एक्स्प्लोर

Aditya Thackeray: आदित्य ठाकरे यांच्या ताफ्यावरील हल्ल्यानंतर सुरक्षेत वाढ; यापुढे अतिरिक्त पोलिस तैनात असणार

Aditya Thackeray: ज्या ठिकाणी संवाद आणि मेळावे होतील त्या ठिकाणी स्थानिक पोलिसांकडून अतिरिक्त सुरक्षा पुरवली जाणार आहे. 

Aditya Thackeray Security Increased: युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांच्या 'शिव संवाद' यात्रेचा सातवा टप्पा सुरु असून, मंगळवारी त्यांच्या याच 'शिव संवाद' यात्रेच्या कार्यक्रमात औरंगाबादमध्ये गोंधळ पाहायला मिळाला होता. त्यानंतर आता या सर्व प्रकरणाची दखल पोलिसांकडून घेण्यात आली असून, यापुढे आदित्य ठाकरेंच्या शिवसंवाद यात्रेदरम्यान अतिरिक्त पोलिस तैनात असणार आहे.  ज्या ठिकाणी संवाद आणि मेळावे होतील त्या ठिकाणी स्थानिक पोलिसांकडून अतिरिक्त सुरक्षा पुरवली जाणार आहे. 

आदित्य ठाकरे यांच्या 'शिव संवाद' यात्रेचा सातवा टप्पा सुरु असून, मंगळवारी औरंगाबादच्या वैजापूर तालुक्यातील महालगावात त्यांची सभा सुरु असताना काही लोकांनी गोंधळ घातला होता. तर आदित्य ठाकरे आणि अंबादास दानवे यांची गाडी देखील अडवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. सोबतच आदित्य ठाकरे यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आल्याचा आरोप अंबादास दानवे यांनी केला होता. त्यामुळे या सर्व प्रकरणाची दखल पोलिसांकडून घेण्यात आली आहे. यापुढे आदित्य ठाकरेंच्या शिवसंवाद यात्रेदरम्यान अतिरिक्त पोलिस तैनात असणार असून, ज्या ठिकाणी संवाद आणि मेळावे होतील त्या ठिकाणी स्थानिक पोलिसांकडून अतिरिक्त सुरक्षा पुरवली जाणार आहे. 

अंबादास दानवेंचा पोलीस महासंचालकांना पत्र! 

या सर्व घटनेनंतर अंबादास दानवे यांनी पोलिस महासंचालकांना पत्र लिहले होते. ज्यात, "आदित्य ठाकरे यांचा "शिव संवाद" यात्रेचा महाराष्ट्र दौरा चालू आहे. मंगळवारी 7 फेब्रुवारी 2023 रोजी सायंकाळी 7 च्या सुमारास औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील महालगांव येथे ग्राम सचिवालय समोरील मैदानात जाहीर सभा सुरू असताना तेथे अज्ञात जमावाकडून दगड मारण्यात आला. तर सभा संपवून तेथून निघताना आदित्य ठाकरे यांच्या गाडीवर दगड मारण्यात आले. तसेच सभेच्या ठिकाणी हिंसक जमाव चालून आला. सदर प्रकरणी सुरक्षेमध्ये अक्षम्य कसूर झाली आहे. याची आपण गांभीर्याने नोंद घ्यावी, असे पोलिस महासंचालकांना लिहलेल्या पत्रात म्हटले होते. त्यानंतर आता आदित्य ठाकरे यांच्या  शिवसंवाद यात्रेदरम्यान अतिरिक्त पोलिस तैनात ठेवण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला आहे. 

दगडफेक झालीच नाही, पोलिसांचा दावा 

दरम्यान आदित्य ठाकरे यांच्या ताफ्यावर दगडफेक करण्यात आल्याचे आरोप पोलिसांनी फेटाळून लावले आहे. याबाबत 'एबीपी माझा'शी बोलताना औरंगाबाद ग्रामीण पोलीस दलाचे पोलीस उपअधीक्षक सुनिल लांजेवार म्हणाले की, आदित्य ठाकरे यांची सभा वैजापूर तालुक्यातील महालगाव येथे आयोजित करण्यात आली होती. सभा संपल्यावर आदित्य यांचा ताफा निघाला असताना काही प्रमाणात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. परंतु दगडफेक करण्यात आल्याची कोणतीही घटना घडलेली नाही. तसेच सभा सुरु असताना दगड फेकण्यात आल्याच्या आरोपात कोणतेही तथ्य नसून, आदित्य ठाकरे यांची सभा सुरळीत झाली. त्यामुळे सभेत किंवा आदित्य ठाकरे यांच्या गाडीवर एकही दगड फेकण्यात आल्याची कोणतेही घटना घडली नसल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. 

संबंधित बातम्या: 

औरंगाबादच्या महालगावमध्ये आदित्य ठाकरे यांच्या गाडीच्या ताफ्यावर दगडफेक

15 वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Chhatrapati Sambhajinagar News: इतका वेळ मुलाची समजूत काढणाऱ्या आईने पती-मुलापाठोपाठ स्वत:ही डोंगरावरुन उडी का मारली? मानसोपचारतज्ज्ञांनी सांगितलं धक्कादायक कारण
इतका वेळ मुलाची समजूत काढणाऱ्या आईने पती-मुलापाठोपाठ स्वत:ही डोंगरावरुन उडी का मारली? मानसोपचारतज्ज्ञांनी सांगितलं धक्कादायक कारण
Chhatrapati Sambhaji nagar boy jumps down from mountain: सरपंच म्हणाला, 'आयफोन 15 प्रो देतो', कुणाल हताशपणे गुडघ्यात वाकला अन् उठून म्हणाला,
सरपंच म्हणाला, 'आयफोन 15 प्रो देतो', कुणाल हताशपणे गुडघ्यात वाकला अन् उठून म्हणाला, "आता काहीच सोल्यूशन नाही, एकच सोल्यूशन"
Chhatrapati Sambhajinagar Crime News: बाप मुलाला वाचवायला गेला, दोघेही पडले, मग आईने स्वत:च उडी मारली, संभाजीनगरातील डोंगर कड्यावरील थरार कसा घडला?
बाप मुलाला वाचवायला गेला, दोघेही पडले, मग आईने स्वत:च उडी मारली, संभाजीनगरातील डोंगर कड्यावरील थरार कसा घडला?
Chhatrapati Sambhaji nagar Crime: डोंगरावरुन उडी मारणाऱ्या मुलाला वाचवताना आई-वडिलांचाही मृत्यू, संभाजीनगर हादरलं, अंगावर काटा आणणारी घटना
डोंगरावरुन उडी मारणाऱ्या मुलाला वाचवताना आई-वडिलांचाही मृत्यू, संभाजीनगर हादरलं, अंगावर काटा आणणारी घटना

व्हिडीओ

Laxman Hake Pune : 1 सप्टेंबरला ओबीसींना मुंबईत येण्याचं आवाहन, सरकारने फसवलंय म्हणत हाकेंचा हल्लाबोल!
PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha
Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
Nashik Road Issue : नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, रस्त्यांच्या दर्जाचा प्रश्न ऐरणीवर, पाहा Video
नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, Video व्हायरल
Tarique Rahman India Visit: बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
Tukaram Mundhe: राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
Sugar Price Hike : साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड दोन कारणं सांगत म्हणाले...
साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दोन कारणं सांगितली
'तुझी बहिण घरी चालणार नाही, पोटगीपोटी दीड कोटी दे..' लव्ह मॅरेज केलेल्या ICICI बँक मॅनेजर बायकोची कोर्टात मागणी; व्यथित SBI अधिकाऱ्याने तीन पिस्तूल खरेदी केल्या अन् अवघ्या 30 मिनिटात संपूर्ण कुटुंब संपवलं
'तुझी बहिण घरी चालणार नाही, पोटगीपोटी दीड कोटी दे..' लव्ह मॅरेज केलेल्या ICICI बँक मॅनेजर बायकोची कोर्टात मागणी; व्यथित SBI अधिकाऱ्याने तीन पिस्तूल खरेदी केल्या अन् अवघ्या 30 मिनिटात संपूर्ण कुटुंब संपवलं
Bhiwandi Crime News: जेवणासाठी थांबला; दोघांनी धमकावून लुटण्याचा प्रयत्न केला, ड्रायव्हरनं प्रतिकार करताना मानेवर सपासप वार केले अन्...भिवंडीत मध्यरात्री 2.45 वाजताचा थरार
जेवणासाठी थांबला; दोघांनी धमकावून लुटण्याचा प्रयत्न केला, ड्रायव्हरनं प्रतिकार करताना मानेवर सपासप वार केले अन्...भिवंडीत मध्यरात्री 2.45 वाजताचा थरार
विरोध मोडून काढायला अलीकडे खास अधिकारी जिल्ह्यात पाठवलेत, पण जेल फोडणाऱ्या वसंतदादांचा हा जिल्हा, शक्तिपीठसाठी सरकारचा अतिरेक परतवून लावू; जयंत पाटलांचा सांगली मोर्चात एल्गार
विरोध मोडून काढायला अलीकडे खास अधिकारी जिल्ह्यात पाठवलेत, पण जेल फोडणाऱ्या वसंतदादांचा हा जिल्हा, शक्तिपीठसाठी सरकारचा अतिरेक परतवून लावू; जयंत पाटलांचा सांगली मोर्चात एल्गार
Embed widget