Electric Car vs Petrol-Diesel Car: इलेक्ट्रिक कार की डिझेल-पेट्रोल? कोणती कार केली पाहिजे खरेदी
Electric Car vs Diesel Car: जेव्हा कोणतीही कार खरेदी करण्याचा विचार करतो, तेव्हा त्या कारची डिलिव्हरी कधी मिळणार? त्याच्या मेंटेनन्सचा खर्च किती येणार? तसेच त्याची रिसेल व्हॅल्यू किती असू शकते, याचा देखील विचार केला जातो.
Electric Car vs Diesel Car: जेव्हा कोणतीही कार खरेदी करण्याचा विचार करतो, तेव्हा त्या कारची डिलिव्हरी कधी मिळणार? त्याच्या मेंटेनन्सचा खर्च किती येणार? तसेच त्याची रिसेल व्हॅल्यू किती असू शकते, याचा देखील विचार केला जातो. या पर्यायांमध्ये तुम्ही पेट्रोल-डिझेलसह इलेक्ट्रिक कारचाही समावेश करू शकता. तुमच्या सोयीसाठी आम्ही तुम्हाला याचे तोटे आणि फायदे सांगणार आहोत. जेणेकरून तुम्हाला पर्याय निवडणे सोपे जाईल.
किंमत आणि रिसेल व्हॅल्यू
किंमतीदबद्दल बोलाचे झाले तर पेट्रोल-डिझेल कारच्या तुलनेत इलेक्ट्रिक कार या अजूनही महाग आहेत. असं असलं तरी काही इलेक्ट्रिक कार या 10 लाखांच्या बजेटमध्ये उपलब्ध आहेत. रिसेल व्हॅल्यूच्या बाबतीत पेट्रोल-डिझेल कार या अजूनही पुढे आहेत. अनेक लोकांचा विश्वास हा अजूनही इलेक्ट्रिक कारच्या तुलनेत पेट्रोलप-डिझेल कारवर आहे.
मेंटेनन्स आणि सर्व्हिस
पेट्रोल-डिझेल गाड्या वेळेवर सर्व्हिस कराव्याच लागतात. हा खर्च निश्चित आहे. परंतु इलेक्ट्रिक कार अनेक हजार किलोमीटर आणि बॅटरीसाठी काही वर्षांची वॉरंटी देत आहेत. यामध्ये तुम्ही पेट्रोल-डिझेल टेन्शनपासून वाचता. यात एअर फिल्टर, ऑइल फिल्टर, ऑइल चेंज असे काहीही काहीही करावे लागत नाही.
बॅटरी लाईफ
वेगवेगळ्या कंपन्या त्यांच्या इलेक्ट्रिक कारवर वेगवेगळे किलोमीटर आणि वेगवेगळ्या वर्षांची बॅटरी वॉरंटी देत आहेत. पण जोपर्यंत कार वॉरंटी अंतर्गत आहे, तोपर्यंत तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. पण त्यानंतर जर तुम्हाला बॅटरी बदलावी लागली तर ते तुमच्या खिशाला खूप भारी पडू शकते.
इंधन इंजिन
पेट्रोल-डिझेल कारच्या बाबतीत असे होत नाही, परंतु यामध्ये तुम्हाला नियमित सर्व्हिसिंगवर पैसे खर्च करावे लागतात. जे एकत्र जास्त पैसे खर्च करण्यापेक्षा बरे आहे. यामुळेच या कारच्या रिसेल व्हॅल्यू चांगली मिळते.
इलेक्ट्रिक कार vs पेट्रोल-डिझेल
तुम्हाला वारंवार पेट्रोल-डिझेल आणि सर्व्हिसिंगवर होणारा वेळ आणि पैसा टाळायचा असेल, तर तुमच्यासाठी इलेक्ट्रिक कार हा एक चांगला पर्याय ठरू शकतो. तसेच जर तुमचे बजेट कमी असेल आणि तुम्हाला कारची रिसेल व्हॅल्यू लक्षात घेऊन कार घ्यायची असेल, तर तुम्ही पेट्रोल-डिझेलचा पर्याय घेऊ शकता.
इतर महत्वाच्या बातम्या: