एक्स्प्लोर

Bachchu Kadu On BJP : भाजपने वापरुन घेण्याची भाषा करु नये, आम्ही तटस्थ, निर्णय झाला तर ठीक नाहीतर गेम करू; बच्चू कडूंचा इशारा 

Bachchu Kadu : अमरावती येथील महायुतीच्या लोकसभा निहाय बैठकीला आपण मुद्दाम जाणार नसल्याचे बच्चू कडू यांनी स्पष्ट केले. तसेच भाजपला थेट इशारा देखील त्यांनी यावेळी दिला आहे.

Bachchu Kadu अमरावती : देशभरात लोकसभा निवडणुकांचे (Lok Sabha Elections) वारे वाहू लागले आहेत. लोकसभा निवडणुका जाहीर होण्यास काही महिन्यांचा अवधी शिल्लक असतांना राजकीय पक्षांनी, आघाड्यांनी मोर्चेबांधणी करण्यास सुरुवात केली आहे. अशातच प्रहार जनशक्‍ती पक्षाचे सर्वेसर्वा बच्चू कडू आणि भाजपमध्ये पुन्हा एकदा कलगीतुरे रंगल्याचे समोर आले आहे. रविवारी अमरावती (Amravati) येथे आयोजित महायुतीच्या लोकसभा निहाय बैठकीला आपण मुद्दाम जाणार नसल्याचे आमदार बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी स्पष्ट करत भाजपला इशारा दिला.

भाजपने वापरुन घेण्याची भाषा करु नये. भाजपला लोकसभा निवडणूक जितकी महत्त्वाची आहे, तेवढीच आम्हाला विधानसभा महत्त्वाची आहे. त्यांनी लोकसभेचा विचार करावा. परंतु, आमच्या डोक्यात विधानसभा आहे. त्यामुळे विधानसभेचं चित्र स्पष्ट होत नाही तोवर आमची भूमिका तटस्थ राहील. काही काळ आम्ही वाट पाहू, मात्र त्यातून काही निर्णय झाला नाही तर, मग आम्ही गेम करू, असा इशाराच बच्चू कडूंनी भाजपला दिला आहे. 

बैठकीला जाणार नाही - बच्चू कडू

गेल्या काही दिवसांपासून प्रहार जनशक्‍ती पक्षाचे सर्वेसर्वा बच्चू कडू हे नाराज असल्याचे चित्र आहे. दरम्यान त्यांनी भाजपवर वेळोवेळी टीका करत आपली नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजप सोबतच्या मित्रपक्षांमध्ये काहीसे बिनसले आल्याच्या चर्चा रंगत आहे. अशातच बच्चू कडू यांनी पुन्हा आपली नाराजी व्यक्त करत भाजपला थेट इशारा दिला आहे. भारतीय जनता पार्टी सध्या राज्यातील सर्व लोकसभा मतदारसंघात मतदारसंघनिहाय बैठका घेत आहे. त्या पार्श्वभूमीवर रविवारी 14 जानेवारीला अमरावतीत देखील बैठक बोलावण्यात आली. या बैठकीला भाजपाने सर्वच मित्रपक्षांच्या नेत्यांना आणि पदाधिकाऱ्यांना बोलावलं आहे. परंतु, बच्चू कडू यांनी आपण या बैठकीला जाणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. 

कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर

महाराष्ट्रामध्ये आमच्या  200 ते 300 ग्रामपंचायत, नगरपंचायत आहे. त्याला निधी मिळाला नाही, त्यामुळे कार्यकर्त्यांचा नाराजीचा सूर आहे. कुठल्याही पक्षात कार्यकर्ता महत्वाचा आहे. त्याशिवाय कोणत्याही पक्षाचे काम होऊ शकत नाही. आम्हाला संपूर्ण राज्यभरातल्या जिल्हाप्रमुखांचे फोन येत आहेत. आम्ही नेहमीच युतीसाठी प्रयत्न केला आहे. त्यामुळे आता विधानसभेबाबत भाजपा काय निर्णय घेणार, हे आधी स्पष्ट केले पाहिजे.

5 फेब्रुवारीला महाराष्ट्रातील प्रमुख कार्यकर्त्यांची आम्ही बैठक घेणार आहोत. त्यामध्ये आम्ही निर्णय जाहीर करू. त्याआधी भाजपाने आमच्यासोबत जे युतीपक्ष म्हणून आम्ही सोबत आहोत, त्यावर चर्चा करावी आणि त्यांनी आम्हाला स्पष्ट सांगावं, तर आम्ही बैठकीला जाऊ नाही तर जाणार नसल्याचे आमदार बच्चू कडू म्हणाले.

हेही वाचा : 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ED Raids : काँग्रेसच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या मुलाच्या 15 ठिकाणांवर एकाचवेळी ईडीची छापेमारी
काँग्रेसच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या मुलाच्या 15 ठिकाणांवर एकाचवेळी ईडीची छापेमारी
मंत्री जयकुमार गोरेंविरोधात एकतर्फी बातम्यातून बदनामी केल्याचा ठपका; 'लय भारी'यूट्यूब चॅनलच्या पत्रकाराला बेड्या  
मंत्री जयकुमार गोरेंविरोधात एकतर्फी बातम्यातून बदनामी केल्याचा ठपका; 'लय भारी' यूट्यूब चॅनलचे पत्रकार तुषार खरात पोलिसांच्या ताब्यात
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाचा दिवस, 1500 रुपयांचा हप्ता 2100 रुपये होणार का? अर्थसंकल्पाकडे साऱ्यांच्या नजरा
लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाचा दिवस, 1500 रुपयांचा हप्ता 2100 रुपये होणार का? मंत्री ते मुख्यमंत्री कोण काय म्हणालं?
Champions Trophy : चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकणाऱ्या टीममधील खेळाडूंना फक्त व्हाईट ब्लेझर का दिलं जातं? काय आहे नेमका इतिहास??
चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकणाऱ्या टीममधील खेळाडूंना फक्त व्हाईट ब्लेझर का दिलं जातं? काय आहे नेमका इतिहास??
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 09.00 AM TOP Headlines 09.00 AM 10 March 2025TOP 80 | टॉप 80 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर वेगवान ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 08.00 AM TOP Headlines 08.00 AM 10 March 2025ABP Majha Marathi News Headlines 07.00 AM TOP Headlines 07.00 AM 10 March 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ED Raids : काँग्रेसच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या मुलाच्या 15 ठिकाणांवर एकाचवेळी ईडीची छापेमारी
काँग्रेसच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या मुलाच्या 15 ठिकाणांवर एकाचवेळी ईडीची छापेमारी
मंत्री जयकुमार गोरेंविरोधात एकतर्फी बातम्यातून बदनामी केल्याचा ठपका; 'लय भारी'यूट्यूब चॅनलच्या पत्रकाराला बेड्या  
मंत्री जयकुमार गोरेंविरोधात एकतर्फी बातम्यातून बदनामी केल्याचा ठपका; 'लय भारी' यूट्यूब चॅनलचे पत्रकार तुषार खरात पोलिसांच्या ताब्यात
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाचा दिवस, 1500 रुपयांचा हप्ता 2100 रुपये होणार का? अर्थसंकल्पाकडे साऱ्यांच्या नजरा
लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाचा दिवस, 1500 रुपयांचा हप्ता 2100 रुपये होणार का? मंत्री ते मुख्यमंत्री कोण काय म्हणालं?
Champions Trophy : चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकणाऱ्या टीममधील खेळाडूंना फक्त व्हाईट ब्लेझर का दिलं जातं? काय आहे नेमका इतिहास??
चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकणाऱ्या टीममधील खेळाडूंना फक्त व्हाईट ब्लेझर का दिलं जातं? काय आहे नेमका इतिहास??
Sunil Gavaskar Dance Video : असा 'लिटील मास्टर' डान्स होणे नाही! टीम इंडिया जिंकताच सुनील गावसकरांचं थेट मैदानात भन्नाट सेलिब्रेशन, राॅबिन उथप्पा पाहतच राहिला!
असा 'लिटील मास्टर' डान्स होणे नाही! टीम इंडिया जिंकताच सुनील गावसकरांचं थेट मैदानात भन्नाट सेलिब्रेशन, राॅबिन उथप्पा पाहतच राहिला!
Ind vs NZ Champions trophy 2025: न्यूझीलंडने सगळी अस्त्रं वापरली, हवेत उडून फिल्डिंग, टिच्चून बॉलिंग, क्षेत्ररक्षणाची अभेद्य तटबंदी; पण टीम इंडियाच्या वाघांनी चॅम्पियन्स ट्रॉफीची फायनल जिंकलीच
एक मावळा पडताच दुसरा खंबीरपणे उभा राहिला, इंच इंच लढून टीम इंडियाच्या वाघांनी गड फत्ते केला
लाडक्या बहिणींना 2100 रुपये, शेतकऱ्यांना कर्जमाफी, नमो शेतकरी महासन्मानच्या रकमेत वाढ, महायुती सरकार आश्वासन पूर्ण करणार? अर्थसंकल्पाकडे राज्याचं लक्ष
लाडक्या बहिणींना 2100 रुपये ते शेतकऱ्यांची कर्जमाफी, महायुती सरकार निवडणुकीतील आश्वासनं अर्थसंकल्पात पूर्ण करणार का?
Weekly Horoscope 10 To 16 March 2025: मार्चचा दुसरा आठवडा 'या' राशींसाठी राहील खास! कोणाला घ्यावी लागेल विशेष काळजी? वाचा 12 राशींच साप्ताहिक राशीभविष्य
मार्चचा दुसरा आठवडा 'या' राशींसाठी राहील खास! नोकरी, प्रेम आरोग्य, कोणाला घ्यावी लागेल विशेष काळजी? वाचा 12 राशींच साप्ताहिक राशीभविष्य
Embed widget