Upcoming Electric Scooters : आज लॉन्च होणार Ather च्या भन्नाट तीन नवीन इलेक्ट्रिक स्कूटर्स; 'ही' खास वैशिष्ट्ये मिळू शकतात
Ather Upcoming Electric Scooters : लॉन्च झाल्यानंतर 450S ही Ola च्या एंट्री-लेव्हल इलेक्ट्रिक स्कूटर Ola S1 Air शी स्पर्धा करणार आहे.
Upcoming Electric Scooters : भारतात इलेक्ट्रिक स्कूटर्स बनवणाऱ्या एथर एनर्जी या स्टार्टअप कंपनीच्या आज तीन इलेक्ट्रिक स्कूटर्स लॉंच करणार आहे. या संबंधित कंपनीच्या निर्मात्यांनी सोशल मीडियावर टीझर सादर केला आहे. या टीझरमध्ये Ather Energy ची 450S बाईक लॉन्च होणार आहे. जी Ather च्या लाइनअपमधील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटर असण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. पण इतकंच नाही, कारण कंपनीने जारी केलेल्या टीझरमध्ये कंपनी एकाच वेळी तीन वेगवेगळ्या इलेक्ट्रिक स्कूटर्स लॉन्च करणार असल्याचेही समोर आले आहे.
आज लॉन्च होणाऱ्या स्कूटर्सपैकी एक 450S असेल, तर उर्वरित दोन स्कूटर्स कोणत्या असतील कंपनीने या संदर्भात कोणतीही माहिती दिलेली नाही.
Ather 450S बॅटरी पॅक आणि रेंज
Ather च्या नवीन 450S इलेक्ट्रिक स्कूटरबद्दल बोलायचे झाल्यास, ही स्कूटर 3 kWh बॅटरी पॅकसह ऑफर केले जाईल. ज्याची IDC सुरुवातीची रेंज 115 किलोमीटर पर्यंत असेल. आणि या स्कूटरची एक्स-शोरूम किंमत 1.30 लाख रुपये असण्याची शक्यता आहे.
'या' स्कूटरला देणार जबरदस्त टक्कर
बाजारात लॉन्च झाल्यानंतर, 450S ची स्पर्धा ओलाच्या एंट्री-लेव्हल इलेक्ट्रिक स्कूटर Ola S1 Air शी होईल. जी सध्या 1.10 लाख एक्स-शोरूमच्या किमतीत विकली जात आहे.
Ather 450S ची डिझाईन कशी असेल?
Ather 450S ने 450X प्रमाणेच शैलीचे अनुसरण करणे अपेक्षित आहे. स्पोर्टी आणि शार्प स्टायलिंग हे एथर स्कूटरच्या प्रमुख यूएसपींपैकी एक आहे. ईव्ही मेकर या स्कूटर कंपनीमध्ये ती सुरू ठेवणार आहे. आगामी Ather 450S मध्ये स्पोर्टी दिसणारे एलईडी हेडलॅम्प, स्लीक टर्न इंडिकेटर, सी-साईज एलईडी टेललाइट, स्पोर्टी ब्लॅक अलॉय व्हील्स इत्यादींसह समान कर्वी फ्रंट काउल मिळेल.
नॉन-टच एलसीडी डिस्प्ले
नवीन Ather 450S चे इन्स्ट्रुमेंट क्लस्टर 450X च्या फुल टचस्क्रीन डिस्प्लेच्या तुलनेत नॉन-टच LCD डिस्प्लेसह येईल.450X वरील नेव्हिगेशनल सिस्टीमच्या तुलनेत 450X मध्ये काही नेव्हिगेशनल फरक असण्याची अपेक्षा आहे.
Ather 450X चा वेग किती?
रायडर्सच्या वजनावर अवलंबून, एथर 450X सुमारे 90 किमी प्रतितास इतका वेग वाढवू शकतो. ही स्कूटर फक्त 3.3 सेकंदात 0-40 किमी प्रतितास वेग गाठू शकते. स्कूटरवरील मोड खूपच आकर्षक आहे.
Ather 450X ची किंमत किती?
Ather Energy ने आगामी 450S इलेक्ट्रिक स्कूटरच्या किंमतीचे तपशील आधीच उघड केले आहेत. ही स्कूटर सुरुवातीच्या 1,29,999 रुपये (एक्स-शोरूम) किंमतीत उपलब्ध असेल.
महत्त्वाच्या बातम्या :