एक्स्प्लोर

मोठी बातमी! अखेर आदेश निघालाच, मुख्यालयी राहत नसलेल्या शिक्षकांचा घरभाडे भत्ता होणार बंद

Aurangabad News : खुलताबाद गटशिक्षणाधिकारी यांनी मुख्याध्यापकांना पाठवलेल्या पत्रात सप्टेंबर 2022 च्या पगार शालार्थ प्रणालीमध्ये पाठवितांना घरभाडे भत्ता समाविष्ट करू नयेत असे निर्देश दिले आहेत.

औरंगाबाद : मुख्यालयी न राहणाऱ्या शिक्षकांचे घरभाडे भत्ता बंद करण्याची मागणी काही दिवसांपूर्वी भाजप आमदार प्रशांत बंब यांनी केली होती. आता प्रत्यक्षात कारवाईला सुरवात झाली असून, याची अंमलबजावणी सुध्दा खुद्द आमदार बंब यांच्या मतदारसंघातून सुरू झाली आहे. खुलताबाद गटशिक्षणाधिकारी यांनी तालुक्यातील सर्व मुख्याध्यापकांना एक पत्र पाठवले असून, मुख्यालयी राहत नसलेल्या शिक्षकांचा घरभाडे भत्ता या महिन्यापासून बंद करण्यात येणार असल्याचा उल्लेख केला आहे. 

खुलताबाद गटशिक्षणाधिकारी यांनी मुख्याध्यापकांना पाठवलेल्या पत्रात सप्टेंबर 2022 च्या पगार शालार्थ प्रणालीमध्ये पाठवितांना घरभाडे भत्ता समाविष्ट करू नयेत असे निर्देश दिले आहेत. त्यांच्या या पत्राने मोठी खळबळ उडाली आहे. तर शिक्षक संघटनांनी या आदेशाला विरोध केला आहे. खुलताबाद तालुका आमदार प्रशांत भाऊ यांच्या मतदारसंघात येतो. दरम्यान गंगापूर मतदारसंघातील जिल्हा परिषद शाळेतील बहुतांश शिक्षक मुख्यालय उपस्थित राहत नसल्याचा मुद्दा प्रशांत बंब यांनी उपस्थित केला होता. शिक्षक दिनी त्यांनी अनेक शाळांमध्ये स्वतः पाहणी केली होती. त्यानंतर आता शिक्षण अधिकाऱ्यांनी मुख्यालयी न राहणाऱ्या शिक्षकांचा घर भाडा भत्ता न देण्याचे पत्र काढल्याने शिक्षकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.


मोठी बातमी! अखेर आदेश निघालाच, मुख्यालयी राहत नसलेल्या शिक्षकांचा घरभाडे भत्ता होणार बंद

काय म्हटले आहे पत्रात?

गटशिक्षणाधिकारी यांनी मुख्याध्यापकांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे की, शासन निर्णयाप्रमाणे मुख्यालयी राहणे बंधनकारक आहे. तसेच विधानसभा सदस्य प्रशांत बंब यांच्या पत्रानुसार तालुक्यातील कर्मचारी मुख्यालय राहत नसल्याने तक्रारी प्राप्त होत आहे. त्या अनुषंगाने ज्या कर्मचाऱ्यांनी मुख्यालयी राहणे बाबत अद्याप पर्यंत पुरावे सादर केलेले नाही. अशा कर्मचाऱ्यांना घरभाडे भत्ता अदा करण्यात येऊ नये.तरी मुख्याध्यापक यांनी संबंधीताचे माहे सप्टेंबर 2022 चे पगार शालार्थ प्रणालीमध्ये पाठवितांना घरभाडे भत्ता समाविष्ट करु नयेत. तसेच मुख्यालयात राहत नसलेबाबत निदर्शनास आल्यास नियमानुसार शिस्तभंग विषयक कार्यवाही प्रस्तावित करण्यात येईल.तर चुकीची माहिती देणारे मुख्याध्यापक यास स्वतः सर्वस्वी जबाबदार राहतील यांची गांभीर्याने नोंद घ्यावी. सोबतच केलेल्या कार्यवाहीचा अहवाल पंचायत समिती कार्यालयास तात्काळ सादर करावा,असे आदेशात म्हटले आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Shivsena Thackeray Camp: आम्ही ठाकरेंमुळे आमदार झालोय, त्यांच्यासोबत आमची निष्ठा आजही आहे, उद्याही राहणार; कैलास पाटलांना ठणकावून सांगितलं
आम्ही ठाकरेंमुळे आमदार झालोय, त्यांच्यासोबत आमची निष्ठा आजही आहे, उद्याही राहणार; कैलास पाटलांना ठणकावून सांगितलं
Weather Update: राज्यात येत्या 48 तासात तापमानात चढ-उतार, कुठे काय स्थिती? वाचा IMD सविस्तर अंदाज 
सूर्याचे उत्तरायण सुरू, येत्या 48 तासात तापमानात मोठे बदल, वाचा IMD सविस्तर अंदाज 
चंद्रपूरमध्ये कार आणि ऑटोचा भीषण अपघात, 2 महिलांचा जागीच मृत्यू तर 15 जण जखमी 
चंद्रपूरमध्ये कार आणि ऑटोचा भीषण अपघात, 2 महिलांचा जागीच मृत्यू तर 15 जण जखमी 
धक्कादायक! भाजपच्या माजी आमदाराचा विद्यमान आमदाराच्या कार्यालयावर गोळीबार; 3 जखमी, फोटो व्हायरल
धक्कादायक! भाजपच्या माजी आमदाराचा विद्यमान आमदाराच्या कार्यालयावर गोळीबार; 3 जखमी, फोटो व्हायरल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Mahendra Dalvi on Sunil Tatkare : भरतशेठ पालकमंत्री होईपर्यंत तटकरेंना कायम अंगावर घेईनMakrand Jadhav Buldhana : स्वागताला एकही आमदार आला नाही, पालकमंत्री म्हणाले,ABP Majha Marathi News Headlines 7AM TOP Headlines 07 AM 27 January 2025 सकाळी ७ च्या हेडलाईन्सABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11 PM 26 January 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Shivsena Thackeray Camp: आम्ही ठाकरेंमुळे आमदार झालोय, त्यांच्यासोबत आमची निष्ठा आजही आहे, उद्याही राहणार; कैलास पाटलांना ठणकावून सांगितलं
आम्ही ठाकरेंमुळे आमदार झालोय, त्यांच्यासोबत आमची निष्ठा आजही आहे, उद्याही राहणार; कैलास पाटलांना ठणकावून सांगितलं
Weather Update: राज्यात येत्या 48 तासात तापमानात चढ-उतार, कुठे काय स्थिती? वाचा IMD सविस्तर अंदाज 
सूर्याचे उत्तरायण सुरू, येत्या 48 तासात तापमानात मोठे बदल, वाचा IMD सविस्तर अंदाज 
चंद्रपूरमध्ये कार आणि ऑटोचा भीषण अपघात, 2 महिलांचा जागीच मृत्यू तर 15 जण जखमी 
चंद्रपूरमध्ये कार आणि ऑटोचा भीषण अपघात, 2 महिलांचा जागीच मृत्यू तर 15 जण जखमी 
धक्कादायक! भाजपच्या माजी आमदाराचा विद्यमान आमदाराच्या कार्यालयावर गोळीबार; 3 जखमी, फोटो व्हायरल
धक्कादायक! भाजपच्या माजी आमदाराचा विद्यमान आमदाराच्या कार्यालयावर गोळीबार; 3 जखमी, फोटो व्हायरल
एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपद घेण्यास तयार नव्हते, पण..; मंत्री गुलाबराव पाटलांचा गौप्यस्फोट
एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपद घेण्यास तयार नव्हते, पण..; मंत्री गुलाबराव पाटलांचा गौप्यस्फोट
अनधिकृतपणे वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशींची धरपकड सुरूच; मिरा-भाईंदर पोलिसांकडून पुन्हा कारवाई
अनधिकृतपणे वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशींची धरपकड सुरूच; मिरा-भाईंदर पोलिसांकडून पुन्हा कारवाई
पुण्यात 1 रुपयात ड्रेस, ऑफर अंगलट आल्याने दुकान बंद करण्याची वेळ; महिलांची गर्दी अन् पोलिसांचा हस्तक्षेप
पुण्यात 1 रुपयात ड्रेस, ऑफर अंगलट आल्याने दुकान बंद करण्याची वेळ; महिलांची गर्दी अन् पोलिसांचा हस्तक्षेप
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 जानेवारी 2025 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 जानेवारी 2025 | रविवार
Embed widget