Samruddhi Mahamarg : नऊ एअरबॅग्ज, फक्त 7.4 सेकंदात पकडते 100 kmpl वेग; फडणवीस चालवत असलेल्या कारची किंमत जाणून व्हाल थक्क
Devendra Fadnavis Drove Mercedes Car : आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर ते शिर्डी कारने प्रवास केला आहे. यात विशेष म्हणजे स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी तब्बल 529 किमी स्वतः कार चालवली आहे.
Devendra Fadnavis Drove Mercedes Car : आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर ते शिर्डी कारने प्रवास केला आहे. यात विशेष म्हणजे स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी तब्बल 529 किमी स्वतः कार चालवली आहे. जवळपास 150 किमी वेगाने फडणवीस यांनी समृद्धी महामार्गावर (samruddhi mahamarg ) गाडी चालवली. यातच देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांचे कार चलावतानाचे फोटो आणि व्हिडीओ हे सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यातच अनेक नेटकऱ्यांना प्रश्न पाडला आहे की, फडणवीस चालवत असलेली ही कार नेमकी आहे तरी कोणती. तर देवेंद्र फडणवीस चालवत असलेली ही कार आहे Mercedes-Benz G350d. या कारची एक्स शोरूम किंमत 2.02 कोटी इतकी आहे. या कारबद्दल अधिक माहिती जाणून घेऊ.
इंजिन
Mercedes G 350d मध्ये 3.0-लिटर 6-सिलेंडर डिझेल इंजिन आहे. जे 285 PS पॉवर आणि 600 Nm टॉर्क जनरेट करते. हे इंजिन 9-स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्सशी जोडलेले आहे. मर्सिडीज जी-क्लास ऑफ-रोडिंगसाठी ओळखली जाते. ही कार फक्त 7.4 सेकंदात 0 ते 100 किमी/ताशी वेग पकडू शकते. G 350 D मध्ये 20-इंचाचे अलॉय व्हील देण्यात आले असून याचा ग्राउंड क्लीयरन्स 241 मिमी आहे.
And the moment is here!
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) December 4, 2022
Team Maharashtra actually made it happen and we are actually driving on this dream come true #Samruddhi Super Communication Expressway #SamruddhiMahamarg !
We did it, CM @mieknathshinde ji 🤝🏼!
We started from #Nagpur this morning towards Shirdi.. pic.twitter.com/JBiIVY9gDb
मिळतात नऊ एअरबॅग्ज
मर्सिडीज जी-क्लास थ्री-झोन क्लायमेट कंट्रोल, नऊ एअरबॅग्ज, पॉवर आणि व्हेंटिलेटेड फ्रंट सीट्स यासारखे फीचर्स यामध्ये उपलब्ध आहेत. G 350d मध्ये कंपनीने मर्सिडीज मी कनेक्टेड कार टेक्नॉलॉजी फीचर समाविष्ट केले आहे. G 350d ही फॅक्टरी फिट फीचर मिळवणारी देशातील पहिली मर्सिडीज कार आहे. यात दोन 12.3-इंच डिस्प्ले, ड्रायव्हर इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, मल्टी इन्फॉर्मेशन डिस्प्ले आणि टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम सारखे फीचर्सही देण्यात आले आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या :