एक्स्प्लोर

Kia Careens : कियाची 7 सीटर कारेन्स उद्या होणार लॉन्च, जाणून घ्या पाच टॉप फीचर्सबद्दल

Kia Carens : कियाची सात सीटर कारेन्स (Kia Carnes) उद्या लॉन्च होत आहे. कियाची ही कारेन्स दोन पेट्रोल इंजिन आणि एक डिझेल पॉवरट्रेनसह 6-7 सीटर ले-आउटमध्ये उपलब्ध आहे.

Kia Carens :  किया कार कंपनीची नवी कारेन्स उद्या लॉन्च होत आहे. किया कारेन्स (Kia Carnes) ही एक सात सीटर एसयुव्ही आहे. आतापर्यंत किया कंपनींच्या गाड्यांना ग्राहकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे आता किया कारेन्सलाही चांगला प्रतिसाद मिळेल अशी आशा कंपनी व्यक्त करत आहे. कियाची ही कारेन्स दोन पेट्रोल इंजिन आणि एक डिझेल पॉवरट्रेनसह 6-7 सीटर ले-आउटमध्ये उपलब्ध आहे. याबरोबरच प्रीमियम, प्रेस्टीज, प्रेस्टीज प्लस, लक्झरी आणि लक्झरी प्लस फिचर्ससह ही कार बाजारात येत आहे. 

कारेन्सच्या वैशिष्ट्यांमध्ये 66 कनेक्टेड कारसह 26.03 cm (10.25") HD टचस्क्रीन नेव्हिगेशन, 8-स्पीकर बोस ऑडीओ सिस्टीम, व्हायरस आणि बॅक्टेरिया संरक्षणासह स्मार्ट शुद्ध हवा प्युरिफायर आणि हवेशीर फ्रंट सीटचा समावेश आहे. तर रो सीट्समध्ये "वन टच इझी इलेक्ट्रिक टंबल" आणि सनरूफचा समावेश आहे. लूकचा विचार केला तर कॅरेन्सचा पुढील भाग खूपच आकर्षक आहे. त्यामध्ये हेडलॅम्प आणि डीआरएल वेगळे केले आहेत.  

कारेन्सचे डिझाइन खूपच आकर्षक आहे. त्यामध्ये ड्युअल टोन अपहोल्स्ट्री, उच्च गुणवत्तेच्या बिट्सचा समावेश आहे. तर पुढील भागात बेसिक डॅशबोर्डची स्क्रीन 10.25-इंच आहे. केरेन्सचे इन्स्ट्रुमेंट क्लस्टर देखील डिजिटल आहे. याबरोबरच टच इलेक्ट्रिक फोल्डिंग सीट यंत्रणा हे महत्वाचे वैशिष्ट्य आहे. या फिचर्समुळे केवळ एक बटण दाबाल्यानंतर सीट दुमडल्या जातील. त्यामुळे अगदी सहज पद्धतीने कारच्या आत-बाहेर जाता येणार आहे. शिवाय कारच्या आतील जागाही खूप आहे. चालकाच्या मागील सीटसाठी एअर प्युरिफायरने उंची थोडी कमी केली तर मधील सीटवरही चांगली जागा मिळते.
 
 कियाच्या या  कारमध्ये  स्मार्टस्ट्रीम 1.5 लिटर पेट्रोल, स्मार्टस्ट्रीम 1.4 लिटर टी-जीडीआय पेट्रोल आणि 1.5 लिटर सीआरडीआई वीजीटी डिझेल पर्यायासह 6MT, 7DCT आणि 6AT तीन ट्रान्समिशचा समावेश आहे. टर्बो पेट्रोलला DCT पर्याय मिळेल तर डिझेलमध्ये टॉर्क कन्व्हर्टर ऑटोमॅटिक ऑफर असेल.  केरेन्स टोयोटा इनोवा, क्रिस्टा आणि ह्युंदाईच्या अल्काजरला टक्कर देत आहे.  

महत्वाच्या बातम्या

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

महात्मा फुले अन् सावित्रीमाईंचा भव्य दिव्य पुतळा; स्मारकासाठी किती खर्च?
महात्मा फुले अन् सावित्रीमाईंचा भव्य दिव्य पुतळा; स्मारकासाठी किती खर्च?
Raj Thackeray: राज ठाकरेंचा विदर्भ दौरा आटोपला, मित्राविरुद्ध उमेदवार; नागपूरमध्ये मनसे विधानसभा लढणार?
राज ठाकरेंचा विदर्भ दौरा आटोपला, मित्राविरुद्ध उमेदवार; नागपूरमध्ये मनसे विधानसभा लढणार?
Jay Shah: जय शाहांची मोठी घोषणा; IPL क्रिकेटर्स आणखी मालामाल, प्रत्येक मॅचसाठी पैसे मिळणार
जय शाहांची मोठी घोषणा; IPL क्रिकेटर्स आणखी मालामाल, प्रत्येक मॅचसाठी पैसे मिळणार
रोहित पवारांच्या कामात खोडा घालू नका, उभं करायला अक्कल लागते, शरद पवारांचा राम शिंदेंना टोला
रोहित पवारांच्या कामात खोडा घालू नका, उभं करायला अक्कल लागते, शरद पवारांचा राम शिंदेंना टोला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Amruta Fadnavis Full Speech : नाव न घेता ठाकरे-पवारांवर हल्ला, अमृता फडणवीसांचं UNCUT भाषणMahayuti Meeting : जागावाटपासंदर्भात वर्षा बंगल्यावर महायुतीची खलबतंABP Majha Headlines : 11 PM: 29 Sept 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सRaj Thackeray on Ladki Bahin Yojana : 'लाडकी'च्या निधीवरुन 'राज'कीय फटकारे Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
महात्मा फुले अन् सावित्रीमाईंचा भव्य दिव्य पुतळा; स्मारकासाठी किती खर्च?
महात्मा फुले अन् सावित्रीमाईंचा भव्य दिव्य पुतळा; स्मारकासाठी किती खर्च?
Raj Thackeray: राज ठाकरेंचा विदर्भ दौरा आटोपला, मित्राविरुद्ध उमेदवार; नागपूरमध्ये मनसे विधानसभा लढणार?
राज ठाकरेंचा विदर्भ दौरा आटोपला, मित्राविरुद्ध उमेदवार; नागपूरमध्ये मनसे विधानसभा लढणार?
Jay Shah: जय शाहांची मोठी घोषणा; IPL क्रिकेटर्स आणखी मालामाल, प्रत्येक मॅचसाठी पैसे मिळणार
जय शाहांची मोठी घोषणा; IPL क्रिकेटर्स आणखी मालामाल, प्रत्येक मॅचसाठी पैसे मिळणार
रोहित पवारांच्या कामात खोडा घालू नका, उभं करायला अक्कल लागते, शरद पवारांचा राम शिंदेंना टोला
रोहित पवारांच्या कामात खोडा घालू नका, उभं करायला अक्कल लागते, शरद पवारांचा राम शिंदेंना टोला
Drone terror: रात्री दहशत पसरवणाऱ्या ड्रोन नाट्यावर पडदा, नक्की काय होते कारण? पोलिसांनी केला उलगडा...
रात्री दहशत पसरवणाऱ्या ड्रोन नाट्यावर पडदा, नक्की काय होते कारण? पोलिसांनी केला उलगडा...
Vidhansabha 2024 : राज ठाकरेंची भेट, BRS ला रामराम; कोण आहेत प्रहारचे जयकुमार बेलखडे?
राज ठाकरेंची भेट, BRS ला रामराम; कोण आहेत प्रहारचे जयकुमार बेलखडे?
Video : नादच खुळा... अभिजीत बिचुकलेंची एंट्री, मै हूँ डॉन गाणं वाजलं; बिग बॉसच्या घरात 'नवा राडा'
Video : नादच खुळा... अभिजीत बिचुकलेंची एंट्री, मै हूँ डॉन गाणं वाजलं; बिग बॉसच्या घरात 'नवा राडा'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 सप्टेंबर 2024 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 सप्टेंबर 2024 | शनिवार
Embed widget