(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Maharashtra Wether Updates : राज्याचा पारा घसरला; मुंबईत गुलाबी थंडीची चाहुल, पुणे गारठलं, तर नाशकात नीच्चांकी तापमानाची नोंद
Maharashtra Wether Updates : मुंबईतील अनेक ठिकाणी तापमान 16-17 अंश सेल्सिअसच्या खाली, एमएमआरमध्ये 15 अंश सेल्सिअसच्या खाली जाण्याची शक्यता आहे.
Maharashtra Wether Updates : गेल्या काही महिन्यांपासून उन्हाच्या झळा सहन करणाऱ्या राज्यातील लोकांना आता काहीसा दिसाला मिळत आहे. राज्यातील (Maharashtra Winter Weather Alert ) अनेक भागांत हळूहळू थंडीची चाहूल लागली आहे. मुंबई (Mumbai), ठाणे (Thane) आणि पालघर (Palghar) या आठवड्यात उत्तरेकडील वारे मजबूत झाल्याने हंगामातील कमी तापमानाचा नवा विक्रम निर्माण करतील. मुंबईतील अनेक ठिकाणी तापमान 16-17 अंश सेल्सिअसच्या खाली, एमएमआरमध्ये 15 अंश सेल्सिअसच्या खाली जाण्याची शक्यता आहे. तर पुण्यात सुद्धा तापमान 10-11 अंश सेल्सिअसपर्यंत खाली येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
मुंबईत यंदाचा मोसमातील सर्वात कमी तापमानाची नोंद
मुंबईत यंदाच्या मोसमातील सर्वात कमी तापमानाची नोंद करण्यात आली आहे. मुंबईतील किमान तापमानात घट झाली असून मुंबईतील सांताक्रुज केंद्रावर 16.8 अंश सेल्सिअस इतक्या कमी तापमानाची नोंद करण्यात आली आहे. तर, कुलाब्यातही तापमान 22.5 अंश सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलंय
नाशिक आणि निफाड मध्ये यंदाच्या मोसमतीत नीच्चांकी तापमानाची नोंद
मुंबईपाठोपाठ नाशिक आणि निफाडचा पारा दोन अंशांनी घसरला आहे. नाशिकमध्ये आज 10.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे. नाशिकच्या निफाडमध्ये पारा 8 अंशावर आला असून निफाड मध्ये 8.8 तापमानाची नोंद करण्यात आली आहे.
राज्यातील काही प्रमुख शहरांमधील तापमान (अंश सेल्सिअसमध्ये)
शहरं | तापमान |
अहमदनगर | 9.7 |
पुणे | 10.8 |
संभाजीनगर | 12.1 |
जालना | 10.8 |
जेऊर | 10.5 |
उदगीर | 11.5 |
नाशिक | 10.8 |
नांदेड | 11.8 |
कोल्हापूर | 15.7 |
बारामती | 11.7 |
महाबळेश्वर | 12.6 |