एक्स्प्लोर

जालन्याच्या जागेचा तिढा सुटला, खोतकरांनी माघार घेतल्याने दानवेंचा मार्ग मोकळा

युतीच्या औरंगाबादमधील युतीच्या मेळाव्या आधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे, अर्जुन खोतकर आणि रावसाहेब दानवे यांच्या बैठक पार पडली. या बैठकीत अर्जुन खोतकरांचं मतपरिर्वन करण्यात मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे यांना यश आलं आहे.

औरंगाबाद : शिवसेना-भाजपसाठी डोकेदुखी बनलेला जालन्याच्या जागेचा तिढा अखेर सुटला आहे. शिवसेनेच्या अर्जुन खोतकर यांनी जालन्यातून माघार घेतली आहेत. त्यामुळे भाजपकडून रावसाहेब दावने याठिकाणी रावसाहेब दानवेंचा निवडणूक लढवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

युतीच्या औरंगाबादमधील मेळाव्याआधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे, अर्जुन खोतकर आणि रावसाहेब दानवे यांच्यात बैठक पार पडली. या बैठकीत अर्जुन खोतकरांचं मतपरिर्वन करण्यात मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे यांना यश आलं आहे.

मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरेंनी युतीचा धर्म समजून सांगितला. या धर्माप्रमाणे पहिली परीक्षा मी पास होईल. दुसरी परीक्षा तुमची आहे, तुम्हीही पास व्हा. आमच्या जिल्ह्यात आणीबाणी लागली होती, ती आज उठली, अशी प्रतिक्रिया अर्जुन खोतकर यांनी दिली आहे.

उद्धव ठाकरेंच्या निर्णयाच्या विरोधात मी गेलो नाही. मी कडवट शिवसैनिक आहे, दगाफटका करणार नाही. जी जबाबदारी टाकली आहे, ती जबाबदारी पार पाडू, असं आश्वासनही खोतरकांनी यावेळी दिलं.

रावसाहेब दानवे आणि अर्जुन खोतकर यांचा वाद कोणत्या मुद्द्यांवर मिटला असावा?

-  मार्केट कमिटीमधील गाळे विक्री करताना खोतकर यांनी घोळ केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. हे प्रकरण रावसाहेब दानवे यांनी लावून धरले होते. हे प्रकरण मिटवण्यात यावे ही खोतकरांची मागणी होती, ती मान्य केल्याची माहिती मिळत आहे.

- अर्जुन खोतकर यांच्यावर तूर घोटाळ्याचे आरोप आहेत. या प्रकरणात अर्जुन खोतकर यांच्या 45 नातेवाईकांवर गुन्हे दाखल आहेत. ते सगळे जामिनावर आहेत. हे प्रकरण मिटवण्यात यावे.

- जालन्यातील रामनगर कारखान्याच्या जमीन खरेदी प्रकरण. रामनगर येथील कारखाना खोतकर आणि औरंगाबादमधील एक बांधकाम व्यवसायिक यांनी विकत घेतला आहे. यात घोटाळा झाल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. या प्रकरणात मदत करावी आणि प्रकरण मिटवावे.

- खोतकर यांच्या दर्शना हॉटेलच्या जागेचा वाद मिटवावा.

- विधानसभेसाठी दानवेंनी खोतकरांना मदत करावी आणि खोतकरांनी दानवे यांना लोकसभेसाठी युतीधर्म पाळावा.

- अर्जुन खोतकर यांनी विधानपरिषदेची उमेदवारी मागितली आहे. कारण त्यांना विश्वास नाही की रावसाहेब दानवे हे विधानसभेला मदत करतील. याशिवाय मागील निवडणुकीत केवळ सव्वादोनशे मतांनी विजय मिळाल्याने त्यांनी ही मागणी केली आहे.

वरील मुद्द्यावर चर्चा झाल्यानंतर रावसाहेब दानवे आणि अर्जुन खोतकर यांच्यातील वाद मिटला असल्याचं बोललं जात आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Abhijeet Dipke: झारखंडच्या रांचीमध्ये 12 दिवसांपासून विद्यार्थ्यांचा एल्गार; विद्यार्थ्यांच्या हक्कांसाठी लढा उभारणारी सीजेपी आंदोलनात कधी जाणार? अभिजीत दीपके म्हणाले.....
झारखंडच्या रांचीमध्ये 12 दिवसांपासून विद्यार्थ्यांचा एल्गार; विद्यार्थ्यांच्या हक्कांसाठी लढा उभारणारी सीजेपी आंदोलनात कधी जाणार? अभिजीत दीपके म्हणाले.....
बालकांच्या शोषणाशी संबंधित अश्लील व्हिडिओंचा काळाबाजार, रॅकेट चालवणाऱ्या सराईत गुन्हेगारांना अटक 
बालकांच्या शोषणाशी संबंधित अश्लील व्हिडिओंचा काळाबाजार, रॅकेट चालवणाऱ्या सराईत गुन्हेगारांना अटक 
Abhijeet Dipke on RSS: ज्यांनी गांधींची हत्या केली, डॉ. आंबेडकरांचा विरोध केला त्यांनी आम्हाला संविधान शिकवू नये, अभिजीत दिपकेंनी RSS च्या बड्या नेत्याला सुनावलं
ज्यांनी गांधींची हत्या केली, डॉ. आंबेडकरांचा विरोध केला त्यांनी आम्हाला संविधान शिकवू नये, अभिजीत दिपकेंनी RSS च्या बड्या नेत्याला सुनावलं
धक्कादायक! रात्रीच्या प्रवासात खासगी ट्रॅव्हलमध्ये महिलेचा दोनवेळा विनयभंग; लाडक्या बहिणीच्या तक्रारीनंतर बस थेट पोलीस ठाण्यात
धक्कादायक! रात्रीच्या प्रवासात खासगी ट्रॅव्हलमध्ये महिलेचा दोनवेळा विनयभंग; लाडक्या बहिणीच्या तक्रारीनंतर बस थेट पोलीस ठाण्यात

व्हिडीओ

Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
Gungi Gudiya Special Report : गूंगी गुडिया ते गूंगा गुड्डा, मौनावरून राजकारण की राजकारणासाठी मौन?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FSSAI Action : Old Monk सह इतर दारू आणि खाद्यपेये FSSAIच्या निशाण्यावर का आहेत? देशभर धडक कारवाई
Old Monk सह इतर दारू आणि खाद्यपेये FSSAIच्या निशाण्यावर का आहेत? देशभर धडक कारवाई
Sunetra Pawar : म्हाडाच्या प्रलंबित गृहनिर्माण प्रकल्पांना तातडीने गती द्या; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश
म्हाडाच्या प्रलंबित गृहनिर्माण प्रकल्पांना तातडीने गती द्या; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश
'एबीपी माझा' इम्पॅक्ट; बिबट्यासह पिल्लांचा वावर, वन अधिकारी थेट वावरात; बिबटे जेरबंद करण्यासाठी पिंजरे तैनात
'एबीपी माझा' इम्पॅक्ट; बिबट्यासह पिल्लांचा वावर, वन अधिकारी थेट वावरात; बिबटे जेरबंद करण्यासाठी पिंजरे तैनात
कोर्टाच्या तारखेला वेळेवर हजर न राहणे भोवले, 2020 चं प्रकरण; मुंबईतील भाजप नगरसेवकास अटक
कोर्टाच्या तारखेला वेळेवर हजर न राहणे भोवले, 2020 चं प्रकरण; मुंबईतील भाजप नगरसेवकास अटक
Congress News : काँग्रेसचे नेतृत्व तळागाळापासून तुटलं, निष्ठावानांना डावललं जातंय, महिला नेत्याचा गंभीर आरोप
काँग्रेसचे नेतृत्व तळागाळापासून तुटलं, निष्ठावानांना डावललं जातंय, महिला नेत्याचा गंभीर आरोप
BMM 2026 : सिअॅटलमध्ये रंगणार जागतिक मराठी मेळावा; संस्कृती, ज्ञान, उद्योजकता आणि मनोरंजनाचा चौफेर संगम
सिअॅटलमध्ये रंगणार जागतिक मराठी मेळावा; संस्कृती, ज्ञान, उद्योजकता आणि मनोरंजनाचा चौफेर संगम
रस्ता आहे की, चिखलमार्ग; गोवा मार्गावर बससह वाहने फसली, विद्यार्थ्यांसह नागरिकांना मोठा त्रास
रस्ता आहे की, चिखलमार्ग; गोवा मार्गावर बससह वाहने फसली, विद्यार्थ्यांसह नागरिकांना मोठा त्रास
विलास घुले मृत्यू प्रकरण! खासदार बजरंग सोनवणेंच्या मुलाला अटक करा नाहीतर आम्ही… बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घुले कुटुंबीयांचे आमरण उपोषण 
विलास घुले मृत्यू प्रकरण! खासदार बजरंग सोनवणेंच्या मुलाला अटक करा नाहीतर आम्ही… बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घुले कुटुंबीयांचे आमरण उपोषण 
Embed widget