एक्स्प्लोर
औरंगाबादमध्ये अनोळखी अॅपद्वारे मुलींना अश्लील एसएमएस, मुलींची सायबर क्राईमकडे धाव
एका अनोळखी अॅपवरुन मुलींना एसएमएस करुन त्रास दिला जात आहे. या अॅपद्वारे आलेला एसएमएस नेमका कुणी पाठवला आहे? हे लक्षात येत नाही. या एसएमएसमुळे अनेक तरुणी संतापल्या आहेत.

Getty Images)
औरंगाबाद : औरंगाबादेत एका अनोळखी अॅपवरुन मुलींना अश्लील एसएमएस करुन त्रास दिला जात आहे. या अॅपद्वारे आलेला एसएमएस नेमका कुणी पाठवला आहे? हे लक्षात येत नाही. या एसएमएसमुळे अनेक तरुणी संतापल्या आहेत. या तरुणींनी याबाबत औरंगाबादच्या सायबर क्राईम ब्रँचकडे तक्रार केली आहे. अनोळखी अॅपद्वारे मुलींना त्रास देणाऱ्यांचा पोलीस सध्या शोध घेत आहेत.
औरंगाबादेतल्या एका उच्चभ्रू कंपनीमध्ये काम करणार्या एका महिला इंजिनियरला तिच्या बॉसच्या (वरिष्ठ अधिकारी) नावाने कोणीतरी एसएमएस पाठवले. संबंधित महिला इंजिनियरने तिच्या वरिष्ठाला याबाबत विचारणा केली. परंतु त्याच्या फोनमधून असा कोणताही एसएमएस गेला नसल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर तरुणीने सायबर पोलिसात धाव घेतली. तक्रार ऐकल्यानंतर संबंधित पोलीसही चक्रावून गेले.
पोलिसांनी तपास सुरु केल्यानंतर त्यांच्या लक्षात आले की, गुगलच्या प्ले स्टोअरवर असे अनेक अॅप आहेत ज्याद्वारे आपण आपली ओळख लपवून लोकांना एसएमएस पाठवू शकतो. दुसऱ्या कोणाच्याही नावाने एसएमएस पाठवू शकतो.
संबंधित तरुणीने तिच्या मोबाईलवर आलेल्या एसएमएसच्या सोर्सची मागणी केली असता, त्या तरुणीला सोर्स मिळवण्यासाठी 500 रुपये भरावे लागले. अशा प्रकारे या अॅपद्वारे तरुणींना त्रास दिला जात आहे. तसेच लोकांकडून पैसे उकळले जात आहे.
पोलिसांनी याबाबत सांगितले की, सर्वांच्या हातात स्मार्टफोन आहेत. या स्मार्टफोनमध्ये प्ले स्टोअर आहे. या प्ले स्टोअरमधील अॅपद्वारे तरुणींना, महिलांना त्रास दिला जात आहे. त्यामुळे त्यामुळे तरुणींनी आता जागृत होऊन पोलिसांकडे तक्रार करणे गरजेचे आहे. या तक्रारीनंतर संबंधित अॅप प्ले स्टोअरमधून हटवण्याची मागणी पोलीस गुगलकडे करु शकतात.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
कोल्हापूर
विश्व
क्राईम
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
