(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Chandrakant Khaire: 'पत्थरबाजी का जवाब जरूर मिलेगा'; चंद्रकांत खैरेंचा शिंदे गटाच्या आमदाराला थेट इशारा
Chandrakant Khaire: आदित्य ठाकरेंच्या कार्यक्रमातील गोंधळाला शिंदे गटाला जबाबदार ठरवत माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी 'पत्थरबाजी का जवाब जरूर मिलेगा'असा इशारा दिला आहे.
Chandrakant Khaire On Shinde Group: युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांच्या शिव संवाद यात्रेदरम्यान औरंगाबादमध्ये (Aurangabad) गोंधळ झाल्याची घटना समोर आली आहे. तर आदित्य ठाकरे यांच्या ताफ्यावर दगडफेक देखील करण्यात आल्याचा आरोप केला जात आहे. दरम्यान या घटनेनंतर राजकीय वातावरण तापले असून, वेगवेगळ्या राजकीय प्रतिक्रिया येत आहे. तर ठाकरे गटाचे नेते तथा औरंगाबादचे माजी खासदार चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांनी यासाठी शिंदे गटाला जबाबदार ठरवत, 'पत्थरबाजी का जवाब जरूर मिलेगा'असा इशारा दिला आहे.
आदित्य ठाकरे यांच्या कार्यक्रमात झालेल्या गोंधळावर प्रतिक्रिया देताना खैरे म्हणाले की, पोलिसांनी काहीच सहकार्य केले नाही. मी पोलिसांना सांगितले की, "शांतता ठेवा. मात्र पोलिसांनी दुर्लक्ष केले असून, त्यांनी लक्ष दिले नाही. त्यामुळे आम्ही सतर्क होतो." पुढे काही झाले असते तर आम्ही काही शांत बसलो असतो का? असेही खैरे म्हणाले. तर आदित्य ठाकरे गेल्यावर कधीना कधी शिंदे गटाचे आमदार रमेश बोरनारे यांना उत्तर देणार आहे. 'पत्थरबाजी का जवाब जरूर मिलेगा' असे म्हणत त्यांनी शिंदे गटाला थेट इशाराच दिला आहे.
शिंदे गटाच्या आमदारानेच घडवून आणला गोंधळ...
दरम्यान या सर्व घटनेला वैजापूरचे शिंदे गटाचे आमदार रमेश बोरनारे जबाबदार असल्याचा आरोप खैरे यांनी केला आहे. आदित्य ठाकरे यांच्या कार्यक्रमात जो काही गोंधळ झाला आहे, तो शिंदे गटाचे आमदार रमेश बोरनारे यांनीच घडवून आणला आहे. लांब बसून बोरनारे यांनी हे कारनामे केले असून, समोर असते तर त्यांना उत्तर दिले असते. सर्व काही सुरळीत असतान मुद्दाम काही लोकांना उचकवण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा आरोप खैरे यांनी केला आहे.
लोकांना दारू पाजून कार्यक्रमात घुसवण्यात आले...
शिंदे गटाचे आमदार रमेश बोरनारे यांनी जाणीवपूर्वक काही लोकांना दारू पाजून आमच्या कार्यक्रमात घुसवले होते. त्या लोकांनी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे थोडी गडबड झाली होती. यात पोलिसांनी दुर्लक्ष केले. मी स्वतः पोलीस महासंचालक यांच्याकडे जाऊन त्यांची भेट घेणार आहे. आदित्य ठाकरे यांना झेड प्लस सुरक्षा असताना अशा घटना घडत आहे. त्यांच्या सुरक्षेतील पाच पोलीस तर गाडी खाली उतरलेच नसल्याचे पाहायला मिळत होते. तर शिवशक्ती आणि भीमशक्ती अशी युती होऊ नयेत म्हणून शिंदे गटाकडून हा कट रचण्यात आल्याचा आरोप देखील खैरे यांनी केला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या: