Maharashtra Ghat Road : पावसाळ्यात महाराष्ट्रातील घाट रस्त्यांवर वाहतूक कोंडी झाल्यास 'या' पर्यायी मार्गांचा वापर करा
Maharashtra Ghat Road : पावसाळ्यात महाराष्ट्रातील घाट रस्त्यांवर वाहतूक कोंडी झाल्यास महामार्ग पोलिसांकडून पर्यायी मार्ग सूचवण्यात आले आहेत.
Maharashtra Ghat Road : राज्यातील अनेक भागात पावसाळा (Rainy Season) सुरु झाला असून पावसाळ्यात अनेक भागातील रस्ते वाहतूक बंद (Road Closed) होते. अनेक घाटातील रस्ते दरड कोसळून, नदीला पूर आल्याने किंवा झाडे कोसळल्याने बंद होतात. अशावेळी वाहनचालकांना सोयीस्कर म्हणून पर्यायी मार्ग माहिती असणे आवश्यक असते. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र महामार्ग पोलिसांकडून राज्यातील मुख्य रस्त्यांवर वाहतूक कोंडी झाल्यास पर्यायी मार्ग सूचवण्यात आले आहेत.
राज्यातील अनेक शहरात, घाटमाथ्यावर पावसाला सुरवात झाली असून पावसाळ्यात वाहतूक कोंडीची (Traffic Jam) समस्या मोठ्या प्रमाणात जाणवते. ही समस्या सोडविण्यासाठी आता राज्याचे महामार्ग पोलीस प्रशासन विभाग सरसावला आहे. राज्यातील घाट रस्त्यांवर पावसाळ्यात अनेकदा वाहतूक कोंडी होती. अशावेळी दोन ते तीन किलोमीटर वाहनांच्या रांगा लागलेल्या दिसून येतात. याच पार्श्वभूमीवर महामार्ग पोलिसानी राज्यातील घाट रस्त्यांना पर्यायी मार्ग सुचवले आहेत. ज्या घाट रस्त्यांवर वाहतूक कोंडी होईल, अशावेळी पर्यायी मार्गाचा अवलंब करून प्रवास सुखकर आणि वाहतूक कोंडी टाळता येणार आहे.
महामार्ग पोलिसांनी (Highway Police) आपल्या ट्विटर हॅण्डलवरून हे पर्यायी मार्ग सुचवले आहेत. त्यानुसार माळशेज घाट : नेहमीचा रस्ता - मुंबई-कल्याण-मुरबाड-आळेफाटा-अहमदनगर, तर पर्यायी रस्ता म्हणून एक कल्याण-कसारा-घोटी- अहमदनगर, तर पर्यायी रस्ता दुसरा असा की आळेफाटा-मंचर-चाकण-एक्सप्रेसवे मार्गे मुंबई जाता येईल. कन्नड घाट : धुळे-चाळीसगाव-कन्नड-वेरूळ-औरंगाबाद असा नेहमीच रस्ता आहे. तर पर्यायी रस्ता म्हणून धुळे-चाळीसगाव-नांदगाव-तळवाडे-देवगाव-औरंगाबाद असा असेल. तर दुसरा पर्याय रस्ता म्हणून अजिंठा घाटातून औरंगाबाद जालनाकडे वैजापूर जाता येईल. कोंडाईबारी घाट : सुरत-नवापूर-साक्री-धुळे असा नेहमीचा रस्ता आहे. तर पहिला पर्यायी रस्ता म्हणून सुरत-नवापूर-नंदुरबार-दोंडाईचा-धुळे असा असेल. बोरघाट घाट : नेहमीचा रस्ता म्हणून पुणे द्रुतगती मार्ग. तर पहिला पर्यायी रस्ता म्हणून जुना मुंबई-पुणे महामार्ग तर दुसरा पर्यायी रस्ता म्हणून माळशेज घाट मार्गे जाता येईल. वरंधा घाट : महाड-भोर-शिरवळ-जुना मुंबई पुणे महामार्ग असा नेहमीच रस्ता आहे. तर पहिला पर्यायी रस्ता म्हणून महाड-वेल्हे-नरसापुर-जुना मुंबई-पुणे महामार्ग ताम्हिणी घाट मार्गे दुसरा पर्याय रस्ता अवलंबता येईल.
नाशिक (Nashik) जिल्ह्यांतील प्रवाशांसाठी
चांदवड घाट : नाशिक-मालेगाव-धुळे असा नेहमीच रस्ता आहे. तर पर्यायी रस्ता म्हणून नाशिक-कळवण-सटाणा-मालेगाव असा असेल. दुसरा पर्याय रस्ता म्हणून नाशिक-निफाड-मनमाड-मालेगाव असा असेल. कसारा घाट : नेहमीचा रस्ता - मुरबाड-कसारा-इगतपुरी-नाशिक असेल. पहिला पर्यायी रस्ता म्हणून मुंबई-भिवंडी-जव्हार-त्र्यंबक-नाशिक, तर दुसरा पर्याय रस्ता माळशेट घाट मार्गे जाता येईल. तर लळींग घाट : मालेगाव-धुळे असा नेहमीचा रस्ता आहे. पहिला पर्यायी रस्ता म्हणून मालेगाव-कुसुंबा-धुळे असा असेल तर दुसरा पर्यायी रस्ता म्हणून मालेगाव-आर्वी-शिरुई- धुळे असा असेल. राहुल घाट : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारवरील नेहमीचा रस्ता मालेगाव-नाशिक तर पर्यायी रस्ता म्हणून चांदवड-मनमाड-मालेगाव तर पर्यायी रस्ता दोन म्हणून मालेगाव-मनमाड-चांदवड -नाशिक असा प्रवास करता येईल.
कोल्हापूर जिल्ह्यातील प्रवाशांसाठी
आंबा घाट : रत्नागिरी-शाहूवाडी-साखरपा-मलकापूर- कोल्हापूर हा नेहमीचा रस्ता असेल तर पहिला पर्यायी रस्ता म्हणून रत्नागिरी-वाटुळ-पाचल-अनुसूरा-घाटमार्गे कोपर्डे-कोल्हापूर जाता येईल तर दुसरा पर्यायी मार्ग रत्नागिरी-राजापूर-तळेरे-वैभववाडी -गगनबावडा-कोल्हापूर असा असेल. फोंडा घाट : कणकवली-करुळ-फोंडा-राधानगरी-राशीवडे-कोल्हापूर असा नेहमीचा रस्ता असेल तर पहिला पर्यायी मार्ग असा आहे कि, कणकवली-तरळे -वैभववाडी-गगनबावडा-कोल्हापूर असा असेल तर दुसरा पर्यायी रस्ता मार्ग आंबोली घाटमार्गे असेल. आंबोली घाट : सावंतवाडी-आंबोली-आजरा-गडहिंग्लज -कोल्हापूर असा नेहमीचा रस्ता असेल तर पर्यायी रस्ता म्हणून सावंतवाडी-कणकवली-करूळ-फोंडा-राधानगरी असा असेल. दुसरा पर्यायी मार्ग हा गगनबावडा घाटा मार्गे असेल. मानदेव घाट : यवतमाळ-अरणी या मार्ग नेहमीचा आहे. तर पहिला पर्याय रस्ता यवतमाळ-दारव्हा-दिग्रस-अर्णीवरून असेल, दुसरा पर्यायी रस्ता म्हणून यवतमाळ-अकोला बाजार-अर्णी असा असेल.
कोकणातील प्रवाशांसाठी
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 वरील परशुराम घाट : मुंबई-गोवा-महामार्ग-लोटेखेड-हातखंबा-चिपळूण असा नेहमीचा रस्ता आहे. तर पर्यायी रस्ता म्हणून पिरलोटे- चिरणी-आंबडस-कळंबस्ते- चिपळूण असा असेल. तर दुसरा पर्यायी मार्ग म्हणून वेरळ-खोपी- धामणंद- आंबडस-कळंबस्ते-चिपळूण असा असेल. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 वरील कामठे घाट मुंबई-गोवा-महामार्ग-चिपळूण-सावर्डे असा नेहमीचा रस्ता आहे. तर पर्याय रस्ता म्हणून चिपळूण-गणेश खिंड-सावर्डे असा राहील. कुंभार्ली घाट : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 166 ई वरील : गुहागर-विजापूर-चिपळूण-शिरगाव- सातारा असा नेहमीचा रस्ता असेल तर पर्यायी रस्ता म्हणून महावितरण कंपनी पोकळी पावर हाऊस अंतर्गत-अलोरे-तांबटवाडी-कोयना असा असेल. दुसरा पर्यायी रस्ता म्हणून आंबा घाट-रत्नागिरी येथून किंवा पोलादपूर-महाबळेश्वर मार्गे जाता येईल. भुईबावडा घाट : खारेपाटण-तिथवली-कोळापे-मेहबूबनगर-भुईबावडा-गगनबावडा-कोल्हापूर असा नेहमीचा रस्ता असेल तर पर्यायी रस्ता म्हणून तळले -वैभववाडी- गगनबावडा-कोल्हापूर असा असेल तर दुसरा पर्यायी रस्ता म्हणून कणकवली-करूळ-फोंडा-राधानगरी-राशिवडे-कोल्हापूर असा असेल. कशेडी घाट : मुंबई-गोवा-महाड-चिपळूण असा नेहमीचा रस्ता आहे तर पर्यायी मार्ग एक म्हणून पोलादपूर-कोंबडी-दहिवली मार्गे खेड जाता येईल तर दुसरा पर्यायी रस्ता म्हणून पोलादपूर-विन्हेरेमार्गे खेड जाता येईल.
सावधान पावसाळा सुरु झाला आहे. महाराष्ट्रातील मुख्य रस्त्यावर असलेल्या घाट माथ्यावर वाहतुक कोंडी झाल्यास त्याकरिता पर्यायी मार्ग कोणते, हे पहा.@HSPMaharashtra सदैव तुमच्या मदतीसाठी तत्पर.#MahaRastaSuraksha #MahaRoadSafety #HighwaySafety pic.twitter.com/y6q9v65g4Y
— HIGHWAY POLICE (@HSPMaharashtra) June 23, 2023