एक्स्प्लोर

Aurangabad News : 'लंडनचं वऱ्हाड आलं औरंगाबादला, लंडनचा एडवर्ड आणि औरंगाबादची सांची अडकले विवाहबंधनात

Aurangabad News: एडवर्ड औरंगाबादच्या सांची नावाच्या मुलीच्या प्रेमात पडला. एडवर्ड आणि सांची 2019 पासून इंग्लंडमध्ये  सोबत होते.

Aurangabad News : लक्ष्मणरावांनी 'वऱ्हाड निघालंय लंडन'ला साकारलं... मात्र आता 'लंडनचं वऱ्हाड आलं औरंगाबादला अशी नाट्यकृती साकारायला हरकत नाही. औरंगाबादमध्ये (Aurangabad) पार पडलेलं एक 'आंतरराष्ट्रीय' लगीन सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. लंडनचे (London) पाहुणे नाच-नाच नाचले...  नवरदेव एडवर्ड घोड्यासोबत... तर लंडनचे वऱ्हाडी बँडच्या तालावर. औरंगाबादची सांची इंग्लंडच्या एका मुलाच्या प्रेमात पडली, दोघांचे कुटुंब लग्नासाठी तयार झाले आणि अगदी भारतीय पद्धतीने (Indian Marriage)  हा विवाह सोहळा पार पडला.

दोन्ही कुटुंबाचा लग्नासाठी होकार, अट मात्र एकच होती..

भारतीय गाण्यावर (Indian Wedding) थिरकत लंडनचे क्लेश कुटुंबीय अगदी भारतीय वेश परिधान करुन लग्नात ही सगळी मंडळी सहभागी झाली. लंडनचा एडवर्ड हा आई वडिलांना एकुलता एक मुलगा आहे. एडवर्ड औरंगाबादच्या सांची नावाच्या मुलीच्या प्रेमात पडला. एडवर्ड आणि सांची 2019 पासून इंग्लंडमध्ये सोबत होते. तीन वर्षांनी लग्नाबाबत घरी सांगितलं आणि घरच्यांनी लग्नासाठी होकार दिला. अट मात्र एकच होती की, लग्न भारतात म्हणजे औरंगाबादमध्ये व्हावं आणि तेही भारतीय बौद्ध पद्धतीने झाले पाहिजे.  

जातीपातीच्या भिंती, सीमेची बंधनं तोडून लग्न

ब्रिटनमध्ये लग्न म्हणजे एक तासाचा सोहळा असतो. मात्र भारतात लग्न म्हणजे चार दिवसांचं सोहळा आहे आणि हे सगळं आनंदादायक असल्याची प्रतिक्रिया यावेळेस एडवर्डच्या (Edward) वडिलांनी दिली. तर त्याच्या बहिणीने सुद्धा भारतीय पद्धतीने लग्न होत असल्याने आनंद होत असल्याचा सांगितलं. तर जातीपातीच्या भिंती तोडून हे लग्न होत असल्याचा आनंद आहे असे मुलीच्या वडिलांनी सांगितलं.

'लंडनचं वऱ्हाड आलं औरंगाबादला'

सांची आता कायमची सातासमुद्र पार राहायला जाणार याचं दुःख आहे मात्र मुलगी एका चांगल्या कुटुंबात गेली याचा आनंद असल्याची प्रतिक्रिया यावेळेस रगडे कुटुंबियांनी दिली. या निमित्ताने लग्नामुळे ब्रिटिश आणि एका भारतीय कुटुंबाची नाळ भारतीय पद्धतीने घट्ट जोडली गेली. मानपान झालं... मुंडावळ्या बांधल्या... आणि मग मंगलाष्टका... सगळे विधी यथासांग पार पडले... आणि कोणत्याही लग्नात हार घालताना होणारी धडपड इथंही झाली... लक्ष्मणरावांनी 'वऱ्हाड निघालंय लंडन'ला साकारलं... आता या लग्नानंतर कुणी तरी 'लंडनचं वऱ्हाड आलं औरंगाबाद'ला (Auranbad- Londan Marriage) साकारायला हरकत नाही.

इतर महत्त्वाच्या बातम्या :

Aurangabad Marriage : औरंगाबादमधील सांचीच्या लग्नात 'लंडन ठुमकदा', लंडनहून आलेल्या वऱ्हाडाची चर्चा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

26 आलिशान वाहनांसह 73 बँक खात्यांमधील कोट्यवधी रुपये जप्त, मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ED ची मोठी कारवाई 
26 आलिशान वाहनांसह 73 बँक खात्यांमधील कोट्यवधी रुपये जप्त, मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ED ची मोठी कारवाई 
मोठी बातमी! लाडकी बहीण योजनेत अपात्र ठरलेल्या 5 लाख महिलांकडून पैसे परत घेणार नाही; शासनाचा निर्णय
मोठी बातमी! लाडकी बहीण योजनेत अपात्र ठरलेल्या 5 लाख महिलांकडून पैसे परत घेणार नाही; शासनाचा निर्णय
चित्रपट महोत्सवाचे आयोजन करा, 10 लाख मिळवा; शासनाकडून अर्थसहाय्य, काय आहेत नियम व अटी?
चित्रपट महोत्सवाचे आयोजन करा, 10 लाख मिळवा; शासनाकडून अर्थसहाय्य, काय आहेत नियम व अटी?
बीडच्या SP कावतांचा लय भारी निर्णय, नागरिकांसाठी QR कोड; स्कॅनकरुन माहिती मिळवा, तक्रारही नोंदवा
बीडच्या SP कावतांचा लय भारी निर्णय, नागरिकांसाठी QR कोड; स्कॅनकरुन माहिती मिळवा, तक्रारही नोंदवा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Special Report Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींची संख्या महिन्याभरात 5 लाखांनी घटलीSpecial Report Girl Safety : सांगली आणि बुलढाण्यात चिमुरड्यांवर अत्याचार, नराधमांना कधी वचक बसणार?Special Report Rahul Gandhi Election Commission:राहुल गांधींचे आक्षेप,निवडणूक प्रक्रियेवर टीकेची झोडSpecial Report Shiv Sena Thackeray Vs Shinde : शिंदेंचं 'ऑपरेशन टायगर' ठाकरेंची झोप उडवणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
26 आलिशान वाहनांसह 73 बँक खात्यांमधील कोट्यवधी रुपये जप्त, मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ED ची मोठी कारवाई 
26 आलिशान वाहनांसह 73 बँक खात्यांमधील कोट्यवधी रुपये जप्त, मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ED ची मोठी कारवाई 
मोठी बातमी! लाडकी बहीण योजनेत अपात्र ठरलेल्या 5 लाख महिलांकडून पैसे परत घेणार नाही; शासनाचा निर्णय
मोठी बातमी! लाडकी बहीण योजनेत अपात्र ठरलेल्या 5 लाख महिलांकडून पैसे परत घेणार नाही; शासनाचा निर्णय
चित्रपट महोत्सवाचे आयोजन करा, 10 लाख मिळवा; शासनाकडून अर्थसहाय्य, काय आहेत नियम व अटी?
चित्रपट महोत्सवाचे आयोजन करा, 10 लाख मिळवा; शासनाकडून अर्थसहाय्य, काय आहेत नियम व अटी?
बीडच्या SP कावतांचा लय भारी निर्णय, नागरिकांसाठी QR कोड; स्कॅनकरुन माहिती मिळवा, तक्रारही नोंदवा
बीडच्या SP कावतांचा लय भारी निर्णय, नागरिकांसाठी QR कोड; स्कॅनकरुन माहिती मिळवा, तक्रारही नोंदवा
निर्दयीपणाचा कळस, आधी हत्तीला उकसवलं, गजराज अटॅक  करण्यासाठी पुढे येताच जेसीबी डोक्यात हाणला Video
निर्दयीपणाचा कळस, आधी हत्तीला उकसवलं, गजराज अटॅक करण्यासाठी पुढे येताच जेसीबी डोक्यात हाणला Video
Dharashiv News : ओलीस ठेवलेल्या 19 ऊसतोड मजुरांसह 15 मुलांची तब्बल 45 दिवसांनंतर सुटका; कामगार विभागाच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल
ओलीस ठेवलेल्या 19 ऊसतोड मजुरांसह 15 मुलांची तब्बल 45 दिवसांनंतर सुटका; कामगार विभागाच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल
Video: तुम्हाला मुलाला निवडून आणता आलं नाही, अन् आम्हाला गप्पा मारता; अजित पवारांचा राज ठाकरेंना टोला
Video: तुम्हाला मुलाला निवडून आणता आलं नाही, अन् आम्हाला गप्पा मारता; अजित पवारांचा राज ठाकरेंना टोला
सभापती झाला रे... नाना पटोलेंची फोडाफोडी अन् नशिबाचीही साथ; ईश्वरचिठ्ठीने भंडारा ZP वर काँग्रेसचा हात
सभापती झाला रे... नाना पटोलेंची फोडाफोडी अन् नशिबाचीही साथ; ईश्वरचिठ्ठीने भंडारा ZP वर काँग्रेसचा हात
Embed widget