Aurangabad News : ऐतिहासिक 'राज' सभेचे साक्षीदार व्हा, औरंगाबादमध्ये मनसेच्या कार्यकर्त्यांनी लावले होर्डिंग
1 मे ला मसेने अध्यक्ष राज ठाकरे यांची औरंगाबादमध्ये जाहीर सभा होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर औरंगाबादमध्ये राज ठाकरेंच्या सभेला येण्याचं आवाहन करणारे होर्डिंग लावले आहेत.
Aurangabad News : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांची 1 मे ला महाराष्ट्र दिनादिवशी औरंगाबादमध्ये जाहीर सभा होणार आहे. या मुद्यावरुन सध्या राजकीय वर्तुळात आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. अनेक संघटनांनी राज ठाकरेंच्या सभेला विरोध केला आहे. मात्र, असे असतानाही राज ठाकरे यांची औरंगाबादमध्ये जाहीर सभा होणारच असा पवित्रा मनसेने घेतला आहे. या सभेच्या पार्श्वभूमीवर मनसेने पूर्ण तयारी केली आहे. मनसैनिकांनी औरंगाबाद शहरात वेगवेगळ्या भागात राज ठाकरे यांच्या सभेला येण्याचं आवाहन करणारे मोठे होर्डिंग लावले आहेत. यावर ऐतिहासिक राज सभेचे साक्षीदार व्हा असे आवाहन करण्यात आले आहे.
औरंगाबादच्या मराठवाडा सांस्कृतिक मैदानात राज ठाकरे यांची 1 मे ला सभा होणार आहे. मात्र, त्या सभेपूर्वीच वादंग निर्माण झाल्याचे पाहायला मिळत आहे. राज ठाकरेंच्या सभेला मोठ्या प्रमाणात विरोध होताना दिसत आहे. एकीकडे मनसेने राज ठाकरेंच्या सभेसाठी तयारी सुरु केली असताना दुसरीकडे विरोध केला जात आहे. सध्याची परिस्थिती, रमाजानचा महिना आणि कायदा-सुव्यवस्थेचा मुद्दा असे विविध विषय उपस्थित करत अनेक संघटना दररोज पोलीस आयुक्तांना भेटून राज ठाकरेंच्या सभेला परवानगी देऊ नये अशी निवेदनं दिली जात आहेत आहे.
राज ठाकरेंच्या या सभेच्या परवानगीबाबत पोलिसांनी अद्याप निर्णय घेतला नाही. त्यामुळे मनसे आक्रमक झाली आहे. पोलिसांनी परवानगीबाबत लवकर योग्य तो निर्णय घ्यावा, अन्यथा आम्ही कोर्टात जाऊ असा इशारा मनसेचे नेते प्रकाश महाजन यांनी दिला आहे. त्यामुळे आता पोलीस प्रशासन आता याबाबत काय निर्णय घेणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. दरम्यान, मराठवाडा सांस्कृतिक मैदानाऐवजी सिडको परिसरात असलेल्या गरवारे स्टेडियममध्ये सभेसाठी परवानगी देण्याची तयारी पोलिसांनी दर्शवली आहे. मराठवाडा सांस्कृतिक मैदानावर प्रवेशासाठी आणि बाहेर पडण्यासाठी एकच दरवाजा आहे. गेल्या अनेक दिवसांपासून मनसेच्या सभेला विरोध वाढत आहे. त्यामुळे मनसेच्या या सभेला गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अनुचित प्रकार घडला तर लोकांना त्रास होईल, असं पोलिसांचं म्हणणं आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
- आय रिपीट, राष्ट्रपती राजवटीच्या धमक्या द्यायच्या नाहीत; संजय राऊतांचा हल्लाबोल
- Ravi Rana : शिवसैनिकांकडून गुंडगिरी, आम्ही मातोश्रीवर जाणारच, फेसबुक लाईव्ह करत रवी राणांची माहिती