वाहनांमध्ये BHP आणि CC म्हणजे काय? जाणून घ्या सविस्तर माहिती
Car Engine: अनेक लोक नवीन वाहन खरेदी करताना, कारचा रंग, फीचर्स आणि डिझाइन पाहून ती पसंत करतात. मात्र कारमध्ये फक्त इतकंच पाहणं पुरेसं आहे का? तर नाही. कोणत्याही कारची सर्वात मोठी गोष्ट असते ती म्हणजे त्या कारमधील असलेलं इंजिन.
Car Engine: अनेक लोक नवीन वाहन खरेदी करताना, कारचा रंग, फीचर्स आणि डिझाइन पाहून ती पसंत करतात. मात्र कारमध्ये फक्त इतकंच पाहणं पुरेसं आहे का? तर नाही. कोणत्याही कारची सर्वात मोठी गोष्ट असते ती म्हणजे त्या कारमधील असलेलं इंजिन. ज्यावर वाहनाच्या पॉवरपासून ते मायलेजपर्यंत सगळ्या गोष्टी अवलंबून असते. चला तर मग कारच्या इंजिनबद्दल थोडी माहिती जाणून घेऊ, जेणेकरून कोणतेही वाहन घेताना तुम्हाला त्याचे संपूर्ण गणित कळेल आणि तुम्हाला चांगले वाहन निवडणे सोपे जाईल.
ब्रेक हॉर्स पॉवर (BHP)
सर्वात आधी आपण टॉर्क काय असतं, हे जाणून घेऊ. टॉर्क हे वाहनाच्या इंजिनच्या क्रॅंक शाफ्टमधून तयार होणारी पॉवर असते. म्हणजेच टॉर्क इंजिनसाठी 'पुलिंग फोर्स' म्हणून काम करतो आणि ते इंजिन सुरू करताना वेग वाढवण्यास मदत करते. याशिवाय गीअरबॉक्स, अल्टरनेटर आणि वॉटर पंप एकत्र काम करत असलेल्या घर्षणामुळे पॉवर लॉस झाल्यावर, वाहनाची पॉवर वाचवतो त्याला बीएचपी म्हणतात. हीच वाचलेली पॉवर वाहनाला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेण्यासाठी वापरली जाते.
वाहनातील सीसीचा (CC) अर्थ काय?
दुचाकी असो वा चारचाकी, जवळजवळ सर्व इंधनावर चालणारी इंजिने सीसी म्हणजेच घन क्षमतेच्या आधारावरच इंधन वापरतात. वाहनाची घन क्षमता जितकी जास्त असेल. इंधनाचा वापरही तितकाच जास्त असेल. इंधनावर चालणारी इंजिने केवळ घन क्षमतेने मोजली जातात. त्यामुळे वाहन खरेदी करताना वाहनाचा बीएचपी आणि सीसीही तपासा. जेणेकरून तुम्ही ज्या वाहनाची खरेदी करण्याचा विचार करत आहात त्याची पॉवर क्षमता किती आहे, हे तुम्हाला कळू शकेल. तसेच जर तुम्ही जास्त मायलेज देणारे वाहन शोधत असाल तर तुम्हाला किमान बीएचपी आणि कमी सीसी असलेल्या वाहनाला प्राधान्य द्यावे लागेल. तरच तुम्ही उत्तम मायलेज असलेले वाहन खरेदी करू शकाल.
भारतात कार इंजिनचे किती प्रकार आहेत?
कार इंजिनचे प्रामुख्याने दोन प्रकार आहेत, पेट्रोल आणि डिझेल. लेआउट, इंधन इंजेक्शन तंत्रज्ञान आणि एअर इंडक्शन सिस्टमच्या आधारावर इंजिनचे अनेक श्रेणींमध्ये वर्गीकरण केले जाऊ शकते. आधुनिक कार IC (इंटर्नल कम्बशन) इंजिन वापरतात. पेट्रोल इंजिनमध्ये स्पार्क-इग्निशन सिस्टम असते, तर डिझेल इंजिनमध्ये कॉम्प्रेशन-इग्निशन सिस्टम असते.
इतर महत्वाची बातमी: