Upcoming SUVs: येत्या काही आठवड्यात लाँच होणार 4 नवीन SUV, जाणून घ्या प्रत्येक मॉडेलचे खास फिचर्स!
येत्या आठवड्यात 4 नवीन कार भारतीय बाजारात लाँच होणार आहेत. किआ सोनेट आज लाँच होणार असून ह्युंदाई क्रेटा एसयूव्ही 16 जानेवारीला बाजारात येणार आहे.
New SUVs in January 2024: येत्या आठवड्यात 4 नवीन कार भारतीय (SUV cars) बाजारात लाँच होणार आहेत. किआ सोनेट आज लाँच होणार असून ह्युंदाई क्रेटा एसयूव्ही 16 जानेवारीला (AUTO news) बाजारात येणार आहे. याशिवाय सिट्रॉन सी३ एअरक्रॉस (Car)ऑटोमॅटिक व्हेरियंट आणि टाटाचा पंच ईव्ही देखील बाजारात येणार आहे. मात्र, या मॉडेल्सच्या लाँचिंगच्या तारखा समोर आलेल्या नाहीत. चला तर मग जाणून घेऊया या नव्या कारचे फिचर्स आणि किंमत...
किआ सोनेट फेसलिफ्ट (Kia Sonet Facelift)
फेसलिफ्ट सोनेट एसयूव्हीमध्ये काही स्टायलिंग बदल आणि अॅडव्हान्स फीचर्स आणि इंटिरिअर असणार आहे. या मिड-लाइफ अपडेटसह, डिझेल-मॅन्युअल इंजिन गिअरबॉक्स कॉम्बिनेशन पुन्हा सादर करण्यात आले आहे, तर पॉवरट्रेन पर्यायात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. 2024 किआ सोनेट फेसलिफ्टमध्ये नवीन 10.25 इंच डिजिटल इंस्ट्रूमेंट क्लस्टर, क्लायमेट कंट्रोल डिस्प्ले, एचव्हीएसी कंट्रोल, ड्राईव्हसाठी टॉगल स्विच आणि ट्रॅक्शन मोड मिळतील. याशिवाय बाहेरूनही अनेक आकर्षक बदल केले जाणार आहेत.
ह्युंदाई क्रेटा फेसलिफ्ट (Hyundai Creta facelift)
ह्युंदाई क्रेटा फेसलिफ्टमध्ये लेव्हल 2 एडीएएस सूटमध्ये 19 फंक्शन्स, ब्लाइंड स्पॉट मॉनिटरिंग सिस्टम, 360 डिग्री कॅमेरा, 8-स्पीकर बोस साउंड सिस्टम, ड्युअल झोन क्लायमेट कंट्रोल आणि ड्युअल 10.25 इंच स्क्रीन देण्यात आली आहे. डॅशबोर्ड आणि एसी व्हेंट नवीन सांता फे आणि एक्सेटरसारखेच ठेवण्यात आले आहेत. 2024 ह्युंदाई क्रेटा फेसलिफ्टमध्ये नवीन 160 बीएचपी, 115 बीएचपीसह 1.5 लीटर टर्बो पेट्रोल इंजिन, 1.5 लीटर पेट्रोल आणि डिझेल इंजिन तसेच 7-स्पीड ड्युअल क्लच ऑटोमॅटिक गिअरबॉक्स देण्यात आला आहे.
टाटा पंच ईव्ही (TATA Punch EV)
टाटा पंच ईव्हीचे फोटो काही दिवसांपूर्वी समोर आले आहेत, येत्या आठवड्यात लाँच होण्याची शक्यता आहे. टाटाची ही चौथी इलेक्ट्रिक ऑफर आहे, जी ब्रँडच्या नवीन ईव्ही-डेडिकेटेड आउटलेटद्वारे उपलब्ध असेल. ग्राहकांना 21,000 रुपये भरून प्री-बुकिंग करता येणार आहे. फ्रंट ट्रंक आणि फ्रंट चार्जिंग सॉकेटसह जेन 2 ईव्ही / ईव्ही अॅक्टिव्हिटी.ईव्ही प्लॅटफॉर्मवर तयार होणारे हे पहिले टाटा मॉडेल आहे. पंच ईव्ही मायक्रो एसयूव्ही, स्टँडर्ड आणि लाँग रेंज अशा दोन व्हेरियंटमध्ये येणार आहे. यात 25 केडब्ल्यूएच आणि 35 केडब्ल्यूएच बॅटरी पॅक देण्यात आले आहेत, जे एसी आणि डीसी फास्ट चार्जिंगला सपोर्ट करतात.
सिट्रॉन सी३ एअरक्रॉस ऑटोमॅटिक (Citroen C3 Aircross Automatic)
सिट्रॉन सी3 एअरक्रॉस ऑटोमॅटिक व्हेरिएंटमध्ये 1.2 लीटर टर्बो पेट्रोल इंजिन आणि 6-स्पीड टॉर्क कन्व्हर्टर ऑटोमॅटिक ट्रान्समिशन देण्यात आले आहे. निवडक डीलरशिपवर त्याचे बुकिंग सुरू झाले आहे. मॅक्स ट्रिममध्ये लेदर कव्हर्ड स्टीअरिंग व्हील, रिअरव्ह्यू कॅमेरा, 17 इंचाचा डायमंड-कट अलॉय व्हील्स, 2 ट्वीटर्ससह 4 स्पीकर, वॉशरसह रियर वायपर, शार्क फिन अँटेना आणि फ्रंट सारखे फिचर्स मिळतील. प्लस व्हेरियंटमध्ये 10.2 इंचाची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टिम, वायरलेस स्मार्टफोन कनेक्टिव्हिटी, कनेक्टेड कार टेक, रियर रूफ व्हेंट, अॅडजस्टेबल हेडरेस्ट, थर्ड रो रिमूवेबल सीट आणि इतर फिचर्स मिळतील.
इतर महत्वाची बातमी-
Svitch CSR 752 : आता आणखी एका नवीन इलेक्ट्रिक बाईकची एन्ट्री, भन्नाट लुक अन् किंमतीमुळे चर्चेत!