Volkswagen mid-size sedan : 'या' दिवशी लॉन्च होणार फॉक्सवॅगनची मिड-साईज सेडान, मिळणार जबरदस्त फीचर्स
Volkswagen mid-size sedan : जर्मन वाहन उत्पादक कंपनी फॉक्सवॅगन लवकरच भारतात आपली नवीन मिड-साईज सेडान लॉन्च करणार आहे.
Volkswagen mid-size sedan : जर्मन वाहन उत्पादक कंपनी फॉक्सवॅगन लवकरच भारतात आपली नवीन मिड-साईज सेडान लॉन्च करणार आहे. कंपनी आपल्या कराल Virtus असं नाव देऊ शकते. फॉक्सवॅगन सेडान ही MQB A0 IN प्लॅटफॉर्मवर आधारित आहे. जी कंपनीने मागील वर्षी लॉन्च केलेल्या Taigun SUV सारखीच आहे. कंपनीने यात अनेक नवीन फीचर्स दिले आहेत. ही कार दक्षिण अमेरिकेत आधीच लॉन्च करण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत ही कार सादर करण्याआधी कंपनी भारतात या कारला 8 मार्च रोजी लॉन्च करणार आहे. मार्च महिन्यात भारतात आणखीन एक सेडान कार skoda slavia (दोन इंजिन पर्याय 1.0-लिटर इंजिन आणि 1.5-लिटर इंजिन) लॉन्च होणार आहे.
इंजिन
फॉक्सवॅगनने आपल्या या नवीन कारमध्ये 1.0-litre TSI टर्बो पेट्रोल इंजिन देऊ शकते. हे इंजिन 110 bhp पॉवर जनरेट करते. या व्यतिरिक्त यामध्ये 1.5 लीटर इंजिन दिले जाऊ शकते. जे 150 एचपी पॉवर आणि 250 न्यूटन मीटर टॉर्क जनरेट करेल. हे इंजिन 6-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स आणि 6-स्पीड ऑटोमॅटिक टॉर्क कन्व्हर्टरसह येते. लॉन्च झाल्यानंतर या सेगमेंटमध्ये फॉक्सवॅगन कारची स्पर्धा Hyundai Verna, Maruti Suzuki Ciaz आणि Honda City यांच्याशी होईल.
पुण्याच्या प्लांटमध्ये उत्पादन सुरू
फोक्सवॅगन इंडियाचा पुण्यातील चाकण येथे स्वतःचा वाहन उत्पादन प्लांट आहे. ज्याची उत्पादन क्षमता वार्षिक 2 लाख युनिट्स इतकी आहे. कंपनी या प्लांटमध्ये पोलो, Taigun आणि व्हेंटो या कारचे उत्पादन करते. भारतात विक्री होणारे टिगुआन कारचे असेंबल हे कंपनीच्या औरंगाबाद येथील SAVWIPL प्लांटमध्ये केले जाते.
हे ही वाचा :
- Tata Nexon vs MG ZS Facelift : Tata Nexon इलेक्ट्रिक आणि MG ZS EV कारचा नवीन लूक, जाणून घ्या फीचर्स आणि बरंच काही...
- Tesla Car : थांबायला सांगितलं तरी न ऐकणाऱ्या ड्रायव्हरलेस टेस्ला कार परत बोलावणार
- Maruti Suzuki Baleno : फेब्रुवारीमध्ये लाँच होणार नवी मारुती सुझुकी बलेनो, 6 एअरबॅग आणि AMT फीचर
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha