(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Jayakwadi: जायकवाडीचा पाणीसाठा 62 टक्क्यांवर; सलग चौथ्या वर्षी धरण शंभर टक्के भरण्याची शक्यता
Jayakwadi Water Storage: जायकवाडी धरणात जुलै महिन्यातच मोठ्याप्रमाणावर आवक सुरु झाल्याने पाणीसाठा 62 टक्के झाला आहे.
Jayakwadi Water Storage: मराठवाड्यातील जनतेसाठी आनंदाची बातमी असून, जायकवाडी धरण 62.96 टक्के भरला आहे. विशेष म्हणजे गेल्यावर्षी जुलैअखेर सुरु झालेली पाण्याची आवक यावेळी जुलैच्या सुरवातीलाच सुरु झाली आहे. धरणात अजूनही 44 हजार 445 क्युसेकने आवक सुरु आहे. त्यामुळे नाशिक जिल्ह्यात पुढील दोन महिन्यात पुन्हा एकदा असाच जोरदार पाऊस झाल्यास सलग चौथ्यावर्षे जायकवाडी धरण शंभर टक्के भरण्याची शक्यता आहे.
सद्याची परिस्थिती...
पाण्याची आवक 44 हजार 445
जिवंत पाणीसाठा 1366.908
धरणाची टक्केवारी 62.96
मागील वर्षी याच दिवशी 34.93
जायकवाडी धरणाची सन 1983 पासून 2021 पर्यंतची महत्वाची आकडेवारी
अ.क्र. | वर्षे | पाणीसाठा |
1 | सन 1983 | 93.87 टक्के |
2 | सन 1988 | 94.4 टक्के |
3 | सन 1990 | 91.04 टक्के |
4 | सन 1991 | 100 टक्के |
5 | सन 1995 | 88.16 टक्के |
6 | सन 1999 | 97.93 टक्के |
7 | सन 2000 | 99.83 टक्के |
8 | सन 2005 | 100 टक्के |
9 | सन 2006 | 100 टक्के |
10 | सन 2007 | 100 टक्के |
11 | सन 2008 | 100 टक्के |
12 | सन 2009 | 100 टक्के |
13 | सन 2019 | 100 टक्के |
14 | सन 2020 | 100 टक्के |
15 | सन 2021 | 100 टक्के |
सलग चौथ्यावर्षे जायकवाडी धरण शंभर टक्के भरण्याची शक्यता
जायकवाडी धरणात जुलै महिन्यातच मोठ्याप्रमाणावर आवक सुरु झाल्याने पाणीसाठा 62 टक्के झाला आहे. अजूनही 44 हजारांची आवक सुरु आहे. तर अजून बराच पाऊस बाकी आहे. त्यामुळे पुढील दोन महिन्यात धरण क्षेत्रात आणि नशिक जिल्ह्यात जोरदार पाऊस झाल्यास जायकवाडी धरण सलग चौथ्यावर्षे धरण शंभर टक्के भरण्याची शक्यता आहे.
महत्वाच्या बातम्या...
Marathwada: मराठवाड्यातील 172 मंडळात अतिवृष्टी; 52 हजार हेक्टरमधील पिकांचे नुकसान
Maharashtra Rain : महाराष्ट्रात पावसाचा हाहा:कार, आतापर्यंत 102 जणांचा मृत्यू