BMW 520D M Sport : BMW 5 सीरीजची नवीन 520D M स्पोर्ट कार लॉन्च; जबरदस्त फीचर्स आणि किंमत पाहा
New BMW Car : BMW 5 सीरिज 520d M Sport ची भारतीय बाजारपेठेतील Lexus ES, Jaguar XF आणि Audi A6 यांच्याशी स्पर्धा करणार आहे.
New BMW Car : दिग्गज कार निर्माता कंपनी बीएमडब्ल्यू (BMW) इंडियाने भारतातील 520d M Sport या 5 सीरिजमधील एक नवीन व्हेरिएंट लॉन्च केलं आहे. या सीरिजची एक्स-शोरुम किंमत 68.90 लाख रुपये ठेवण्यात आली आहे. पण कंपनीने या सीरीजचे दोन व्हेरिएंट बंद केले आहेत. बंद केलेल्या व्हेरिएंटमध्ये 520d लक्झरी लाईन आणि 50 Jahre M एडिशनचा समाविष्ट आहे. आता BMW 5 सीरिज 520d M Sport आणि 530i M Sport अशा दोन व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे.
BMW 5 सीरिज 520d M स्पोर्ट वैशिष्ट्ये काय आहेत?
BMW 5 सीरिजच्या या नवीन 520d M Sport व्हेरिएंटमध्ये अपडेटेड फ्रंट लूक देण्यात आला आहे. तसेच, कारची बॅक प्रोफाईल खूपच स्पोर्टी आहे. या BMW सेडानच्या साईड प्रोफाईलमध्ये 18-इंच अलॉय व्हील्स देण्यात आले आहेत. यात क्रोम एक्झॉस्ट आणि फेंडर्सवर एम बॅजिंगसह ब्लू ब्रेक कॅलिपर आहेत.
वैशिष्ट्ये कशी आहेत?
कंपनीने या कारच्या केबिनमध्ये लेदर स्टिअरिंग व्हील आणि डोअर सिल्सवर M बॅजिंग दिले आहे. कंपनीचे लेझरलाईट टेक्नॉलॉजी, हेड-अप डिस्प्ले, 360-डिग्री कॅमेरा, वायरलेस फोन चार्जिंग आणि हरमन कार्डन साऊंड सिस्टम ही वैशिष्ट्ये या कारमध्ये देण्यात आली आहेत.
इंजिन कसं आहे?
या BMW 5 सीरिजच्या पॉवरट्रेनमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. हे व्हेरिएंटदेखील इतर कारप्रमाणेच 2.0-लिटर डिझेल इंजिनचा वापर केला जातो. हे इंजिन 190 hp पॉवर जनरेट करते. हे इंजिन 8-स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशनसह जोडलेले आहे.
BMW 5 सीरिज 530d आणि M5 Jahre
आत्तापर्यंत BMW 5 सीरिज लाईनअपमधील टॉप व्हेरिएंट 530d होता, जो 3.0-लिटर डिझेल इंजिनसह ऑफर करण्यात आला होता. हे इंजिन 265 hp पॉवर जनरेट करतं. आता BMW 5 सीरिज ही चार सिलेंडर इंजिनसह येणारी मध्यम आकाराची लक्झरी सेडान सेगमेंटमधील एकमेव कार आहे. तसेच, कंपनीने या सीरिजमधील M5 स्पर्धा व्हेरिएंट बंद केलं आहे, ज्यामध्ये 625hp पॉवर जनरेट करणारे V8 इंजिन उपलब्ध होते.
कोणाशी स्पर्धा करणार?
BMW 5 Series 520d M Sport ची भारतीय बाजारपेठेतील Lexus ES, Jaguar XF आणि Audi A6 यांच्याशी स्पर्धा आहे. Lexus ES मध्ये 2487cc पेट्रोल इंजिन आहे, जे 175.67 bhp पॉवर जनरेट करते. जे ऑटोमॅटिक ट्रान्समिशनसह जोडलेले आहे. या कारची एक्स-शोरुम किंमत 59.71 लाख रुपयांपासून सुरु होते.
महत्त्वाच्या बातम्या :
Upcoming Honda SUV: Hyundai Creta ला टक्कर देणार Honda ची नवीन SUV, जुलैपर्यंत बाजारात घेणार एंट्री