Volkswagen Taigun : Volkswagen ची First Anniversary Edition Taigun कार भारतात लॉन्च; पॉवरफुल इंजिनसह मिळतील 'हे' भन्नाट फिचर्स
Volkswagen Taigun First Anniversary edition : नवीन बदलांसह लॉन्च करण्यात आलेल्या Taigun ला आत्तापर्यंत 40,000 हून अधिक ग्राहकांच्या ऑर्डर मिळाल्या आहेत.
Volkswagen Taigun First Anniversary edition : जर्मन ऑटो ब्रँड फोक्सवॅगनच्या (Volkswagen) विक्रीला एक वर्ष पूर्ण झाले आहे. आणि याचेच औचित्य साधून कंपनीने आज First Anniversary Edition Taigun ही एक विशेष आवृत्ती लॉन्च केली आहे. ही कार अनेक बदलांसह लॉन्च करण्यात आली आहे.
नवीन बदलांसह लॉन्च करण्यात आलेल्या Taigun ला आत्तापर्यंत 40,000 हून अधिक ग्राहकांच्या ऑर्डर मिळाल्या आहेत. तर 22,000 हून अधिक कार वितरित केल्या गेल्या आहेत. तैगुन फर्स्ट अॅनिव्हर्सरी एडिशन तीन कलर ऑप्शनमध्ये ग्राहकांसाठी उपलब्ध आहे. यामध्ये नवीन 'रायझिंग ब्लू' (Rising Blue) कलर आहे. बरोबरच सोबत कुरकुमा यलो (Curcuma Yellow) आणि वाईल्ड चेरी रेड (Wild Cherry Red) असे तीन अगदी नवीन कलर उपलब्ध आहेत.
Volkswagen Taigun lnternal look and Features :
तैगुनच्या एक्सटर्नल आणि इंटर्नल भागात "पहिली" फर्स्ट अॅनिव्हर्सरी व्हर्जन टॉपलाईन मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक प्रकारांवर आधारित आहे. या कारमध्ये नवीन तपशीलांसह बाह्य आणि आतील भागात एकूण 11 बदल करण्यात आले आहेत. या बदलांमध्ये हाय लक्स फॉग लॅम्प, बॉडी-कलर डोअर गार्निश, ब्लॅक सी-पिलर ग्राफिक्स, ब्लॅक रूफ फॉइल, डोअर-एज प्रोटेक्टर, ब्लॅक मिरर, अॅल्युमिनियम पेडल्ससह विंडो व्हिझर्स यांसारख्या नवीन फिचर्सचा समावेश करण्यात आला आहे.
Volkswagen Taigun Engine :
6-स्पीड मॅन्युअल आणि 6-स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशनसह 1.0L TSI इंजिनसह इंजिन पर्याय आधीसारखेच आहेत. फोक्सवॅगन या कारमध्ये 1.0 TSI 115PS आणि 178 Nm@1750-4500 rpm चा पीक टॉर्क जनरेट करतो. तर 1.5L TSI EVO इंजिन 6-स्पीड मॅन्युअल आणि 7-स्पीड DSG ट्रान्समिशन पर्यायांसह येते.1.5 TSI 5000 ते 6000 rpm श्रेणीमध्ये 150PS (110 kW) आणि 250Nm@1600-3500 rpm चा पीक टॉर्क जनरेट करते. 1.5L TSI EVO इंजिनमध्ये सक्रिय सिलेंडर टेक्नॉलॉजी आणि इंजिन निष्क्रिय स्टार्ट/स्टॉप टेक्नॉलॉजी देखील आहे.
Taigun ने अलीकडेच ग्लोबल NCAPS च्या अद्ययावत क्रॅश टेस्टिंगमध्ये 5 स्टार मिळवले आहेत आणि त्यामुळे नवीन टेस्टिंग संरचनेअंतर्गत दोन्ही चाचण्यांसाठी 5 स्टार मिळवणारी भारतातील पहिली कार ठरली आहे. ड्रायव्हिंगच्या अनुभवाच्या बाबतीत बोलायचे झाल्यास, तैगुन ही 1.5 TSI सह तिच्या रेंजमधील सर्वात दमदारआणि सर्वात पॉवरफुल एसयूव्ही (SUV) आहे.
महत्वाच्या बातम्या :
Car Under 4 Lakh: फक्त चार लाखात घरी घेऊन जा 'या' कार, फीचर्ससोबत मायलेजही आहे जबरदस्त