Electric Car : किंमत कमी आणि प्रवासही सुरक्षित; 'या' आहेत भारतातील 5 इलेक्ट्रिक कार
Affordable Electric Car : Hyundai कारमध्ये 39.2 kWh क्षमतेचा बॅटरी पॅक उपलब्ध आहे. ही कार एका चार्जवर 452 किमी धावू शकते.
![Electric Car : किंमत कमी आणि प्रवासही सुरक्षित; 'या' आहेत भारतातील 5 इलेक्ट्रिक कार Affordable Electric Car these 5 electric cars are available in india at very low price marathi news Electric Car : किंमत कमी आणि प्रवासही सुरक्षित; 'या' आहेत भारतातील 5 इलेक्ट्रिक कार](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/08/23/343895e4a9edea93aa680a343ea477a91661237087087358_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Affordable Electric Car : भारतात इलेक्ट्रिक कारचा (Electric Car) विस्तार झपाट्याने वाढत आहे. अर्थाच इलेक्ट्रिक वाहनांकडे ग्राहकांचा कल अधिक असल्याने कारची मागणी वाढतेय. इंधनावर चालणाऱ्या कारच्या तुलने इलेक्ट्रिक कारची किंमत तुलनेने खूप महाग असल्या कारणाने या कार खरेदी करणे अनेकांना परवडत नाही. अशात जर तुम्ही इलेक्ट्रिक कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आम्ही तुमच्यासाठी अशाच काही इलेक्ट्रिक कारबद्दल सांगणार आहोत. ज्या भारतीय बाजारापेठेत अत्यंत किफायतशीर किंमतीत उपलब्ध आहेत. या इलेक्ट्रिक कारच्या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात.
1. Hyundai Kona EV :
या Hyundai कारमध्ये 39.2 kWh क्षमतेचा बॅटरी पॅक उपलब्ध आहे. ही कार एका चार्जवर 452 किमी धावू शकते. ही कार फक्त एका तासात 0-80% पर्यंत फास्ट चार्जरने चार्ज केली जाऊ शकते. या कारची एक्स-शोरूम किंमत 23.79 लाख रुपये आहे.
2. टाटा टिगोर ईवी (Tata Tigor EV) :
Tata Tigor EV या कारमध्ये 55 kW (74.7 PS) मोटरद्वारे उपलब्ध आहे. जी 26 kWh लिथियम-आयन बॅटरी पॅकशी जोडलेली आहे. ही कार 306 किलोमीटरपर्यंतची रेंज देते. ते फक्त 5.7 सेकंदात 0-60 किमी प्रतितास वेग पकडू शकते. या कारची एक्स-शोरूम किंमत 12.49 लाख रुपये आहे.
3. टाटा नेक्सॉन ईव्ही प्राईम (Tata Nexon EV Prime) :
Tata Nexon EV Prime या कारला 30.2 kWh लिथियम-आयन बॅटरी पॅक मिळतो. या कारमधून 312 किमीचा पल्ला गाठता येतो. फास्ट चार्जरच्या मदतीने ही कार फक्त 1 तासात 10-80% पर्यंत चार्ज केली जाऊ शकते. या कारची सुरुवातीची किंमत 14.99 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे.
4. MG ZS EV :
MG ZS EV ही MG कार 419 किलोमीटरची रेंज देते आणि 44-kWh लिथियम बॅटरी पॅकद्वारे उपलब्ध आहे. हे फक्त 50 मिनिटांत 0-80% फास्ट चार्जरवरून चार्ज केले जाऊ शकते. या कारची एक्स-शोरूम किंमत 20.99 लाख रुपये आहे.
5. टाटा नेक्सॉन इलेक्ट्रिक कार मॅक्स (Tata Nexon EV Max) :
Tata Nexon EV Max या कारला 40.5 kWh लिथियम-आयन बॅटरी पॅक मिळतो. यात Tata Nexon Prime पेक्षा थोडे अधिक फिचर्च आहेत. ही कार एका चार्जमध्ये 437 किमी पर्यंत धावू शकते. या SUV ची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत रु. 18.34 लाख आहे.
महत्वाच्या बातम्या :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)