Car Driving Tips : मॅन्युअली गिअर कार चालवताना 'या' चुका अजिबात करु नका; नाहीतर मजामस्तीत लाखमोलाचा जीव गमवाल!
लांबचा प्रवास असो किंवा डोंगर दऱ्यातील प्रवास असो, गिअरची गाडी सगळ्यात चांगली आहे. मात्र हीच गाडी चालवताना अनेकदा चुका करतात. त्यामुळे गाडी चालवताना कोणत्या चुका करु नये, हे सांगणार आहोत...
Car Driving Tips : देशात आता ऑटोमॅटिक कारला ( Car Driving Tips) पसंती दिली जात आहे, पण अजूनही मॅन्युअल गिअरबॉक्स असलेल्या गाड्यांची संख्या बरीच आहे. मॅन्युअल गिअरबॉक्सने कार चालवताना बहुतांश लोक अशा चुका करतात ज्यामुळे वाहन आणि ड्रायव्हर दोघांचेही नुकसान होऊ शकते. सध्या सगळेच लोक ऑटोमॅटिक कार चालवण्याला पसंती देतात. साधी, सरळ आणि चालवायला सोपी असणारी ऑटोमॅटिक कार महिला देखील वापरतात. मात्र अनेकांना अजूनही गिअर कार चालवण्यात मज्जा वाटते. लांबचा प्रवास असो किंवा डोंगर दऱ्यातील प्रवास असो, गेअरची गाडी सगळ्यात चांगली आहे. मात्र हीच गाडी चालवताना अनेकदा चुका करतात. येथे आम्ही तुम्हाला अशाच 5 मोठ्या चुकांबद्दल सांगत आहोत, ज्या मॅन्युअल गिअरबॉक्सने कार चालवताना कधीही करू नयेत...
क्लच पॅडलवर नेहमी पाय ठेवू नका
गाडीच्या क्लच पेडलवर पाय ठेवू नका. असे केल्याने इंधनाचा वापर जास्त होईल, कारण अशा परिस्थितीत बॅटरीचं नुकसान होण्याची शक्यता असते. तसेच अचानक ब्रेक लावण्याची गरज भासल्यास घाईगडबडीत ब्रेकऐवजी क्लच दाबल्यास अपघात होऊ शकतो. त्यामुळे क्लच पॅडलजवळ राहणारे आणि आजकाल प्रत्येक कारमध्ये आढळणारे डेड पेडल वापरणे चांगले.स्टॉप सिग्नलवर गाडी गिअरमध्ये ठेवू नका
स्टॉप सिग्नलवर इंजिन बंद करायचे नसेल तर कार न्यूट्रलवर ठेवणे हा उत्तम पर्याय आहे. स्टॉप सिग्नलवर गाडी गिअरमध्ये सोडल्यास सिग्नल हिरवा होण्याआधीच क्लचमधून पाय घसरण्याची शक्यता असते. अशावेळी गाडी स्वत:हून पुढे जाते आणि अपघात होऊ शकतो.
वेग वाढवताना चुकीच्या गिअरचा वापर करू नका
वेग वाढवताना वेगानुसार गिअर ठेवा. लोअर गिअरमध्ये जास्त स्पीड ठेवल्यास इंजिनवर दबाव येईल आणि आवाज येऊ लागेल. यामुळे तुमच्या इंधनाचा जास्त वापर होईल. लवकरच इंजिन निकामी होण्याची ही शक्यता आहे. गाडीचे गिअर नेहमी योग्य इंजिन आरपीएम (प्रति मिनिट रिव्होल्युशन) वर बदलले पाहिजे. त्यानुसार एक्सीलरेटर दाबावा.
टेकडीवर चढताना क्लच पॅडल दाबू नका
सहसा टेकडीवर गाडी चढताना लोक क्लच दाबून ठेवतात, जे चुकीचे आहे. असे केल्याने गाडी गिअरलेस होते. अशा वेळी क्लच धरून ठेवल्यास ढाल आल्यावर गाडी मागे सरकू लागते. चढताना गाडी गेअरमध्ये ठेवा आणि गिअर बदलतानाच क्लचचा वापर करा. सतत दाबू नका.
इतर महत्वाची बातमी-