Prajatka Mali: पुन्हा एकदा त्यांची भेट, खास संभाषण; प्राजक्ता माळीने शेअर केले गुरुदेव यांच्यासोबतचे फोटो, म्हणाली...
Prajakta Mali:प्राजक्ताच्या पोस्टवर चहात्यांनीही तिला भरभरून प्रतिसाद देत तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केल्याच दिसतंय.
Prajakta Mali: मराठी मनोरंजनसृष्टीत सध्या फुलवंती चित्रपटाच्या यशाची चांगलीच चर्चा आहे. निर्माती म्हणून मिळालेल्या यशानंतर अभिनेत्री प्राजक्ता माळीने तिच्या सोशल मीडिया साइटवरून काही खास फोटो चहात्यांना शेअर केले आहेत. फुलवंती चित्रपटाच्या यशानंतर कामातून ब्रेक घेत प्राजक्ता माळीने तिच्या गुरूंची म्हणजे श्री श्री रविशंकर यांची बेंगलोरच्या आश्रमात जाऊन भेट घेतली आहे. मौन धारण करण, सत्संग, ध्यान करत प्राजक्ताने बेंगलोरच्या आश्रमात चार दिवस घालवल्याचं तिनं सांगितलं. सोशल मीडियावर प्राजक्ताने या संदर्भात एक व्हिडिओही शेअर केला आहे. आता श्री श्री रविशंकर यांच्या सोबत फोटो शेअर करत पुन्हा एकदा त्यांची भेट, खोल संभाषण झाल्याचं तीन लिहिलय.
काय म्हणाली प्राजक्ता माळी?
पुन्हा एकदा त्यांना भेटले.. पुन्हा एकदा खास गहिरा संभाषण झाल्याचं लिहीत श्री श्री रविशंकर यांच्यासोबत घालवलेल्या काही क्षणांचे फोटो प्राजक्ताने शेअर केले आहेत. बेंगलोरच्या आश्रमात भेट घेत एक ऍडव्हान्स कोर्स केला असल्याचेही तिने चाहत्यांना सांगितलं.
View this post on Instagram
काही दिवसांपूर्वीच प्राजक्ता माळी हिने तिच्या फुलवंती चित्रपटाला दिलेल्या प्रतिसादाबद्दल बेंगलोरच्या आश्रमातूनच चहा त्यांच्या आभार मानले होते. फुलवंती चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित झाल्याचे हे तिने या व्हिडिओत सांगितलं होतं. आता पंधराव्या वेळेस आर्ट ऑफ लिविंगचा ऍडव्हान्स कोर्स करत असल्याचं चहा त्यांना सांगत तिने ही पोस्ट केली आहे.
चहात्यांनीही केला कौतुकाचा वर्षाव
प्राजक्ताच्या पोस्टवर चहात्यांनीही तिला भरभरून प्रतिसाद देत तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केल्याच दिसतंय. अनेकांनी कमेंट्स मध्ये फुलवंती चित्रपट आवडला तर सांगितलं तर काहींनी जय गुरुदेव असे म्हणत तिचा फोटोवर हा अनुभव नक्कीच चांगला असेल अशा प्रकारच्या कमेंट केल्यात.
फुलवंती आला ओटीटीवर
फुलवंती आला ओटीटीवरपेशव्यांच्या दरबारात आपल्या नृत्यानं पाहणाऱ्याला घायाळ करणारी फुलवंती आता ओटीटीवर रिलिज झाली आहे. ११ ऑक्टोबर रोजी सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित झालेला फुलवंती चित्रपट ॲमेझॉन प्राईमवर रिलिज झाला असून आता तो प्रेक्षकांना मोफत पाहता येणार आहे. सातव्या आठवड्यात पदार्पण करणारा हा सिनेमा २२ नोव्हेंबरपासून प्राईमवर प्रदर्शित झाल्याचं अभिनेत्री प्राजक्ता माळीनं सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत सांगितलं.
हेही वाचा: