Electric vehicles: देशात इलेक्ट्रिक कार तेजीत, गेल्या आर्थिक वर्षात EV च्या विक्रीत तीन पटीने वाढ
Electric Vehicles Sale: देशात इलेक्ट्रिक वाहनांच्या विक्रीत (EVs Sale) सातत्याने वाढ होत आहे. इलेक्ट्रिक वाहनांकडे सर्वसामान्यांचा कल वाढताना दिसत आहे.

Electric Vehicles Sale: देशात इलेक्ट्रिक वाहनांच्या विक्रीत (EVs Sale) सातत्याने वाढ होत आहे. इलेक्ट्रिक वाहनांकडे सर्वसामान्यांचा कल वाढताना दिसत आहे. पेट्रोल-डिझेलच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याने वाहनचालकही इलेक्ट्रिक वाहनांचा अवलंब करत आहेत. गेल्या आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये, देशात इलेक्ट्रिक वाहनांच्या (EVs) किरकोळ विक्रीत तीन पटीने वाढ झाली आहे.
4 लाखांचा टप्पा केला पार
इलेक्ट्रिक वाहनांची विक्री तीन पटीने वाढली असून चार लाख युनिट्सचा आकडा पार केला आहे. ईव्हीच्या विक्रीत दुचाकी क्षेत्राचा वाटा सर्वात मोठा आहे. फेडरेशन ऑफ व्हेईकल डीलर्स असोसिएशनने (FADA) जाहीर केलेल्या आकडेवारीतून ही माहिती मिळाली आहे.
आधी इतकी होत होती विक्री
इलेक्ट्रिक वाहनांची एकूण किरकोळ विक्री आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये तिपटीने वाढून 4,29,217 युनिट्सवर गेली आहे. जी मागील आर्थिक वर्ष 2020-21 मध्ये 1,34,821 युनिट्स होती.
टाटा आघाडीवर
FADA नुसार, 2019-20 मध्ये देशात 1,68,300 इलेक्ट्रिक वाहनांची विक्री झाली. गेल्या आर्थिक वर्षात इलेक्ट्रिक प्रवासी वाहनांची किरकोळ विक्री 2020-21 मध्ये 4,984 युनिट्सवरून तीन पटीने वाढून 17,802 युनिट्सवर गेली. या सेगमेंटमध्ये देशांतर्गत वाहन उत्पादक कंपनी टाटा मोटर्स 15,198 युनिट्सच्या विक्रीसह आघाडीवर होती. या विक्रीत टाटाचा बाजार हिस्सा 85.37 टक्के होता. 2020-21 मध्ये कंपनीने 3,523 युनिट्सची विक्री केली होती.
FADA ने RTO कडून मिळवला डेटा
FADA ने 1,605 पैकी 1,397 प्रादेशिक परिवहन कार्यालयांकडून (RTOs) डेटा मिळवला आहे. याबाबत माहिती देताना FADA ने सांगितले की, गेल्या आर्थिक वर्षात इलेक्ट्रिक थ्री-व्हीलरची विक्री 1,77,874 युनिट्सपर्यंत वाढली आहे. जी मागील आर्थिक वर्षात 88,391 युनिट्स होती. त्याचप्रमाणे इलेक्ट्रिक कमर्शियल वाहनांची विक्री 400 युनिट्सवरून 2,203 युनिट्सपर्यंत वाढली आहे.
महत्वाच्या बातम्या :























