(Source: ECI/ABP News/ABP Majha)
सीएनजी वाहनांच्या विक्रीत मोठी घट; 'आम्हाला वाचवा', ऑटो कंपन्यांची सरकारला मागणी
CNG Cars: देशांतर्गत पुरवठ्याला प्रोत्साहन देण्यासाठी गॅस कंपन्यांनी सीएनजीच्या दरात वाढ केली आहे. यावरूनच आता वाहन उत्पादक कंपन्यांनी यात केंद्र सरकारला हस्तक्षेप करण्याची विनंती केली आहे.
CNG Cars Sales Falling: देशांतर्गत पुरवठ्याला प्रोत्साहन देण्यासाठी गॅस कंपन्यांनी सीएनजीच्या दरात वाढ केली आहे. यावरूनच आता वाहन उत्पादक कंपन्यांनी यात केंद्र सरकारला हस्तक्षेप करण्याची विनंती केली आहे. देशात गेल्या एका वर्षात गॅसच्या किमती 50-60 टक्क्यांनी वाढल्या आहेत. ज्यामुळे सीएनजी कारची विक्री आणि बुकिंग 10-15% कमी झाली आहे. हे पाहता सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनने या प्रकरणी सरकारने दखल घेण्याची विनंती केली आहे.
सीएनजी कारच्या विक्रीत घट
ETIG च्या अहवालानुसार, सीएनजी (CNG) वाहनांची विक्री मार्च 2022 मधील मासिक 29,535 युनिट्सवरून जुलैमध्ये 25,480 युनिट्सवर आली आहे. या वर्षी एप्रिलपासून सीएनजी वाहनांच्या विक्रीत सातत्याने घट होत असल्याचे या अहवालात दिसत आहे.
सीएनजीच्या दारात वाढ होण्याचे काय आहे कारण?
या वर्षी जूनमध्ये सरकारने शहर गॅस वितरण कंपन्यांसाठी घरगुती गॅसच्या वितरणाचे प्रमाण वाढवले होते. जेणेकरून सीएनजीच्या दरात होणारी वाढ थांबण्यास मदत होईल. घरगुती गॅस वितरणात मागील तिमाहीतील 85% वरून आता 94% पर्यंत वाढ झाली आहे. ज्यामुळे CGD कंपन्यांचे गॅसचे प्रमाण 17.5 MMSCMD वरून 20.8 MMSCMD पर्यंत वाढेल. याचा अर्थ CGD कंपन्यांसाठी मिश्रित गॅसची किंमत 2 डॉलर एमएमबीटीयू वरून 8 डॉलर एमएमबीटीयू पर्यंत खाली येईल. म्हणजेच जर गॅसच्या किमतीत 1 डॉलर एमएमबीटीयूची कपात झाली. तर पंपावर उपलब्ध असलेल्या किरकोळ गॅसच्या किमती 5-6 रुपये/किलोने कमी होतील.
किती वाढले सीएनजीचे दर?
या महिन्याच्या सुरुवातीला मेट्रो शहरांमध्ये सीएनजी किमती 75-86 रुपये/किलोपर्यंत झाल्या आहेत. गेल्या वर्षी याच वेळी ही किंमत 50 रुपये/किलो होती. महानगर गॅसने गेल्या दोन महिन्यांत सीएनजीच्या किमती 10 रुपये/किलोपेक्षा जास्त वाढवली आहे. तर IGL आणि गुजरात गॅस सारख्या कंपन्यांनी कोणतीही वाढ केलेली नाही. सरकारने घरगुती गॅसचे वितरण वाढवल्यानंतर एमजीएलने सीएनजीच्या किमतीत 6 रुपये/किलोने कपात केली आहे.
सीएनजी कारच्या विक्रीत घट होण्याचे कारण काय?
मिळालेल्या माहितीनुसार, पेट्रोल डिझेल वाहनांच्या खरेदीवर सूट मिळाल्याने आणि सीएनजी कार 80,000 ते 90,000 रुपयांनी महाग झाल्यामुळे या कारची मागणी कमी झाली आहे. आकडेवारीनुसार, जुलै 2022 मध्ये सीएनजी वाहनांच्या विक्रीचा वाटा उद्योगाच्या एकूण वाहन विक्रीपैकी 12% होता.
दरम्यान, देशात विकल्या जाणार्या सीएनजी प्रवासी वाहनांपैकी सुमारे 85% वाहने महाराष्ट्र, गुजरात, उत्तर प्रदेश, हरियाणा आणि दिल्लीमध्ये विकली जातात. मारुती सुझुकी हा सीएनजी कार सेगमेंटमधला सर्वात मोठा ब्रँड आहे. ज्याने 70% पेक्षा जास्त बाजारपेठ काबीज केली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या:
CNG Cars Comparison: Wagon R, Celerio की Santro? कोणती CNG कार बेस्ट?, जाणून घ्या
लाडकी स्विफ्ट सीएनजी व्हेरियंटमध्ये परतली, जाणून घ्या आणखी काय आहे नवीन...