(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Driving tips : पावसाळ्यात कार घेऊन बाहेर पडताय? आयत्या वेळचा खोळंबा टाळण्यासाठी 'या' गोष्टी लक्षात ठेवा!
Safety Tips For Rainy Season : पावसाळ्यात गाड्यांची काळजी घेणे खूप जास्त गरजेचे असते नाहीतर पुढे जाऊन मोठ्या प्रमाणात गाड्यांवर खर्च करावा लागतो. अशा परिस्थितीत गाड्यांची काळजी कशी घ्यावी हे जाणून घेऊ.
Safety Tips For Rainy Season : पावसाळा (Rainy Season) हा सगळ्यांचाच आवडता ऋतू. भारतभर आता पावसाने चांगलीच हजेरी लावलेली आहे. अल्हाददायक वाटणाऱ्या या पावसाचा आनंद घेण्याकरता अनेक लोक लाँग ड्राईव्हकरता बाहेर पडतात. मात्र पावसाळ्यात गाड्यांची काळजी घेणे खूप जास्त गरजेचे असते नाहीतर पुढे जाऊन मोठ्या प्रमाणात गाड्यांवर खर्च करावा लागतो. पावसाळ्यात अनेकदा रस्त्यांवर पाणी साचते आणि अशा परिस्थितीत गाडी चालवणे खूप कठीण होते. या साचलेल्या पाण्यामुळे अनेकदा रस्त्यात असणारे खड्डे दिसत नाहीत. परिणामी अपघातांचे प्रमाण वाढते. अशा परिस्थितीत गाड्यांची काळजी कशी घ्यावी हे जाणून घेऊ.
गरज असेल तरच पावसाळ्यात गाडी बाहेर काढा
शक्यतो पावसाळ्यात गाडी वापरणे टाळा. मात्र काही कारणास्तव गाडी घेऊन बाहेर पडावे लागल्यास वेगाची विशेष काळजी घ्या. पावसाळ्यात रस्ते निसरडे झालेले असतात. वेग जास्त असल्यास गाडीचा अपघात होण्याची मोठी शक्यता असते.
बाहेर पडण्यापूर्वी कारवर/गाडीवर नजर टाका
पावसाळ्यात फिरण्यासाठी गाडी बाहेर घेऊन जात असाल तर गाडीचे हेडलाईट, ब्रेक, टेल लाईट, इंडिकेटर, वायपर आणि चाकांमधील हवा हे सर्व तपासून पाहा. तसेच बाहेर पडताना तुमच्या नेहमीच्या मेकॅनिकचा नंबर सोबत ठेवा.
गाडीची हेडलाईट कायम सुरु ठेवा
पावसाळ्यात अनेकदा पावसाच्या जोरामुळे समोरुन येणारी एखादी गाडी किंवा व्यक्ती तुम्हाला दिसत नाही. अशा गाडीचा अपघात होण्याची शक्यता खूप मोठ्या प्रमाणात असते. म्हणून गाडीची हेडलाईट कायम सुरु ठेऊनच गाडी चालवणे गरजेचे आहे.
सुरक्षित अंतर ठेवा
पावसात रस्ते ओले असल्या कारणाने ब्रेक लावताच गाडी घसरण्याची शक्यता असते. म्हणूनच तुमच्या गाडीच्या पुढे अथवा आजूबाजूला गाड्यांपासून सुरक्षित अंतर ठेवणे गरजेचे आहे.
पाणी साचलेल्या परिसरात जाणे टाळा
पावसाळ्यात रस्त्यांवर पाणी साचते. इतक्या साचलेल्या पाण्यात चालकांना गाडी चालवणे फार अवघड जाते. अशा वेळी ज्या मार्गावरुन तुम्हाला जायचे आहे त्या मार्गाची संपूर्ण माहिती घ्या आणि मगच गाडी घेऊन बाहेर पडा.
एका लेनमध्ये गाडी चालवा
पावसाळ्यात सतत लेन बदलणे धोक्याचे ठरु शकते. त्यामुळे एकाच लेनमध्ये कमी वेगात गाडी चालवावी. पावसाळ्यात गाडी घेऊन जात असताना आठवणीने (Roadside Assistance) नंबर फोनमध्ये असू द्या.
ब्रेकचा योग्य वापर करा
पावसाळ्यात तातडीने ब्रेक लावल्यास गाडीचा अपघात होण्याची दाट शक्यता असते. यामुळे पावसाळ्यात गाडीचा मागील ब्रेक लावणे कधीही चांगले आणि फायदेशीर ठर शकते. मागचा ब्रेक लावल्याने गाडी हळूहळू थांबते.
इतर महत्वाच्या बातम्या
Car Buying Tips : पहिल्यांदाच कार खरेदी करताय? मग या गोष्टी ठेवा लक्षात