एक्स्प्लोर

सपनो के सौदागर! मोदींचा 'तो' व्हिडिओ ट्वीट करत खासदार जलील यांनी केली बक्षीसाची घोषणा; कारण...

Pradhan Mantri Awas Yojana): स्थानिक प्रशासनाच्या वादामुळे गेल्या काही वर्षांपासून औरंगाबाद येथील पंतप्रधान आवास योजना रखडली आहे.

Imtiyaz Jaleel: पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचा एक व्हिडिओ ट्वीट (Video (Tweet)) करत एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील (Imtiyaz Jaleel) यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान आवास योजनेवरून (Pradhan Mantri Awas Yojana) प्रश्न चिन्ह उपस्थित केले आहेत. सोबतच औरंगाबाद महानगरपालिकेने (Aurangabad Municipal Corporation) पंतप्रधान आवास योजने अंतर्गत एकही घर उभा केला असल्याचं दाखवल्यास मी मोदींना बक्षीस द्यायला तयार असल्याचा खोचक टोला लगावला आहे. तर औरंगाबाद शहरातील नागरिकांना पंतप्रधान आवास योजनेतून घरे कधी मिळणार यापेक्षा या घरकुल योजनेचा कंत्राट कुणाला मिळणार यात केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) आणि केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवत कराड (Bhagwat Karad) यांना अधिक रस असल्याचा आरोपही जलील यांनी केला आहे.  

स्थानिक प्रशासनाच्या वादामुळे गेल्या काही वर्षांपासून औरंगाबाद येथील पंतप्रधान आवास योजना रखडली आहे. तर यावरून अनेकदा जलील यांनी पत्रकार परिषदेतून स्थानिक प्रशासनावर आरोप देखील केले होते. मात्र आता ही योजना संपण्यासाठी अवघ्या चार दिवसांचा कालावधी शिल्लक राहिला असतांना औरंगाबाद जिल्ह्यातील घरकुल योजनेसाठी नियोजित जागेचा अंतिम निर्णय होऊ शकला नाही. तर ज्या जागेचा निर्णय झाला आहे, त्याठिकाणी मोठ-मोठ्या खदानी असल्याचे समोर आले. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे घराचे स्वप्न पूर्ण होण्यासाठी अवघ्या चार दिवसांचा कालावधी शिल्लक असून, औरंगाबाद महानगरपालिकेने पंतप्रधान आवास योजनेतून एक तरी घरी बनवलं असल्याचे दाखवल्यास मोदींना मी बक्षीस देण्यासाठी तयार असल्याचे जलील म्हणाले आहेत. 

मोदींचा व्हिडिओ ट्वीट!

जलील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणाचा एक व्हिडिओ ट्विट केलाय. ज्यात पंतप्रधान मोदी हे 2022 पर्यंत असा एकही व्यक्ती असणार नाही की, ज्याला स्वतःच पक्क घर नसेल,असं सांगत आहेत. फक्त घरचं नाही तर त्यात एलईडी लाईट,पाण्याचा नळ, नळाला पाणी, गॅसची पाईपलाईन असेल. आम्ही काँग्रेस सारखं चार भिंती उभा करत नाही, तर पक्क घर उभा करून देणार असल्याचा दावा देखील यात मोदी करतांना पाहायला मिळत आहे. तर त्यांच्या याच व्हिडिओला सपनो के सौदागर असे कॅप्शन देखील जलील यांच्याकडून देण्यात आले आहेत. 

दानवे,कराड यांच्यावर आरोप...

पंतप्रधान आवास योजनेवरून जलील यांनी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे आणि केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवत कराड यांच्यावर देखील आरोप केला आहे. औरंगाबाद शहरात होत असलेल्या आवास योजनेशी येथील दोन्ही केंद्रीय मंत्र्यांना काहीही देणघेण नसल्याचं जलील म्हणाले. तर शहरातील नागरिकांना पंतप्रधान आवास योजनेतून घरे कधी मिळणार यापेक्षा या घरकुल योजनेचा कंत्राट कुणाला मिळणार यात रावसाहेब दानवे आणि भागवत कराड यांना अधिक इंटरेस्ट असल्याचा आरोपही जलील यांनी केला आहे.  

सुभाष देसाईंच्या काळात एमआयडीसी जमीन विक्रीचा एक हजार कोटींचा घोटाळा; जलील यांचा गंभीर आरोप

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ajit Pawar : रामराजेंच्या तुतारी हाती घेण्यावर अजित पवार स्पष्टच बोलले; निवडणुकांपूर्वीच गणित सांगितलं
रामराजेंच्या तुतारी हाती घेण्यावर अजित पवार स्पष्टच बोलले; निवडणुकांपूर्वीच गणित सांगितलं
Sayaji Shinde Join NCP | सयाजी शिंदेंची अजितदादांना साथ, राष्ट्रवादीत केला प्रवेश
Sayaji Shinde Join NCP | सयाजी शिंदेंची अजितदादांना साथ, राष्ट्रवादीत केला प्रवेश
Raj Thackeray SSC: राज ठाकरेंना 10 वीच्या बोर्ड परीक्षेत किती मार्क?;  मनसे अध्यक्षांनीच सांगितली टक्केवारी, साधेसुधे नव्हते..
राज ठाकरेंना 10 वीच्या परीक्षेत किती मार्क?; मनसे अध्यक्षांनीच सांगितली टक्केवारी, साधेसुधे नव्हते..
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 ऑक्टोबर 2024 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 ऑक्टोबर 2024 | शुक्रवार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Job Majha : कोकण रेल्वेमध्ये नोकरीची संधी; कोणत्या पदांवर भरती? एकूण किती जागा रिक्त? #abpमाझाSudhir Mungantiwar On Tatoba|ताडोबा व्याघ्र प्रकल्पाच्या मोहर्लीत नवीन मुख्य प्रवेशद्वाराचं उदघाटनAaditya Thackeray Mumbai : नवी मुंबई विमानतळावरुन आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल #abpमाझाManoj Jarange Dasra Melava | जरांगेंच्या दसरा मेळाव्यासाठी नारायण गडाला फुलांची सजावट, तयारी कशी?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ajit Pawar : रामराजेंच्या तुतारी हाती घेण्यावर अजित पवार स्पष्टच बोलले; निवडणुकांपूर्वीच गणित सांगितलं
रामराजेंच्या तुतारी हाती घेण्यावर अजित पवार स्पष्टच बोलले; निवडणुकांपूर्वीच गणित सांगितलं
Sayaji Shinde Join NCP | सयाजी शिंदेंची अजितदादांना साथ, राष्ट्रवादीत केला प्रवेश
Sayaji Shinde Join NCP | सयाजी शिंदेंची अजितदादांना साथ, राष्ट्रवादीत केला प्रवेश
Raj Thackeray SSC: राज ठाकरेंना 10 वीच्या बोर्ड परीक्षेत किती मार्क?;  मनसे अध्यक्षांनीच सांगितली टक्केवारी, साधेसुधे नव्हते..
राज ठाकरेंना 10 वीच्या परीक्षेत किती मार्क?; मनसे अध्यक्षांनीच सांगितली टक्केवारी, साधेसुधे नव्हते..
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 ऑक्टोबर 2024 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 ऑक्टोबर 2024 | शुक्रवार
Maharashtra Rain : कधी उघडणार पाऊस? पुढील 5 दिवस कसं असेल महाराष्ट्रातील हवामान? जाणून घ्या सविस्तर माहिती
कधी उघडणार पाऊस? पुढील 5 दिवस कसं असेल महाराष्ट्रातील हवामान? जाणून घ्या सविस्तर माहिती
सयाजी शिंदेंना राष्ट्रवादीत मोठी जबाबदारी, अजित पवारांची घोषणा; विधानसभेपूर्वीच काढला हुकमी एक्का
सयाजी शिंदेंना राष्ट्रवादीत मोठी जबाबदारी, अजित पवारांची घोषणा; विधानसभेपूर्वीच काढला हुकमी एक्का
Arvind Kejriwal : फुकटातील रेवड्या अमेरिकेत पोहोचल्या! डोनाल्ड ट्रम्प यांचे भाषण शेअर करत केजरीवाल असं का म्हणाले?
फुकटातील 'रेवड्या' अमेरिकेत पोहोचल्या! डोनाल्ड ट्रम्प यांचे भाषण शेअर करत केजरीवाल असं का म्हणाले?
कर्नाटकात स्थापना दिनी कन्नड ध्वज फडकावा, कन्नड भाषा कळाल्याशिवाय कोणीही राज्यात राहू शकत नाही! : डीके शिवकुमार
कर्नाटकात स्थापना दिनी कन्नड ध्वज फडकावा, कन्नड भाषा कळाल्याशिवाय कोणीही राज्यात राहू शकत नाही! : डीके शिवकुमार
Embed widget