Upcoming Hero Scooter : Honda च्या Activa 125 ला टक्कर देण्यासाठी हिरोची नवीन स्कूटर; पाहा पहिली झलक
Upcoming Hero Scooter : या स्कूटरमध्ये 12-इंच चाक दिले जाऊ शकते. यात ड्रम ब्रेकसह स्टील व्हील आणि मशीन कट अलॉय व्हीलसह फ्रंट डिस्क ब्रेकचा पर्यायही मिळू शकतो.
Upcoming Hero Scooter : सध्या बाजारात अनेक नवनवीन कार, बाईक लॉन्च होत आहेत. मात्र, बाईक सेगमेंटमधील कोणताही ब्रॅंड देशातील आघाडीच्या बाईक उत्पादक Hero Motocorp शी बरोबरी करू शकत नाही. गेल्या महिन्यात, कंपनीने भारतात सर्वात जास्त स्प्लेंडर बाईक्सची विक्री केली. ती देशातील सर्वाधिक विकली जाणारी मोटरसायकल देखील होती. मात्र, देशाच्या स्कूटर मार्केटमध्ये हिरोचा इतका मोठा दबदबा कधीच नव्हता. तसे, हीरोच्या पोर्टफोलिओमध्ये Pleasure, Destini 125 आणि Maestro Edge 125 सारख्या स्कूटर आहेत, जे या सेगमेंटच्या Activa ला स्पर्धा देऊ शकतात. पण, विक्रीच्या आकड्यांचा विचार केला तर या स्कूटर अॅक्टिव्हाच्या तुलनेत मागेच आहेत. अशा परिस्थितीत कंपनीच्या एका नवीन स्कूटरची झलक समोर आली आहे.
चाचणी दरम्यान स्पॉट करण्यात आली
चाचणी दरम्यान, हिरोच्या नवीन स्कूटरची एक झलक टिपण्यात आली. ही स्कूटर शार्प डिझाइन आणि स्पोर्टी लूकसह लॉन्च केली जाऊ शकते. ही नवीन स्कूटर हिरोच्या सध्याच्या पोर्टफोलिओमधील स्कूटर्सपेक्षा स्पोर्टियर आणि शार्प डिझाइनसह येईल. यामध्ये NTorq, Avenis आणि RayZR सारख्या हेडलाइट्स समोरील हँडलबारवर दिसणार्या एलईडी हेडलाइटच्या सेटअपशिवाय पूर्णपणे दिसतील.
ही वैशिष्ट्ये :
हिरोच्या 125 सीसी स्पोर्टी स्कूटरला 12 इंच चाक दिले जाऊ शकते. यात ड्रम ब्रेकसह स्टील व्हील आणि मशीन कट अलॉय व्हीलसह फ्रंट डिस्क ब्रेकचा पर्यायही मिळू शकतो. तसेच, नवीन इन्स्ट्रुमेंटेशन एलसीडी पॅनल स्क्रीन दिली जाण्याची अपेक्षा आहे. हे ओडोमीटर, ट्रिप मीटर, घड्याळ, इंधन-स्तर निर्देशक आणि ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीसह सूचना आणि टर्न-बाय-टर्न नेव्हिगेशन यांसारख्या अनेक वैशिष्ट्यांसह लोड केले जाऊ शकते.
महत्वाच्या बातम्या :