एक्स्प्लोर

आय रिपीट, राष्ट्रपती राजवटीच्या धमक्या द्यायच्या नाहीत; संजय राऊतांचा हल्लाबोल

Sanjay Raut on Navneet Rana : आय रिपीट, राष्ट्रपती राजवटीच्या धमक्या द्यायच्या नाहीत; संजय राऊतांचा हल्लाबोल

Sanjay Raut on Navneet Rana : महाराष्ट्रात शिवसेनेला आव्हान देण्यासाठी सात जन्म घ्यावे लागतील. शिवसैनिक आता गप्प बसणार नाहीत, असं म्हणत शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी राणा दाम्पत्यांवर हल्लाबोल केला आहे. तसेच, बायकांच्याआडून भाजप शिखंडीचे उद्योग करत आहेत, असं म्हणत संजय राऊत यांनी भाजपवर थेट निशाणा साधला आहे. 

शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले की, "कुणाच्यातरी पाठबळात तुम्ही आमच्या मातोश्रीत घुसण्याचा प्रयत्न करत असाल, मुंबईत येऊन, तर शिवसैनिक काय स्वस्थ बसतील का? कायदा आणि सुव्यवस्थेच्या गोष्टी आम्हाला सांगू नका. कायदा आणि सुव्यवस्था काय आहे? आणि सरकारनं, मुख्यमंत्र्यांनी काय केलं पाहिजे? हे सल्ले तुमच्याकडून ऐकून अंमलबजावणी करण्या इतपत महाराष्ट्राला भिकारीपण आलेलं नाही. तुम्ही आमच्या मातोश्रीत घुसताय, हिंमत नाही घुसण्याची पण बदनाम करताय, कोण तुम्ही ? तुम्ही कोण आहात? तुम्ही तुमच्या लायकीप्रमाणे राहा, तुम्ही जर तुमची लक्ष्मणरेषा ओलांडली, तर मग शिवसैनिकांनाही चिडून तुमच्या घरापर्यंत घुसण्याचा अधिकार आहे."

"आम्हाला धमक्या देऊ नका. राष्ट्रपती राजवट लागेल, केंद्रीय तपास यंत्रणा येतील, या धमक्या देऊ नका. हिंमत असेल तर सीबीआय लावा, ईडी लावा. आम्हाला त्रास द्या. आम्ही तुम्हाला घाबरत नाही. आता शिवसैनिकांवर कोणाचाही कंट्रोल नाही. अजून काहीच सुरु झालेलं नाही. दोन दिवसांपासून ज्या घटना पाहताय तुम्ही मुंबईत. या फक्त शिवसैनिकांच्या भावनांचा उद्रेक नाही, तर जनतेच्या भावनांचा हा स्फोट आहे. मी सध्या नागपुरात आहे. मी इथून सगळं वातावरण पाहतोय. तुम्ही आमच्या घरात घुसण्याचा प्रयत्न कराल, तर तुम्हालाही घरं आहेत. हे लक्षात घ्या.", असं संजय राऊत म्हणाले. तसेच, "केंद्रीय यंत्रणांचा वापर करुन तुम्ही आमच्या घरात घुसण्याचा प्रयत्न कराल, तर आम्हाला आमच्या रक्षणासाठी पोलिसांचीही गरज नाही. शिवसैनिक सक्षम आहेत. आणि शिवसैनिक सदैव मरायला आणि मारायला तयार असतो. सरकार असल्यामुळं नक्की आमचे हात बांधले गेले आहेत." असंही ते म्हणाले. 

...तर हजारो, लाखो शिवसैनिक स्वस्थ बसणार नाहीत : संजय राऊत 

संजय राऊत म्हणाले की, "सरकार स्पॉन्सर्ड, पोलीस स्पॉन्सर्ड मग तुम्ही काय करताय? केंद्र सरकार स्पॉन्सर्ड, केंद्रीय पोलीस दल स्पॉन्सर्ड... ही तुमची जी गुंडगिरी आहे ना, झुंडशाही. याच झुंडशाहीला शिवसैनिकांनी त्याच झुंडशाहीनं उत्तर दिलं, तर तुम्हाला का मिरच्या झोंबतायत? कशासाठी? तुम्ही जर आमच्यावरती हात उचलण्याचा प्रयत्न केला, तर तो शिवसैनिक आहे, हा महाराष्ट्र आहे. हजारो, लाखो शिवसैनिक स्वस्थ बसणार नाहीत."

राष्ट्रपती राजवटीची धमकी देणाऱ्या भाजपला राऊतांकडून बाळासाहेबांच्या 'त्या' वाक्याची आठवण 

"आय रिपीट, राष्ट्रपती राजवटीच्या धमक्या द्यायच्या नाहीत. लावा राजवट. माझं आत्ताच मुख्यमंत्र्यांशी बोलणं झालं. राष्ट्रपती राजवट, सीबीआय, ईडी यापलिकडे आम्ही गेलोय. सत्तेची पर्वा आम्हाला नाही. बाळासाहेबांचं एक अजरामर वाक्य आहे. आम्ही सत्तेसाठी जन्माला आलो नाही, सत्ता आमच्यासाठी आली आहे. सत्ता फक्त खुर्चीची नसते. शिवसेना हीच एक पॉवर. तुम्हाला जर त्याचा चटका घ्यायचा असेल, तर तुम्ही घेऊ शकता. यापूर्वी लोकांनी घेतलाय. जे होतंय ते होऊन जाऊ देत. एकदाच होईल." , असं संजय राऊत म्हणाले. 

बायकांच्याआडून भाजप शिखंडीचे उद्योग करत : संजय राऊत

"बायकांच्या आडून भाजप शिखंडीचे उद्योग करत आहेत. ही X#@$% बंद करा.", असं म्हणत संजय राऊतांनी भाजपवर थेट निशाणा साधला आहे. तसेच, या प्रकरणात मोठं आम्ही करत नाही, कालपर्यंत हिंदुत्वावर हल्ले करणारे हे जे बंटी आणि बबली आहेत. त्यांना भाजप किंवा इतर काही नव हिंदुत्ववादी आहेत. त्यांना मोठं करण्याचं काम भाजप करत आहे. पण त्यामध्ये त्यांचेच हात जळणार आहेत.", असं राऊत म्हणाले. 

महत्त्वाच्या इतर बातम्या :

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

शॉकिंग! आधी खिडक्या सील, सावधगिरीची सूचना लिहिली; तरुणाने 'कार्बन मोनॉक्साईड' घेऊन संपवले जीवन
शॉकिंग! आधी खिडक्या सील, सावधगिरीची सूचना लिहिली; तरुणाने 'कार्बन मोनॉक्साईड' घेऊन संपवले जीवन
Hinjewadi Bus Fire : चालकानेच टेम्पो ट्रॅव्हल्स पेटवली;हिंजवडी जळीत कांडात मोठं ट्विस्ट
Hinjewadi Bus Fire : चालकानेच टेम्पो ट्रॅव्हल्स पेटवली;हिंजवडी जळीत कांडात मोठं ट्विस्ट
मोठी बातमी! छत्तीसगडमध्ये 30 नक्षलवाद्यांचा खात्मा, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता, एक जवान शहीद  
मोठी बातमी! छत्तीसगडमध्ये 30 नक्षलवाद्यांचा खात्मा, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता, एक जवान शहीद  
Video: सीबीएसई पॅटर्न यंदाच्या वर्षी फक्त पहिलीलाच, कुठलीही फी वाढ नाही; शिक्षणमंत्र्यांनी दिली A टू Z माहिती
Video: सीबीएसई पॅटर्न यंदाच्या वर्षी फक्त पहिलीलाच, कुठलीही फी वाढ नाही; शिक्षणमंत्र्यांनी दिली A टू Z माहिती
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Nagpur Rada Mastermind : कोण आहे नागपूर हिंसाचाराचा मास्टरमाईंड? ते अकाउंट कोणाचं?Yujvendra Chahal Divorced : युजवेंद्र चहल-धनश्री वर्माचा अखेर घटस्फोट, फॅमिली कोर्टाकडून मंजूरीZero Hour : दिशा सालियनच्या कुटुंबावर दबाव?  आदित्य ठाकरे अडचणीत येणार?Special Report on Aaditya Thackeray : दिशाच्या वडिलांची याचिका, आदित्य ठाकरे अडचणीत येणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शॉकिंग! आधी खिडक्या सील, सावधगिरीची सूचना लिहिली; तरुणाने 'कार्बन मोनॉक्साईड' घेऊन संपवले जीवन
शॉकिंग! आधी खिडक्या सील, सावधगिरीची सूचना लिहिली; तरुणाने 'कार्बन मोनॉक्साईड' घेऊन संपवले जीवन
Hinjewadi Bus Fire : चालकानेच टेम्पो ट्रॅव्हल्स पेटवली;हिंजवडी जळीत कांडात मोठं ट्विस्ट
Hinjewadi Bus Fire : चालकानेच टेम्पो ट्रॅव्हल्स पेटवली;हिंजवडी जळीत कांडात मोठं ट्विस्ट
मोठी बातमी! छत्तीसगडमध्ये 30 नक्षलवाद्यांचा खात्मा, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता, एक जवान शहीद  
मोठी बातमी! छत्तीसगडमध्ये 30 नक्षलवाद्यांचा खात्मा, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता, एक जवान शहीद  
Video: सीबीएसई पॅटर्न यंदाच्या वर्षी फक्त पहिलीलाच, कुठलीही फी वाढ नाही; शिक्षणमंत्र्यांनी दिली A टू Z माहिती
Video: सीबीएसई पॅटर्न यंदाच्या वर्षी फक्त पहिलीलाच, कुठलीही फी वाढ नाही; शिक्षणमंत्र्यांनी दिली A टू Z माहिती
भारत सरकारचे अधिकारी कंटेंट ब्लॉक करत आहेत, हा आयटी कायद्याचा दुरुपयोग सुरुय! एलॉन मस्क यांच्या X ची केंद्र सरकारविरोधात याचिका
भारत सरकारचे अधिकारी कंटेंट ब्लॉक करत आहेत, हा आयटी कायद्याचा दुरुपयोग सुरुय! एलॉन मस्क यांच्या X ची केंद्र सरकारविरोधात याचिका
हिंजवडीतील टेम्पो जळीतकांड अपघात नसून घातपात; पोलिसांनी लावला छडा, ड्रायव्हरनेच टॅम्पो जाळला
हिंजवडीतील टेम्पो जळीतकांड अपघात नसून घातपात; पोलिसांनी लावला छडा, ड्रायव्हरनेच टॅम्पो जाळला
बीडमध्ये आणखी एका गुन्हेगारी टोळीवर मकोका, तीन महिलांचा समावेश; SP नवनीत कावत अ‍ॅक्शनमोडमध्ये
बीडमध्ये आणखी एका गुन्हेगारी टोळीवर मकोका, तीन महिलांचा समावेश; SP नवनीत कावत अ‍ॅक्शनमोडमध्ये
नाशिकमध्ये काय चाललंय काय? रंगपंचमीचं दुहेरी हत्याकांड ताजं असताना टोळक्याच्या मारहाणीचा Video समोर
नाशिकमध्ये काय चाललंय काय? रंगपंचमीचं दुहेरी हत्याकांड ताजं असताना टोळक्याच्या मारहाणीचा Video समोर
Embed widget