(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Auto Expo 2023: 'ही' इटालियन कंपनी भारतात लॉन्च करणार दमदार बाईक, 486 सीसी इंजिनने असेल सुसज्ज
Auto Expo 2023: इटालियन बाईक उत्पदक कंपनी MBP आपली पहिली बाईक M502N भारतात ऑटो एक्सपो 2023 मध्ये लॉन्च करणार आहे.
Auto Expo 2023: इटालियन बाईक उत्पदक कंपनी MBP आपली पहिली बाईक M502N भारतात ऑटो एक्सपो 2023 मध्ये लॉन्च करणार (upcoming bikes in 2023) आहे. MBP (Moto Bologna Passione) हा एक इटालियन ब्रँड आहे, जो चिनी मालकीच्या कंपनीच्या अंतर्गत आणला जात आहे. हा ब्रँड आदिश्वर ऑटो राइड इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (Adishwar Auto Ride India Pvt Ltd) भारतात लॉन्च करत आहे. MBP भारतात ऑटो एक्सपो 2023 मध्ये पदार्पण करेल आणि भारतीय बाजारपेठेतील त्याचे पहिले उत्पादन M502N नेकेड बाईक असेल. यासोबतच चायनीज बाईक ब्रँड Keeway ऑटो एक्सपोमध्ये SR250 निओ-रेट्रो बाईक भारतात लॉन्च करेल.
मिळणार दमदार इंजिन
M502N हे लिक्विड-कूल्ड, 486cc, पॅरलल-ट्विन इंजिनद्वारे समर्थित आहे. जे 8,500 rpm वर 51 bhp पॉवर आणि 6,750 rpm वर 45 Nm टॉर्क जनरेट करते. बाईकचे इंजिन 6-स्पीड गिअरबॉक्सशी जोडलेले आहे.
कोणते मिळणार फीचर्स?
बाईकच्या पुढील बाजूस प्रीलोड-अॅडजस्टेबल फोर्क्स आणि मागील बाजूस मोनोशॉक सस्पेंशन आहे. ब्रेकिंग हार्डवेअरबद्दल बोलायचे झाले तर, याला पुढच्या बाजूला ट्विन डिस्क ब्रेक आणि मागच्या बाजूला सिंगल डिस्क ब्रेक मिळतो. ही बाईक ड्युअल-चॅनल ABS सह येते. ही बाईक 120/60-ZR17 समोर आणि 160/60-ZR17 मागील कास्ट अलॉय रिम्सवर चालते. बाईकमध्ये पिरेली एंजल जीटी टायर्स वापरण्यात आले आहेत, जे बेनेली 502C सारखे आहेत. सीटची उंची 790mm आणि वजन 198kg आहे.
कंपनीने ही बाईक भारतात लॉन्च केल्यावर Benelli Leoncino आणि Moto Morini Cimemezzo ला टक्कर देईल. Keyway आपले आठवे उत्पादन भारतीय बाजारपेठेत - SR250 लॉन्च करणार आहे. Keyway भारतात आधीपासूनच SR125 निओ-रेट्रो बाईक विकत आहे, त्यामुळे बहुधा ती मोठ्या डिस्प्लेसमेंट इंजिनसह समान शैलीची बाईक असेल.
दरम्यान, भारतीय बाजारपेठेत या बाईकची किंमत किती असेल, याबाबत अद्याप अधीकृत माहिती समोर आलेली नाही. तसेच याबाईकमध्ये आणखी कोणते फीचर्स मिळू शकतात, याबाबत अद्याप समजू शकलेलं. कंपनीने अधिकृतपणे ही बाईक भारतात लॉन्च केल्यावर (upcoming bikes in 2023) याची किंमत आणि नेमके फीचर्स कळू शकतील. तसेच ही बाईक कंपनी किती रंग पर्यायसह लॉन्च करते, हे देखील तेव्हाच समजणार आहे.