Svitch CSR 752 : आता आणखी एका नवीन इलेक्ट्रिक बाईकची एन्ट्री, भन्नाट लुक अन् किंमतीमुळे चर्चेत!
Svitch CSR 752 Electric Bike: अहमदाबाद बेस्ड ईव्ही स्टार्टअपने लॉंचची घोषणा केल्यापासून अवघ्या 90 दिवसाच्या आत कमी वेळेमध्ये आपली पहिली इलेक्ट्रिक बाइक CSR 762 मार्केटमध्ये विक्रीसाठी आणली आहे.
Svitch CSR 752 Electric Bike: अहमदाबाद बेस्ड ईव्ही स्टार्टअपने (Electric Bike) लॉंचची घोषणा केल्यापासून अवघ्या 90 दिवसाच्या आत आपली पहिली इलेक्ट्रिक बाइक CSR 762 मार्केटमध्ये (EV bike) विक्रीसाठी आणली आहे. याची एक्स-शोरूम किंमत 1.90 लाख रुपये एवढी आहे. कंपनीचा (Svitch CSR 752 Electric Bike) असा विश्वास आहे की CSR 752आपल्या सेगमेंटची पहिली इलेक्ट्रिक बाईक आहे ज्यात हेल्मेट (Helmet) ठेवण्यासाठी मोठी जागा देण्यात आली आहे. स्कार्लेट रेड, ब्लॅक डायमंड आणि मोल्टेन मर्करी या तीन कलर ऑप्शनमध्ये तुम्ही ही बाईक खरेदी करू शकतात.
Svitch CSR 752 चे फिचर्स
या बाईकमध्ये दिलेल्या पावर पॅकबद्दल बोलायचं झालं तर यामध्ये 3kW मिड ड्राईव्ह PMS DC इलेक्ट्रिक मोटर आहे जी 10KW (13.4bhp ची पावर) आणि 56Nm टॉर्क चे आउटपुट देते. मोटारला पाॅवर देण्यासाठी याच्यामध्ये 3.6kWh कॅपॅसिटीचा ट्वीन लिथियम आयन बॅटरी पॅक देण्यात आला आहे जो 190km (IDC) पर्यंत रेंज देण्यासाठी चांगला आहे. या बाईकची टॉप स्पीड 120 किलोमीटर प्रति तास आहे. या आणि अशा अनेक फिचर्समुळे ही बाईक सध्या बाजारामध्ये चर्चेचा विषय ठरत आहे.
Svitch CSR 752 डिझाइन
ही बाईक स्टील स्केलटेन फ्रेमवर तयार केली आहे. याच्या फ्रंटला टेलिस्कोपिक फोर्स आणि मागच्या बाजूला मोनो शॉक युनिट देण्यात आला आहे. तसेच ब्रेकिंगसाठी 300mm फ्रंट आणि 280mm रियल डिक्सच्या सोबत कॉम्बि ब्रेकिंग सेटअप दिला आहे. या गाडीचे वजन 155 KG (कर्ब)आहे. या बाइकच्या डिझाईनमुळे ही बाईक मार्केटमध्ये इतर बाईक्समध्ये स्पर्धा निर्माण करण्याची शक्यता आहे.
Svitch CSR 752 रायडिंग मोड्स
या इलेक्ट्रिक बाईक मध्ये 6 रायडिंग मोड देण्यात आले आहेत. याव्यतिरिक्त अजून फिचर्स बद्दल बोलायचे झाले तर यामध्ये मोबाईल चार्जर ,कव्हर, मोबाईल स्टॅन्ड, आयओएस आणि अँड्रॉइड स्मार्टफोन कनेक्टिव्हिटीची सुविधा देण्यात आली आहे.
Svitch CSR 752 चीकोणासोबत असेल स्पर्धा?
या इलेक्ट्रिक बाईकची स्पर्धा सध्या बाजारामध्ये असणाऱ्या टॉर्क क्राटोस , रिवोल्ट आर्वी यासारख्या इलेक्ट्रिक बाईक सोबत होणार आहे. त्यामुळे तुम्ही जर यावर्षी एखादी इलेक्ट्रिक बाईक घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी सीएसआर 752 ही बाईक चांगला पर्याय ठरू शकते.
इतर महत्वाची बातमी-
Discount On Maruti Cars : : मारुतीच्या Nexa कारवर बंपर ऑफर्स; किमान लाखभर रुपये डिस्काऊंट!