॅक्ट SUV चालवताना आम्हाला 21-22 kmpl चा मायलेज मिळाला आहे.
इंजिन
ही कार फक्त आपल्या इंधनाचा खर्च वाचवत नाही, तर या मोठ्या एसयूव्हीमुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण कमी होण्यास ही मदत होते. ग्रँड विटारा हायब्रिडमध्ये असलेले टोयोटा इंजिन एकत्रितपणे 116hp पॉवर जनरेट करते. हे इंजिन जास्त आवाज न करता रिअल टाइममध्ये इलेक्ट्रिक आणि पेट्रोल एकत्र करून चांगला ड्रायव्हिंगचा अनुभव देते. तुम्ही कार ईव्ही मोडमध्ये ड्राइव्ह करताना, तुम्हाला अत्यंत शांतता जाणवते. कारच्या चार्जींगवर अवलंबून तुम्ही 1.5L इंजिनद्वारे समर्थित इलेक्ट्रिक मोडवर लांबचा पल्लाही आरामात गाठू शकता. ग्रँड विटारा हायब्रिडचा मोठा यूएसपी म्हणजे यात कमी वेग आणि गुळगुळीतपणा आहे. तुम्ही डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टरवर वाहन EV मोडमध्ये चालताना पाहू शकता.
ड्रायव्हिंगचा अनुभव
ही कार चालवता आम्हाला जाणवलं की, इलेक्ट्रिक मोड केवळ कमी गतीपुरता मर्यादित नाही. तर हायस्पीडमध्ये कार चालवतानाही तुम्ही ही कार पेट्रोल टू इलेक्ट्रिक मोडमध्ये शिफ्ट करू शकता. यात खास इलेक्ट्रिक मोडसाठी एक बटण देण्यात आले आहे. जे इकोसह चार्ज आणि ड्राइव्ह मोडच्या आधारावर काम करते. आम्ही ही कार अधिक वेळ इको मोडमध्ये चालवली आहे. याचे कारण म्हणजे ड्राइव्ह मोडमध्ये ही कार इलेक्ट्रिक किंवा पेट्रोलचा अधिक वापर करते. तर इको मोडमध्ये ही कार अधिक रेंज देते. अधिक गतीने ही कार चालवताना थोडा आवाज होतो. मात्र याचा एकूणच अनुभव खूप चांगला होता. ग्रँड विटाराच्या लाइट स्टीयरिंगसह गाडी चालवणे खूप सोपे आहे. यात जितके आवश्यक आहे, तितके ग्राउंड क्लीयरन्स देखील आहे. ज्यामुळे खड्ड्यातून गाडी चालवताना ती सहज पुढे निघून जाते.
स्पेस
याच्या सनरूफमुळे उन्हाळ्यात केबिन गरम होऊ शकते. मात्र यामुळे कारमध्ये हवेशीर अनुभव मिळतो. याच्या सीट आरामदायी आहेत आणि मागील प्रवाशांना लेगरूमबद्दल तक्रार करण्यासारखे काहीच नाही. परंतु हेडरूममध्ये जागा थोडी कमी आहे. खूप उंच प्रवाशांसाठी यात कमी बूट स्पेस आहे.
दरम्यान, आम्हाला याचे हायब्रिड पॉवरट्रेन, मायलेज, राइड , फीचर्स आणि लुक आवडले. आम्हाला याची बूट स्पेस आणि मागील सीट हेडरूम थोडी कमी आवडली.
संबंधित बातमी:
प्रतीक्षा संपली! नवीन Maruti Grand Vitara भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स