Anil Bonde : ऑनलाईन जोडे-चपलाच्या जाहिरातीवर हिंदू देवतांचे फोटो, भाजप खासदार संतापले
बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्वाचे विचार कोण प्रखरतेने मांडतं यासाठी दसरा मेळाव्याकडे सर्वांचं लक्ष असल्याचं खासदार अनिल बोंडे यांनी म्हटलंय.
Amravati : ऑनलाइन चालणाऱ्या जाहीरातींवर (Online Advertisement) कोणाचाही अंकुश नसल्याने दररोज नवा वाद उफळून येत आहे. यंदा नवरात्रीमध्ये मेट्रो आणि मोची या दोन कंपनीने बूट आणि चप्पलची जाहिरात केली. यामध्ये देवी-देवतांचे छायाचित्र वापरले आहे. हा प्रकार चुकीचा असून बुटाच्या जाहिरातीवर देवीचा फोटो लावून हिंदू देवतांचा अपमान केल्याने भाजप खासदार डॉ. अनिल बोंडे (MP Dr. Anil Bonde) चांगलेच संतापले आहेत.
डॉ. अनिल बोंडे यावर प्रतिक्रिया देताना म्हणाले, "ऑनलाइन जाहिरात देताना त्यावर कोणाचेही नियंत्रण नसते, कोणता मजकूर जाहीरातीसाठी वापरण्यात येतोय याबाबत बघण्याची तसदीही कोणी घेत नाही. त्यामुळे या जाहिरातींना नियंत्रणात ठेवण्याची गरज आहे. मेट्रो आणि आणि मोची कंपनीची ही जाहिरात असून याची तक्रार करूनही त्यांनी माफी मागितली नाही. इमेल करूनही कारवाई केली नाही. जोड्याची जाहिरात करताना हिंदू देवांचा फोटो वापरल्याने हिंदूच्या भावना दुखावल्या आहे. त्यामुळे मोची आणि मेट्रो कंपनीचे उत्पादनं खरेदी करू नका. या प्रकरणी आम्ही आजच पोलिसात तक्रार देऊ."
ऑनलाइन जाहिरांतीमुळे अनेक वाद
सोशल मीडियावर चालणाऱ्या ऑनलाइन कॅम्पेनमध्ये अनेकवेळा आक्षेपार्ह मजकूर प्रसिद्ध करण्यात येतो. यासोबतच अनेकवेळा धार्मिक आणि सामाजिक भावना दुखावण्याचेही प्रकार यापूर्वी घडले आहे. दुसरीकडे नोकरीच्या नावावर फसवणुकीचेही प्रकार हे ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर वाढले आहे. अशा अनेक घटना दररोज समोर येत आहे. त्यामुळे यावर नियंत्रण आणण्याची मागणी जोर धरु लागली आहे. सोशल मीडिया हा शहरापासून ते गावांच्या कोपऱ्यापर्यंत पोहोचला असल्याने याद्वारे नागरिकांना टार्गेट करणे सोपे झाल्याने यावर वेळीच नियंत्रण आणण्याची मागणी होत आहे.
बोंडे म्हणाले, मी दोन चॅनल लावून बसणार
मुंबईत होणाऱ्या दसरा मेळाव्या (Dasra Melava) संदर्भात डॉ. अनिल बोंडे यांना प्रश्न विचारल्यावर ते म्हणाले, "जनतेला दसऱ्याला होणाऱ्या दोन्ही मेळाव्यांची उत्सुकता आहे. लोकांना उत्सुकता यासाठी आहे की, बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्वाचे विचार कोण प्रखरतेने मांडतं? शिवसेनाप्रमुख कोणाच्या मुखातून अवतरतात? हे पाहण्याची सर्वांची उत्सुकता आहे. त्याप्रकारेच मी स्वतः देखील दोन चॅनल लावून बसणार आहे. हे पाहून मी देखील लगेच माझे मत व्यक्त करणार."
इतर महत्त्वाच्या बातम्या