Maruti Suzuki Grand Vitara: मारुतीची मिड-साईज सेगमेंटमध्ये एंट्री; नवीन ग्रँड विटारा आली, बुकिंग सुरू
Maruti Suzuki Grand Vitara: देशातील सर्वात मोठी कार निर्माता कंपनी Maruti Suzuki India ने आपल्या नवीन कार Grand Vitara सह मिड-साईज SUV सेगमेंटमध्ये एंट्री केली आहे.
Maruti Suzuki Grand Vitara: देशातील सर्वात मोठी कार निर्माता कंपनी Maruti Suzuki India ने आपल्या नवीन कार Grand Vitara सह मिड-साईज SUV सेगमेंटमध्ये एंट्री केली आहे. मारुती सुझुकी ग्रँड विटारासाठी प्री-बुकिंग 11,000 रुपयांपासून सुरू झाली आहे. असं असलं तरी ग्रँड विटाराच्या किमती ऑगस्टमध्ये जाहीर होण्याची अपेक्षा आहे.
मारुती सुझुकी ग्रँड विटारा 2022 ही आपल्या सेगमेंटमधील सेल्फ-चार्जिंग इलेक्ट्रिक हायब्रीड प्रकारासह येणारी पहिली कार असेल. मारुती सुझुकी इलेक्ट्रिक हायब्रीड तंत्रज्ञान क्लीनर पॉवरट्रेन टोयोटासोबत शेअर करेल. ज्याने यापूर्वी समान तंत्रज्ञानासह अर्बन क्रूझर हायडर एसयूव्ही सादर केली होती. ही कार भारतीय बाजारपेठेतील आपल्या सेगमेंटमध्ये Kia Seltos, Hyundai Creta, MG Aster, Tata Harrier सारख्या SUV ला टक्कर देईल.
बुकिंग
मारुती सुझुकी ग्रँड विटारा खरेदी करू इच्छिणारे ग्राहक 11,000 रुपये भरून ही कार बुक करू शकतात. हे मॉडेल मारुतीच्या नेक्सा डीलरशिपद्वारे विकले जाईल. ह्या ग्राहकांना ही कार बुक करायची आहे ते Nexa डीलरशिपला भेट देऊ शकतात किंवा अधिकृत Nexa ऑनलाइन चॅनेलद्वारे देखील बुक करू शकतात.
नवीन मारुती सुझुकी ग्रँड विटारा SUV मध्ये बरेच फीचर्स टोयोटा अर्बन क्रूझर हायराइडर सारखेच आहेत. जी अलीकडेच सादर करण्यात आली होती. दोन्ही एसयूव्ही सुझुकीच्या ग्लोबल सी प्लॅटफॉर्मवर आधारित आहेत. जे मारुती सुझुकी ब्रेझा आणि एस-क्रॉसमध्ये देखील वापरले जात आहेत. इंजिन, गिअरबॉक्स आणि इतर घटक देखील दोन SUV मध्ये एकसारखेच आहे.
मारुती सुझुकी ग्रँड विटारा दोन इंजिन पर्यायांमध्ये लॉन्च करणार . मारुती सुझुकीच्या इतर कारमध्ये 1.5-लिटर सौम्य हायब्रिड इंजिन आहे. तर दुसरे टोयोटाच्या सहकार्याने विकसित केलेले नवीन 1.5-लिटर मजबूत हायब्रिड इंजिन आहे. सौम्य हायब्रिड इंजिन 100 PS पॉवर आणि 135 Nm टॉर्क जनरेट करते. हे 5-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स किंवा 6-स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशनसह दिले जाईल. याचे मायलेज 21.11 kmpl आहे. मजबूत हायब्रीड इंजिन 115 पीएस पॉवर जनरेट करते आणि ते केवळ एका ई-सीव्हीटी ऑटोमॅटिक ट्रान्समिशनशी जोडले जाईल. मारुती सुझुकीचा दावा आहे की, ही कार आपल्या सेगमेंटमध्ये सर्वाधिक 27.97 kmpl चा मायलेज देईल.