वाहन चालकांनो सावधान! अवघ्या 50 रुपयांसाठी होऊ शकतो तुरुंगवास, ‘हे’ महत्त्वाचे कागदपत्र गाडीत असायलाच हवेत!
Challan For Expired PUC : नेहमी ड्रायव्हिंग करताना ड्रायव्हिंगशी संबंधित आणि गाडीशी संबंधित सर्व आवश्यक कागदपत्रे सोबत ठेवणे अतिशय महत्त्वाचे आहे.
Challan For Expired PUC Certificate : जर तुमच्याकडे बाईक किंवा कार असेल, तर गाड्यांबाबतीत काही महत्त्वाच्या गोष्टी माहित असणे आवश्यक आहे. नेहमी ड्रायव्हिंग करताना ड्रायव्हिंगशी संबंधित आणि गाडीशी संबंधित सर्व आवश्यक कागदपत्रे सोबत ठेवणे अतिशय महत्त्वाचे आहे. या अत्यावश्यक कागदपत्रांची हार्ड कॉपी ठेवण्याऐवजी तुम्ही ते डिजीलॉकरमध्येही ठेवू शकता. गाडीसाठी प्रदूषण प्रमाणपत्र, ड्रायव्हिंग लायसन्स, वाहन नोंदणी प्रमाणपत्र आणि वाहन विमा ही मुख्य कागदपत्रे आहेत. यातील एक महत्त्वाचे डॉक्युमेंट म्हणजे PUC अर्थात प्रदूषण प्रमाणपत्र. प्रत्येक गाडीचे PUC म्हणजेच ‘पोल्युशन अंडर कंट्रोल’ प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
पीयूसी प्रमाणपत्राचे वेळोवेळी नूतनीकरण करणे अत्यंत आवश्यक आहे. यासाठी अवघा 50 ते 100 रुपये खर्च येतो. मात्र, पीयूसी नसणाऱ्या किंवा कालबाह्य झालेल्या पीयूसीचे नूतनीकरण न करता वाहने चालवणाऱ्यांना पकडल्यास मोठा दंड तर भरावाच लागतो. पण, पीयूसी नसल्यास चालकाला तुरुंगात देखील जावे लागू शकते. आता अवघ्या 50-100 रुपयांसाठी तुरुंगात जाणे, ही अतिशय लाजिरवाणी गोष्ट ठरू शकते. त्यामुळे वेळोवेळी गाडीच्या पीयूसीचे नूतनीकरण करणे आवश्यक आहे.
PUC नसल्यास लागणारे चलान आणि तुरुंगवासाची तरतूद
मोटार वाहन कायदा, 1993च्या कलम 190(2) अंतर्गत, जर तुम्ही वैध PUC प्रमाणपत्राशिवाय पकडला गेलात, तर लगेचच दंड भरावा लागतो. पीयूसी नसल्यास 6 महिन्यांचा तुरुंगवास किंवा 10 हजार रुपयांपर्यंतचा दंड किंवा दोन्हीही शिक्षा होऊ शकतात. त्याचबरोबर चालकाचे ड्रायव्हिंग लायसन्सही तीन महिन्यांसाठी रद्द केले जाऊ शकते.
कुठे मिळेल पीयूसी?
शिक्षेची तरतूद कळल्यानंतर आता तुम्ही देखील तुमच्या गाडीचे पीयूसी प्रमाणपत्र लगेच तपासून पाहाल. जर, तुमच्या गाडीचे पीयूसी प्रमाणपत्र नसेल, तर ते बनवण्याची प्रक्रिया खूप सोपी आहे. यासाठी तुम्हाला गाडी घेऊन तुमच्या जवळच्या पेट्रोल पंपावरील प्रदूषण तपासणी केंद्रात अर्थात पीयूसी सेंटरवर जावे लागेल. तिथे गेल्यानंतर सेंटरवर उपस्थित असलेले कर्मचारी गाडीची तपासणी करतील. त्यानंतर ते गाडीचे पीयूसी प्रमाणपत्र तुम्हाला देतील. यासाठी फारसा वेळही लागत नाही. तसेच, अवघ्या 50 ते 100 रुपयांचा खर्च येतो.
महत्वाच्या बातम्या :