एक्स्प्लोर

अमरावतीचं खासदार कार्यालय पुन्हा सील; खासदार अनिल बोंडेंचाही कार्यालयावर दावा, तर यशोमती ठाकुरांवर गुन्हा दाखल

Amravati MP Office Sealed: अमरावतीचं खासदार कार्यालय पुन्हा एकदा सील. खासदार अनिल बोंडेंचाही कार्यालयावर दावा. तर यशोमती ठाकुरांवर गुन्हा दाखल.

Amravati News: अमरावती : अमरावती खासदार कार्यालय (Amravati MP Office) कुलूप तोड प्रकरण आता चांगलंच तापल्याचं दिसत आहे. याप्रकरणी 15 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून यात आमदार यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) यांच्यासह नवनिर्वाचित खासदार बळवंत वानखडे (Balwant Wankhede) यांचाही समावेश आहे. दरम्यान, काँग्रेसनं ताब्यात घेतलेलं अमरावती खासदार कार्यालय आता जिल्हाधिकाऱ्यांकडून पुन्हा सील करण्यात आलं आहे. आता पुन्हा कार्यालय सील केल्यानं पुन्हा वाद होण्याची शक्यता आहे. 

अमरावतीमध्ये भाजप विरुद्ध काँग्रेस आमने-सामने आल्याचं बघायला मिळालं आहे. त्यासाठी कारण ठरलंय, अमरावती जिल्ह्यातील खासदार कार्यालय. अमरावती जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात खासदारांसाठी शासकीय कार्यालय आहे. त्यामुळे लोकसभेचे खासदार बळवंत वानखडे यांना खासदार कार्यालयाचा ताबा द्यावा, असं वारंवार सांगण्यात आलं होतं. पण विजयाच्या 17 दिवसानंतर सुद्धा खासदार कार्यालयाचा ताबा नवनिर्वाचित खासदार बळवंत वानखडे यांना देत नसल्यानं अमरावतीत काँग्रेस चांगलीच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. यशोमती ठाकूर आणि बळवंत वानखेडे यांनी थेट खासदार कार्यालय गाठून कार्यालयाचं कुलूप तोडलं आणि खासदार कार्यालयाचा ताबा घेतला. याचप्रकरणी काँग्रेस आमदार यशोमती ठाकूर आणि नवनिर्वाचित खासदार बळवंत वानखेडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

बळवंत वानखडे, यशोमती ठाकूर यांच्यावर गुन्हा दाखल

नवनिर्वाचित खासदार बळवंत वानखडे, आमदार यशोमती ठाकूर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमरावती खासदार कार्यालय कुलूप तोड प्रकरणी आतापर्यंत 15 जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अमरावती जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील खासदारांच्या कार्यालयाचं कुलूप तोडून ते ताब्यात घेतल्याबद्दल आंदोलकावर भारतीय दंड संहिता 1860 नुसार कलम 143, 149, 427, 135 गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये खासदार बळवंत वानखडे, आमदार यशोमती ठाकूर, बबलू शेखावत, विलास इंगोले, प्रवीण मनोहर, हरीश मोरे, वैभव वानखडे, योगेश वानखडे, यांच्यासह आणखी 10 काँग्रेस कार्यकर्ते यांचा समावेश आहे. 

नेमकं काय घडलं? 

लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर अमरावतीत नवनीत राणा यांचा काँग्रेसचे बळवंत वानखडे यांनी दारुण पराभव करत मोठा विजय मिळाला. त्यानंतर 13 जून रोजी वळवंत वानखेडे यांनी खासदार कार्यालयात देण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती. त्यानंतर पराभूत उमेदवार आणि माजी खासदार नवनीत राणा यांनी 19 तारखेला जिल्हाधिकारी कार्यालयात असलेल्या कार्यालयाचा ताबा जिल्हाधिकारी कार्यालयाला सोपवला. त्याच दिवशी भाजपचे राज्यसभेचे खासदार अनिल बोंडे यांनी अमरावती खासदार कार्यालय देण्याची मागणी केली. अशातच जिल्हाधिकारी कार्यालयानं खासदार कार्यालय अद्याप कोणालाही दिलेलं नसल्यानं काँग्रेसनं कुलूप तोडून ताबा घेतला होता. 

यशोमती ठाकूर आक्रमक 

यशोमती ठाकूर, बळवंत वानखडे यांनी शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील खासदार कार्यालय कुलूप तोडून काल ताब्यात घेतलं होतं. यावेळी यशोमती ठाकूर चांगल्याच आक्रमक झाल्या होत्या. याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून जिल्हाधिकाऱ्यांनी कार्यालय पुन्हा सील केलं आहे. 

कार्यालय बळवंत वानखेडेंना देण्याची नवनीत राणांची पत्रातून विनंती 

खासदार कार्यालय परत करत असल्याचं नवनीत राणा यांनी पत्र लिहून जिल्हाधिकाऱ्यांना कळवलं होतं. तसेच, कार्यालय काँग्रेसचे नवनिर्वाचित खासदार बळवंत वानखेडेंना देण्याती मागणी केली होती. नवनीत राणा जिल्हाधिकाऱ्यांना लिहिलेल्या पत्रात म्हणालेल्या की, "मी सर्वप्रथम अमरावती जिल्ह्याचे नवनिर्वाचित खासदार मा.श्री. बळवंतरावजी वानखडे यांचे विजयाबद्दल अभिनंदन करते आणि पुढील जिल्हयाच्या यशस्वी विकास कामासाठी शुभेच्छा देते जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात असलेले खासदार जनसंपर्क कार्यालय हे जिल्हयातील शेतकरी, शेतमजूर आणि सर्व सामान्य जनतेच्या कामाकरीता होते. त्यामुळे भविष्यातही नवनिर्वाचित खासदाराच्या जनसंपर्क कार्यालयातून सर्व सामान्य जनतेची आणि शेतकऱ्यांची कामं व्हावी या अपेक्षेसह खासदार जनसंपर्क कार्यालयाची चावी मी या पत्रासोबत आपल्याकडे सुपूर्त करत आहे. कृपया आपल्या माध्यमातून खासदार बळवंत वानखडे यांना ही चावी सुपूर्त करावी, ही विनंती करते. आपल्या सहकार्याची अपेक्षा."

पाहा व्हिडीओ : Amravati MP Office : नवनिर्वाचित खासदार बळवंत वानखडे , यशोमती ठाकूर यांच्यावर गुन्हा दाखल

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

बारामतीत कार्यकर्त्यांत जुंपली; आरोप फेटाळत अजित पवार म्हणाले, माझ्याही पोलिंग एजंटला बाहेर काढलं
बारामतीत कार्यकर्त्यांत जुंपली; आरोप फेटाळत अजित पवार म्हणाले, माझ्याही पोलिंग एजंटला बाहेर काढलं
Praniti Shinde : प्रणिती शिंदे भाजपच्या बी टीम, भाजपसोबत हातमिळवणी केली, शिंदे कुटुंबाने केसाने गळा कापला; ठाकरे गटाचा सडकून प्रहार
प्रणिती शिंदे भाजपच्या बी टीम, भाजपसोबत हातमिळवणी केली, शिंदे कुटुंबाने केसाने गळा कापला; ठाकरे गटाचा सडकून प्रहार
Suhas Kande vs Sameer Bhujbal : आधी म्हणाले, आज तुझा म#$ फिक्स, आता सुहास कांदे म्हणतात, 'मी समीरभाऊंचं नाव घेऊन धमकी दिली नव्हती'
आधी म्हणाले, आज तुझा म#$ फिक्स, आता सुहास कांदे म्हणतात, 'मी समीरभाऊंचं नाव घेऊन धमकी दिली नव्हती'
Narayan Rane on Vinod Tawde: विनोद तावडेंबाबत नारायण राणेंचं महत्त्वाचं वक्तव्य, म्हणाले, 'त्यांना दिलेली वागणूक मला आवडली नाही'
विनोद तावडेंबाबत नारायण राणेंचं महत्त्वाचं वक्तव्य, म्हणाले, 'त्यांना दिलेली वागणूक मला आवडली नाही'
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

CM Eknath Shinde : महाराष्ट्राला उज्ज्वल भवितव्याकडे नेणारा उत्सव;सर्व मतदारांनी सहभागी व्हा - शिंदेSanjay Raut Vidhan Sabha Election : मिंधे गटाने पैसे वाटपासाठी खास माणसं ठेवली - संजय राऊतDevendra Fadnavis On Vidhan Sabha : यंदा महिला मतदार गॅप भरु काढतील; फडणवीसांचं महत्त्वाचं वक्तव्यSharad Pawar Vidhan Sabha Election 2024 : महाराष्ट्राचं भवितव्य नागरिकांच्या मतांमध्ये - शरद पवार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बारामतीत कार्यकर्त्यांत जुंपली; आरोप फेटाळत अजित पवार म्हणाले, माझ्याही पोलिंग एजंटला बाहेर काढलं
बारामतीत कार्यकर्त्यांत जुंपली; आरोप फेटाळत अजित पवार म्हणाले, माझ्याही पोलिंग एजंटला बाहेर काढलं
Praniti Shinde : प्रणिती शिंदे भाजपच्या बी टीम, भाजपसोबत हातमिळवणी केली, शिंदे कुटुंबाने केसाने गळा कापला; ठाकरे गटाचा सडकून प्रहार
प्रणिती शिंदे भाजपच्या बी टीम, भाजपसोबत हातमिळवणी केली, शिंदे कुटुंबाने केसाने गळा कापला; ठाकरे गटाचा सडकून प्रहार
Suhas Kande vs Sameer Bhujbal : आधी म्हणाले, आज तुझा म#$ फिक्स, आता सुहास कांदे म्हणतात, 'मी समीरभाऊंचं नाव घेऊन धमकी दिली नव्हती'
आधी म्हणाले, आज तुझा म#$ फिक्स, आता सुहास कांदे म्हणतात, 'मी समीरभाऊंचं नाव घेऊन धमकी दिली नव्हती'
Narayan Rane on Vinod Tawde: विनोद तावडेंबाबत नारायण राणेंचं महत्त्वाचं वक्तव्य, म्हणाले, 'त्यांना दिलेली वागणूक मला आवडली नाही'
विनोद तावडेंबाबत नारायण राणेंचं महत्त्वाचं वक्तव्य, म्हणाले, 'त्यांना दिलेली वागणूक मला आवडली नाही'
Jharkhand Election 2024 : मतदान करायला लागतंय! महाराष्ट्राच्या तुलनेत झारखंमध्ये मतदानाची टक्केवारी सुसाट, पहिल्या चार तासातच मतदारांचा जोर
मतदान करायला लागतंय! महाराष्ट्राच्या तुलनेत झारखंमध्ये मतदानाची टक्केवारी सुसाट, पहिल्या चार तासातच मतदारांचा जोर
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: मुंबईत मतदानाचा पॅटर्न बदलणार, मलबार हिल आणि भांडूपमध्ये सर्वाधिक मतदान, वरळी-माहीममध्ये काय स्थिती?
मुंबईत मतदानाचा पॅटर्न बदलणार, मलबार हिल आणि भांडूपमध्ये सर्वाधिक मतदान, वरळी-माहीममध्ये काय स्थिती?
Exit poll: मतदानानंतरचा एक्झिट पोल कधी अन् कुठं पाहाल? राज्यात महायुती की महाविकास आघाडी, कुणाला कौल
मतदानानंतरचा एक्झिट पोल कधी अन् कुठं पाहाल? राज्यात महायुती की महाविकास आघाडी, कुणाला कौल
Kolhapur District Assembly Constituency : कोल्हापूर जिल्ह्यात पहिल्या चार तासात करवीर अन् राधानगरीत मतदानाचा वेग वाढला; दक्षिण,उत्तर अन् कागलमध्ये काय घडतंय?
कोल्हापूर जिल्ह्यात पहिल्या चार तासात करवीर अन् राधानगरीत मतदानाचा वेग वाढला; दक्षिण,उत्तर अन् कागलमध्ये काय घडतंय?
Embed widget