Aurangabad: जिल्हा गणेश महासंघही भाजप-शिंदे गटाच्या ताब्यात; महाविकास आघाडीच्या नेत्यांची उद्घाटनप्रसंगी दांडी
Aurangabad News : कार्यक्रमाच्या ठिकाणी संपूर्ण व्यासपीठ शिंदे गट आणि भाजपमय झाले होते.
Ganeshotsav 2022 : राज्यात पुन्हा एकदा सत्ता काबीज करणाऱ्या भाजपची छाप जिल्हा गणेश महासंघात सुद्धा पाहायला मिळत आहे. तर सोबतीला शिंदे गटाचीही साथ पाहायला मिळाल्याने, जिल्हा गणेश महासंघाच्या कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी दांडी मारली. विशेष म्हणजे कार्यक्रमाच्यावेळी महाविकास आघाडीचे आमंत्रित नेते शहरातच होते. त्यामुळे कार्यक्रमाच्या ठिकाणी संपूर्ण व्यासपीठ शिंदे गट आणि भाजपमय झाले होते.
रविवारी सायंकाळी निराला बाजार येथील चौकात जिल्हा गणेश महासंघाच्या कार्यालयाचे उद्घाटन झाले. आतापर्यंतच्या इतिहासात सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत कार्यालयाचे उद्घाटन झाल्याचा इतिहास आहे. तर राजकीय मतभेद विसरून सर्वच पक्षाचे प्रमुख नेते महासंघाच्या कार्यक्रमात सहभागी होत असतात. मात्र यावेळी गणेशोत्सवात सुद्धा राजकीय मतभेद पाहायला मिळाले. तर पहिल्यांदाच माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी या कार्यक्रमाला दांडी मारली. तर शिवसेना जिल्हाप्रमुख तथा विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे सुद्धा कार्यक्रमात दिसले नाही.सोबतच काँग्रेसचे नेतेही व्यासपीठावर पाहायला मिळाले नाही.
खैरेंचा फोटो लावलाच नाही...
जिल्हा गणेश महासंघाच्या कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी कार्यक्रमाच्या ठिकाणी सर्वच नेत्यांचे होर्डिंग लावण्यात आले होते. मात्र याचवेळी माजी खासदार यांचा होर्डिंग कुठेच पाहायला मिळाला नाही. विशेष म्हणजे राष्ट्रवादीचे नेते राजेश टोपे यांचे होर्डिंग लावण्यात आले होते. मात्र खैरे यांचा होर्डिंग न लावल्याने खैरे समर्थकांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे पहिल्यांदाच जिल्हा गणेश महासंघाच्या कार्यक्रमात राजकीय हेवेदावे पाहायला मिळाले.
व्यासपीठ भाजपमय...
जिल्हा गणेश महासंघाच्या कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी कार्यक्रमाच्या ठिकाणी उभारण्यात आलेलं व्यासपीठ भाजपमय झाल्याचे पाहायला मिळाले. कारण जिल्हा गणेश महासंघाच्या अध्यक्षपदी भाजपचे विजय औताडे यांची निवड करण्यात आली आहे. तर व्यासपीठावर केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, भागवत कराड, सहकार मंत्री अतुल सावे,भाजप आमदार हरिभाऊ बागडे यांच्यासह अनेक भाजप नेते उपस्थित होते. त्यामुळे जिल्हा गणेश महासंघ भाजपमय बनल्याची चर्चा पाहायला मिळत आहे.
शिरसाट यांचीही दांडी...
जिल्हा गणेश महासंघाच्या कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी कार्यक्रमाच्या ठिकाणी भाजप नेत्यांसह शिंदे गटाचे आमदार आणि मंत्रीही उपस्थित होते. मात्र याचवेळी आमदार संजय शिरसाट यांची अनुपस्थिती चर्चेचा विषय बनला. कारण एक दिवस आधीच शांतता बैठकीत चंद्रकांत खैरे यांचे आधी सत्कार केल्याने शिरसाट संतापले होते. या घटनेची मोठी चर्चा झाली. मात्र महासंघाच्या कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी खैरे आणि शिरसाट या दोन्ही नेत्यांनी दांडी मारली.
महत्वाच्या बातम्या...
Aurangabad: आमदार धस यांच्याविरोधात दरोड्याचे कलम वाढवा; औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल