दोन महिन्यापूर्वी घर आगीत भस्मसात... आज मिळाला हक्काचा निवारा, यशोमती ठाकुर यांनी वचनपूर्ती
Amravati Fire : दोन महिन्यापूर्वी, आग लागून तीन कुटुंबीयांना बेघर व्हावं लागलं होतं, आज त्यांना त्यांच्या हक्काचा निवारा मिळाला.
अमरावती: जिल्ह्यातील सालोरा खुर्द इथं एका महिन्यापूर्वी काही घरांना आग लागली होती अन् सुखाने सुरू असलेला संसार उघड्यावर आला. या घटनेची दखल माजी मंत्री आणि आमदार यशोमती ठाकुर यांनी घेतली आणि आगीत भस्मसात झालेली घरं नव्याने बांधून देण्याचं वचन दिलं. यशोमती ठाकुर यांनी दिलेलं हे वचन पाळलं आणि नवीन बांधलेल्या घरात तीन कुटुंबांचा गृहप्रवेश झाला. नव्यानं बांधलेल्या घरात प्रवेश करताना या तिन्ही कुटुंबातील सदस्यांच्या चेहऱ्यावरील आनंद स्पष्ट दिसत होता. त्यामुळे हा दिवस त्या कुटुंबांसाठी 'आनंदाचे डोही आनंद तरंग' असा अविस्मरणीय ठरला.
दोन महिन्यांपूर्वी, 27 फेब्रुवारी रोजी अमरावती तालुक्यातील सालोरा खुर्द इथ गॅस सिलेंडरचा स्फोट होवून आग लागली आणि या आगीत योगीता इंगळे, प्रमोद भस्मे, शोभा सहारे या तीन महिलांची घरे पूर्णपणे जळून खाक झाली. यावेळी या घटनेची माहिती मिळताच आमदार यशोमती ठाकूर यांनी पाणीपुरवठा बैठकीतून थेट घटनास्थळ गाठून नुकसानाची पाहणी केली. तसेच नुकसानग्रस्तांना मदत करण्याचे वचन दिले होते.
अमरावती तालुक्यातील सालोरा खुर्द येथे 27 फेब्रुवारी रोजी गॅस सिलिंडरचा स्फ़ोट होऊन तीन घरांना भीषण आग लागली.या आगीत तीन घर पूर्णपणे आगीच्या भक्षस्थानी पडली. नुकसानग्रस्त योगिता इंगळे, प्रमोद भस्मे, शोभा सहारे यांना दिलासा दिला,या सर्व कुटुंबांचं खूप नुकसान झालेलं होतं. pic.twitter.com/PWDGFWO0zy
— Adv. Yashomati Thakur (@AdvYashomatiINC) March 27, 2023
आता अवघ्या एक महिन्यात या तीनही कुटुंबीयांना आमदार यशोमती ठाकूर यांनी राहण्यासाठी घरं बांधून दिली. त्याचा गृहप्रवेश आज पार पडला. आकस्मिक आपत्तीमुळे बेघर झालेल्या या तीनही कुटुंबीयांना आता हक्काची घर मिळाली आहेत. त्यामुळे हवालदिल झालेल्या कुटुंबीयांना चांगलाच दिलासा मिळाला. गृहप्रवेशाच्या वेळी सर्वच कुटुंबातील सदस्य भावूक झाले होते. संकटामुळे डोळ्यात आलेल्या अश्रूची आज फुले झालीत.
घर बांधून देणं ही सामाजिक बांधिलकी : यशोमती ठाकूर
यावेळी आमदार यशोमती ठाकूर म्हणाल्या की, मी तुम्हाला नवीन घर बांधून देईन असं वचन दिलं होतं. आज मी त्याची पूर्तता करते. हा विलक्षण अनुभव मी शब्दात व्यक्त करु शकत नाही. या कुटुंबीयांना घरं बांधून देणं ही माझी सामाजिक बांधिलकी होती अशी भावनिक प्रतिक्रिया त्यांनी यावेळी बोलतांना व्यक्त केली.
ही बातमी वाचा: