Zero Hour : मेलबर्न कसोटीतही भारतीय फलंदाजांची नांगी, भारताची दुसऱ्या दिवसअखेर 5 बाद 164 अशी अवस्था
ऑस्ट्रेलिया दौऱ्यात पुन्हा एकदा टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मा स्वस्तात बाद झाल्याने त्याच्या भविष्याविषयी अटकळ पुन्हा सुरू झाली आहे. महान फलंदाज सुनील गावसकर '7 क्रिकेट'साठी कॉमेंट्री करताना म्हणाले की, 'हा त्याच्यासाठी कठीण काळ आहे. 'दुसरा डाव आणि सिडनी कसोटी बाकी आहे. या तिन्ही डावांत त्याने धावा केल्या नाहीत, तर प्रश्नचिन्ह निर्माण होणार आहे. चौथ्या कसोटीच्या पहिल्या डावात पॅट कमिन्सने तीन धावा करून बाद झाल्यानंतर रोहित शर्मा कसोटी क्रिकेटमधून कधी निवृत्ती घेणार, असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
तर सिडनी कारकिर्दीतील शेवटची टेस्ट असेल
राष्ट्रीय निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर सुद्धा मेलबर्नमध्ये असून भारतीय संघ बदलाच्या टप्प्यातून जात असल्याने या दोघांनी भविष्याविषयी चर्चा केली असण्याची शक्यता आहे. शेवटच्या आठ कसोटींच्या 14 डावांत 11.07 च्या सरासरीने रोहितने केवळ 155 धावा केल्या आहेत. दुसरीकडे, पहिली कसोटी जिंकून देणाऱ्या बुमराहने मालिकेत आतापर्यंत 25 विकेट घेतल्या आहेत. मालिकेतील पहिली कसोटी बुमराहच्या नेतृत्वात जिंकली होती. त्यामुळे रोहित फॉर्मात नाही आणि स्थिर वाटणाऱ्या सुरुवातीच्या जोडीत बदल केल्याने संघाचा समतोलही बिघडला आहे. जर भारत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलसाठी पात्र ठरू शकला नाही तर सिडनी ही त्याच्या कारकिर्दीतील शेवटची टेस्ट असेल अशी अटकळ बांधली जात आहे.
..