'या' SUV कारची किंमत एका वर्षात 4 पट वाढली! Citroen C5, Tucson, Harrier आणि Hector शी स्पर्धा
Jeep Compass Price Hiked : या कारच्या किमतीत यंदाची ही चौथी वाढ आहे. गेल्या वेळी दोन महिन्यांपूर्वी सप्टेंबरमध्ये ही दरवाढ करण्यात आली होती
Jeep Compass Price Hiked : कार उत्पादक कंपनी जीपने (Jeep) पुन्हा एकदा कंपास (Compass Car) एसयूव्हीच्या (SUV) किमती 1.2 लाख रुपयांनी वाढवल्या आहेत. कंपासच्या किमती आता बेस स्पोर्ट ट्रिमसाठी 20.89 लाख रुपयांपासून सुरू होतात आणि टॉप-स्पेस ट्रेलहॉकसाठी 32.67 लाखांपर्यंत जातात. कंपासच्या किमतीत यंदाची ही चौथी वाढ आहे. गेल्या वेळी दोन महिन्यांपूर्वी सप्टेंबरमध्ये ही दरवाढ करण्यात आली होती. त्यावेळी या एसयूव्हीच्या किमतीत 90,000 रुपयांनी वाढ करण्यात आली होती. चला जाणून घेऊया या SUV मध्ये असे काय खास आहे? की कंपनी या SUV ची किंमत सतत वाढवत आहे.
जीप कंपासच्या किमतीत चौथ्यांदा वाढ
जीप कंपास हायर-स्पेक लिमिटेड, अॅनिव्हर्सरी एडिशन, मॉडेल एस आणि ट्रेलहॉक व्हेरियंटच्या किंमतींमध्ये सुमारे 40,000-45,000 रुपयांची वाढ झाली आहे. दरम्यान, लो-स्पेक लाँगिट्यूड आणि नाईट ईगल व्हेरियंटच्या किमतीत रु. 15,000-25,000 ची वाढ झाली आहे. तथापि, बेस स्पोर्ट पेट्रोल-मॅन्युअलमध्ये कमाल 1.80 लाख रुपयांची वाढ झाली आहे, तर बेस स्पोर्ट डिझेल-मॅन्युअलच्या किंमतीत वाढ झालेली दिसत नाही.
10 महिन्यांत 3.05 लाखांची वाढ
सर्वात मनोरंजक गोष्ट म्हणजे, या वर्षाच्या सुरुवातीला कंपासची किंमत बेस पेट्रोल-मॅन्युअल व्हेरियंटसाठी 18.04 लाख रुपये होती, तर टॉप-स्पेक डिझेल ट्रेलहॉक व्हेरिएंटची किंमत 30.72 लाख रुपये होती. अवघ्या 10 महिन्यांत, बेस पेट्रोल व्हेरियंटच्या किमतीत 3.05 लाख रुपयांची प्रचंड वाढ झाली आहे, तर ट्रेलहॉकची किंमत 1.95 लाख रुपयांनी वाढली आहे.
जीप कंपास पॉवरट्रेन
जीप कंपासवरील पॉवरट्रेन पर्यायांमध्ये 1.4-लिटर टर्बो-पेट्रोल इंजिन समाविष्ट आहे. जे 163hp पॉवर आणि 250Nm टॉर्क निर्माण करण्यास सक्षम आहे. हे 6-स्पीड मॅन्युअल किंवा 7-स्पीड ड्युअल-क्लच ऑटोमॅटिक गिअरबॉक्सशी जोडलेले आहे. त्याच वेळी, दुसरा पर्याय 2.0-लिटर डिझेल इंजिन आहे, जो 170hp पॉवर आणि 350Nm टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे. हे 6-स्पीड मॅन्युअल किंवा 9-स्पीड स्वयंचलित गिअरबॉक्सशी जोडलेले आहे. ही एकमेव डिझेल-एटी पॉवरट्रेन आहे जी 4x4 प्रणालीसह ऑफर केली जाते.
या कारसोबत स्पर्धा
जीप कंपास टाटा हॅरियर, एमजी हेक्टर, न्यू ह्युंदाई टक्सन आणि सिट्रोएन C5 यांच्याशी त्याच्या किमतीच्या विभागात स्पर्धा करते.
भारतात लॉंच होणार नवीन ग्रँड चेरोकी
जीप 17 नोव्हेंबर रोजी भारतात नवीन ग्रँड चेरोकी लॉन्च करण्यासाठी सज्ज आहे. आपल्या देशासाठी जीपचे हे नवीन फ्लॅगशिप मॉडेल असेल. ही कार प्रथमच भारतात स्थानिक पातळीवर असेंबल केली जात आहे.
इतर बातम्या
Toyota Glanza CNG भारतात लॉन्च, मिळेल 31 किमी मायलेज, जाणून घ्या फीचर्स आणि किंमत