Arjun Rampal Birthday: पन्नाशीत चौथ्यांदा बाप बनला, 20 वर्षांनी घटस्फोट.. बॉलिवूडच्या खलनायकाच्या फिटनेसचा भल्याभल्यांना कॉम्प्लेक्स
९० च्या दशकातील असे अनेक अभिनेते आहेत जे वयाच्या ५० व्या वर्षीही फिटनेसच्या बाबतीत नवीन अभिनेत्यांपेक्षा वरचढ आहेत.
Arjun Rampal Birthday: आपल्या अभिनयानं आणि किलर ॲटिट्यूडनं ओळखला जाणारा अभिनेता अर्जून रामपाल ५२ वर्षांचा झालाय. मध्य प्रदेशच्या जबलपूरमध्ये २६ नोव्हेंबर १९७२ मध्ये अर्जूनचा जन्म झाला. रा.वन, ऐ दिल है तुम्हारा, ओम शांती ओम, रॉक ऑन, हाऊसफुल अशा हाऊसफुल सिनेमांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आला. अर्जुन रामपाल बी टाऊनमधील प्रसिद्ध अभिनेत्यांपैकी एक आहे. अर्जून रामपालविषयी या गोष्टी माहितीयेत का?
खलनायक म्हणून कमावले नाव
अर्जुन रामपालने 'ओम शांती ओम' नंतर खलनायक बनून खूप नाव कमावले. रा. वन सिनेमातही रावन या खलनायकाच्या भूमिकेत अर्जून दिसला.'राजनीती', 'हिरोईन' अशा प्रत्येक भूमिकांमधून आपल्या अभिनयाची छाप सोडत अर्जूननं बॉलिवूडमध्ये आपलं नाव कमावलं.भगवंत केसरी' या चित्रपटाद्वारे तेलुगूमध्ये पदार्पण केले.आपल्या फिटनेस आणि स्टाईल स्टेटमेंटनंही अर्जुन चाहत्यांना भुरळ घालताना दिसतो. अर्जुन रामपालने आपल्या करिअरची सुरुवात मॉडेलिंगपासून केली आणि मॉडेल म्हणून यश मिळवल्यानंतर त्याने 2001 मध्ये राजीव राय यांच्या 'प्यार इश्क और मोहब्बत' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये प्रवेश केला. हाय ॲक्शन चित्रपटांमध्ये झळकलेला अर्जून रामपाल त्याच्या स्ट्राँग प्रेझेंसने आणि थ्रील भूमिकांमुळं बॉलिवूडमध्ये प्रसिद्ध झाला आहे. राजकारणी, गँगस्टर, अंडरवल्र्ड डॉन अशा भूमिकांमध्ये अर्जून रामपालनं प्रेक्षकांसाठी बेंचमार्क सेट केला, तो कायमचाच.ओम शांती ओममध्ये अगदी छोटी भूमिका पण त्यातही अर्जूननं आपली छाप सोडत प्रेक्षकांना त्याला लक्षात ठेवायला भाग पाडलं.
वयाच्या पन्नाशीत चौथ्यांदा बनला बाप
९० च्या दशकातील असे अनेक अभिनेते आहेत जे वयाच्या ५० व्या वर्षीही फिटनेसच्या बाबतीत नवीन अभिनेत्यांपेक्षा वरचढ आहेत. यंदा ५२ वर्षांचा झालेल्या अर्जून पन्नासाव्या वर्षी बाबा झाला. अर्जून आणि त्याची गर्लफ्रेंड गॅब्रिएला डेमेट्रिएडस 2018 पासून एकमेकांना डेट करत आहे आणि 2019 मध्ये त्यांच्या पहिल्या मुलाचे स्वागत आहे. अर्जुन आणि गॅब्रिएला यांनी त्यांच्या मोठ्या मुलाचे नाव एरिक रामपाल ठेवले आहे.
२० वर्षांनंतर पहिलं लग्न तुटलं
गॅब्रिएला डेमेट्रिएड्सला डेट करण्यापूर्वी अर्जुनने माजी फेमिना मिस इंडिया युनिव्हर्स मेहर जेसियाशी लग्न केले होते. 20 वर्षे सुखी वैवाहिक जीवन जगल्यानंतर 2018 साली दोघांचा घटस्फोट झाला. अर्जूनला आणि मेहर जेसिया यांना माहिका रामपाल आणि मायरा रामपाल या दोन मुली आहेत.
हेही वाचा:
OTT Release: नोव्हेंबरचा शेवटचा आठवडा एंटरटेनमेंट फुल्ल ऑन; नवे चित्रपट अन् सीरिजची मेजवानी