एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Break The Chain : औरंगाबादमध्ये 'ब्रेक द चेन'चे सुधारित आदेश लागू; जाणून घ्या कोणत्या सेवांना मिळाली शिथिलता

महानगरपालिकेसह संपूर्ण जिल्हयात सर्व बँका कामाचे सर्व दिवस (Working Days) सुरु राहतील.

औरंगाबाद : राज्यातील काही भागांमध्ये कोरोनाच्या धर्तीवर लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनचे परिणाम दिसू लागले असून, यामुळं शासनाच्याच निर्णयांनुसार काही नियमांमध्ये शिथिलता आणली गेली आहे. तर, काही भागांमवर नव्यानं सुधारित नियमावली लागू करण्यात आली आहे. औरंगाबादमध्येही असंच काहीसं चित्र आहे. सुधारित आदेशानुसार कोविड-19 संसर्ग साखळी तोडणे (Break the Chain) सुधारित अटी व शर्ती अंमजबजावणीसाठी वि विध आदेश निर्गमित केले असून, त्यात 16 एप्रिल आणि 12 मे 2021 मधील इतर सर्व बाबी कायम ठेवण्यात आलेल्या असल्याचे जिल्हा प्रशासनानं सांगितलं आहे.  

Maharashtra Lockdown Relaxation : राज्यात कोणकोणत्या जिल्ह्यात लॅाकडाऊन शिथील? काय सुरु, काय बंद?

औरंगाबाद शहर व जिल्हा क्षेत्राकरिता दिनांक 01 जून 2021 रोजीचे सकाळी 07.00 वाजल्यापासून 15 जून 2021 रोजी सकाळी 7.00 वाजेपर्यंत  खालील बाबी संपूर्ण औरंगाबाद जिल्हयासाठी (शहरासह) लागू करण्यात येत आहेत.    
 
1. अत्यावश्यक सेवा :
औरंगाबाद महानगरपालिकासह संपूर्ण जिल्हयात कोविड-19 च्या प्रसारास प्रतिबंधीत करण्यासाठी दिनांक 16 एप्रिल आणि 12 मे 2021 रोजीच्या आदेशातील अत्यावश्यक सेवा (Essential Category) मधील नमूद दुकाने ही आठवडयातील सर्व दिवस सकाळी 07.00 ते दुपारी 02.00 वाजेपर्यंत सुरु राहतील.
 
2. बँक :
औरंगाबाद महानगरपालिकेसह संपूर्ण जिल्हयात सर्व बँका कामाचे सर्व दिवस (Working Days) सुरु राहतील.
 
3. अत्यावश्यक दुकानाव्यतिरिक्त इतर दुकाने  (Non Essential Shops) :
औरंगाबाद महानगरपालिकेसह संपूर्ण जिल्हयात अत्यावश्यक दुकानांव्यतिरिक्त इतर दुकाने (Non Essential Shops-Stand alone shops and not inside Shopping Centres/Malls) सोमवार ते शुक्रवार सकाळी 07.00 ते दुपारी 02.00 वाजेपर्यंत सुरु राहतील.  सर्व Shopping Centres/मॉल मात्र बंद राहतील.
 
4. घरपोच सेवा सुविधा :
 रेस्टॉरंट/हॉटेल, बार- मद्य विक्रीची दुकाने ही फक्त पार्सल / घरपोच सेवेसाठी दिनांक 16 एप्रिल आणि 12 मे 2021  रोजीच्या आदेशानुसार सुरु राहतील. औरंगाबाद महानगरपालिकेसह संपूर्ण जिल्हयात ई-कॉमर्स मार्फत अत्यावश्यक वस्तु- सेवा तसंच, अत्यावश्यक व्यतिरिक्त (Essential / Non-essential) यांची घरपोच सेवा (Home Delivery) सुरु करण्यासही मुभा राहिल.
 
5. वैद्यकीय सेवा :
औरंगाबाद महानगरपालिकेसह संपूर्ण जिल्हयात दररोज दुपारी 3.00 वाजल्यानंतर वैद्यकीय सेवा आणि इतर अत्यावश्यक कारण (Valid Reason)/ अत्यावश्यक सेवा वगळता नागरिकांना घराबाहेर पडण्यास संपूर्णपणे प्रतिबंध (संचारबंदी) राहिल. तसेच, घरपोच सेवा देण्यास यापूर्वी निर्गमित करण्यात आलेल्या आदेशानुसार परवानगी राहिल. 
 
6. शासकीय / निमशासकीय कार्यालये :
औरंगाबाद महानगरपालिकेसह संपूर्ण जिल्हयात सर्व शासकीय कार्यालये (अत्यावश्यक /कोरोना विषयक कामकाज करणा-या कार्यालयाव्यतिरिक्त ) 25% अधिकारी/कर्मचारी उपस्थितीत सुरु राहतील.
 
7. कृषी आस्थापना :
कृषी संबधीत दुकाने आणि त्यांच्याशी संबधीत आस्थापना (बी-बियाणे, खते, उपकरणे व त्यांच्याशी निगडीत देखभाल व दुरुस्ती सेवा इत्यादी) तसेच, कृषी उत्पन्न बाजार समिती हे आठवडयातील सर्व दिवस सकाळी 7.00 ते दुपारी 2.00 वाजेपर्यंत सुरु राहतील.
 
8. मालवाहतुक :
माल वाहतूक व मालाचा पुरवठा संबधीत दुकानदार/आस्थापनेस करण्याकरिता वेळेचे कोणतेही निर्बंध नाहीत मात्र अशा दुकानदार/आस्थापना यांनी कोणत्याही परिस्थितीत माल साठवणूक करतांना या कालावधीत मालाची विक्री करु नये, मालाची विक्री होत असल्याचे आढळून आल्यास संबधीतांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

महत्त्वाचे 
ज्या आस्थापना/दुकाने दुपारी 2.00 पर्यंत सुरु ठेवण्यास परवानगी दिलेली आहे त्यांनी दुपारी 2.30 पर्यंत अथवा तत्पूर्वी अनिवार्य सर्व हिशोब आणि इतर कार्यवाही पूर्ण करुन दुकाने/आस्थापना बंद करावी. या संबंधी उल्लंघन झाल्याचे आढळून आल्यास सदरील दुकाने/आस्थापना Covid-19 Pandemic संपेपर्यंत सील (Seal) करण्यात येतील याची नोंद घ्यावी असं शासनाकडून सांगण्यात आलं आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Solapur : करमाळा, माढा, सोलापूर मध्य आणि सोलापूर दक्षिणमधील मतदान तफावत; प्रशासनाने केला मोठा खुलासा
करमाळा, माढा, सोलापूर मध्य आणि सोलापूर दक्षिणमधील मतदान तफावत; प्रशासनाने केला मोठा खुलासा
खड्डा चुकवताना चालकाचे नियंत्रण सुटले, बस पलटली; 30 प्रवासी जखमी, नातेवाईक धावले रुग्णालयात
खड्डा चुकवताना चालकाचे नियंत्रण सुटले, बस पलटली; 30 प्रवासी जखमी, नातेवाईक धावले रुग्णालयात
Eknath Shinde : लाडक्या बहिणी ते शेतकऱ्यांचा विशेष उल्लेख, मतदारांचा विश्वास सार्थ करण्यासाठी जीवाचं रान करु, एकनाथ शिंदे यांचं मतदारांना पत्र
महायुतीवर आपल्या मतांतून जो स्नेहाचा वर्षाव केलाय तो कधीच विसरणार नाही, एकनाथ शिंदें यांचं मतदारांना पत्र
Chief minister दिल्लीतून ठरलं मुख्यमंत्रीपदाचं नाव, अमित शाहांकडून मुंबईत होणार घोषणा; एकनाथ शिंदे नाराज, सर्व भेटीगाठी रद्द
दिल्लीतून ठरलं मुख्यमंत्रीपदाचं नाव, अमित शाहांकडून मुंबईत होणार घोषणा; एकनाथ शिंदे नाराज, सर्व भेटीगाठी रद्द
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rashmi Shukla Maharashtra Police | रश्मी शुक्लांची पुन्हा पोलीस महासंचालकपदी नियुक्तीRajkiya Shole | 57 जागा जिंकणाऱ्या एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद मिळणार का? ABP MajhaJaykumar Gore - Rahul Kool : सर्व पवार 'ही' काळज घेतात..कुल-गोरेंनी सगळंच सांगितलं EXCLUSIVEZero Hour on India Match Wins | भारतानं कांगारूंचा दुसरा डाव 295 धावांत गुंडाळला ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Solapur : करमाळा, माढा, सोलापूर मध्य आणि सोलापूर दक्षिणमधील मतदान तफावत; प्रशासनाने केला मोठा खुलासा
करमाळा, माढा, सोलापूर मध्य आणि सोलापूर दक्षिणमधील मतदान तफावत; प्रशासनाने केला मोठा खुलासा
खड्डा चुकवताना चालकाचे नियंत्रण सुटले, बस पलटली; 30 प्रवासी जखमी, नातेवाईक धावले रुग्णालयात
खड्डा चुकवताना चालकाचे नियंत्रण सुटले, बस पलटली; 30 प्रवासी जखमी, नातेवाईक धावले रुग्णालयात
Eknath Shinde : लाडक्या बहिणी ते शेतकऱ्यांचा विशेष उल्लेख, मतदारांचा विश्वास सार्थ करण्यासाठी जीवाचं रान करु, एकनाथ शिंदे यांचं मतदारांना पत्र
महायुतीवर आपल्या मतांतून जो स्नेहाचा वर्षाव केलाय तो कधीच विसरणार नाही, एकनाथ शिंदें यांचं मतदारांना पत्र
Chief minister दिल्लीतून ठरलं मुख्यमंत्रीपदाचं नाव, अमित शाहांकडून मुंबईत होणार घोषणा; एकनाथ शिंदे नाराज, सर्व भेटीगाठी रद्द
दिल्लीतून ठरलं मुख्यमंत्रीपदाचं नाव, अमित शाहांकडून मुंबईत होणार घोषणा; एकनाथ शिंदे नाराज, सर्व भेटीगाठी रद्द
Barshi Vidhansabha: बार्शीला खरंच सत्तेचं वावडं? सोपल-राऊत लढतीनं वेधलं राज्याचं लक्ष; काय सांगतो राजकीय इतिहास
बार्शीला खरंच सत्तेचं वावडं? सोपल-राऊत लढतीनं वेधलं राज्याचं लक्ष; काय सांगतो राजकीय इतिहास
30 वर्षांची सत्ता 3 महिन्यात 30 हजार मतांनी पाडली; शरद पवारांच्या माढ्यातील उमेदवाराचा हल्लाबोल
30 वर्षांची सत्ता 3 महिन्यात 30 हजार मतांनी पाडली; शरद पवारांच्या माढ्यातील उमेदवाराचा हल्लाबोल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 नोव्हेंबर 2024 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 नोव्हेंबर 2024 | सोमवार
Kolhapur District Assembly Constituency : इतिहासात प्रथमच गल्ली ते दिल्ली अख्खा कोल्हापूर जिल्हा सत्तेत; आता तरी गुडघाभर डबऱ्यातील शहर वर येणार का? उद्योगांची सुद्धा प्रतीक्षा
इतिहासात प्रथमच गल्ली ते दिल्ली अख्खा कोल्हापूर जिल्हा सत्तेत! आता तरी गुडघाभर डबऱ्यातील शहर वर येणार का? उद्योगांची सुद्धा प्रतीक्षा
Embed widget