एक्स्प्लोर

निवडणूक २०२४ एक्झिट पोल

(Source:  Dainik Bhaskar)

Amravati Crime : बहिणीच्या प्रियकराला दारु पाजून रेल्वे ट्रॅकवर फेकले, दोन्ही पाय कापल्याने तरुण गंभीर जखमी

Amravati Crime : बहिणीसोबत असलेल्या प्रेमसंबंधाचा राग मनात धरुन तरुणाने मित्रांच्या मदतीने प्रियकराला दारु पाजून रेल्वे रुळावर फेकून दिलं. या घटनेत रेल्वे अंगावरुन जाऊन गुडघ्याखालील पाय कापल्याने बहिणीचा प्रियकर गंभीर जखमी झाला आहे.

Amravati Crime : बहिणीसोबत असलेल्या प्रेमसंबंधाचा राग मनात धरुन तरुणाने मित्रांच्या मदतीने प्रियकराला (Boyfriend) दारु पाजून रेल्वे रुळावर फेकून दिलं. या घटनेत रेल्वे अंगावरुन जाऊन गुडघ्याखालील पाय कापल्याने बहिणीचा प्रियकर गंभीर जखमी झाला आहे. अमरावती (Amravati) जिल्ह्यातील चांदूर रेल्वे (Chandur Railway) शहरालगत असलेल्या राजना रोडवरील रेल्वे ट्रॅकवर (Railway Track) सोमवारी (5 जून) मध्यरात्रीच्या दरम्यान ही धक्कादायक घटना घडली. या प्रकरणी पोलिसांनी अवघ्या दोन तासात दोन आरोपींना अटक केली तर एका आरोपीचा शोध सुरु आहे.
   
अजय पुंडलिकराव ठोंबरे (वय 27 वर्षे) असं जखमी तरुणाचं नाव आहे. त्याच्यावर नागपूरमधील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर रोहन वासुदेव यादव (वय 22 वर्ष), गणेश बाबाराव मोरे (वय 23 वर्ष) आणि धनंजय उर्फ सोनू विजय बाबर (वय 24 वर्ष) (सर्व रा. शिवाजी नगर, चांदूर रेल्वे) अशी आरोपींची नावे आहेत. यापैकी रोहन यादव हा आरोपी पसार झाला आहे.

आधी दारु पाजून लाथाबुक्क्यांनी मारहाण, मग रेल्वे रुळावर फेकलं

जखमी अजय ठोंबरे याचे एका आरोपीच्या बहिणीसोबत प्रेमसंबंध आहेत. परंतु हे प्रेमसंबंध आरोपीला मान्य नव्हते. याचा राग मनात धरुन त्या आरोपीने इतर दोन आरोपींसोबत संगणमत करुन अजय ठोंबरले शिवाजी पार्क, चांदूर रेल्वे इथे बोलावून दारु पाजली आणि त्याला लाथाबुक्याने मारहाण केली. यानंतर अजय ठोंबरे हा बेशुद्ध झाल्यानंतर तिन्ही आरोपींनी त्याला जीवे मारण्याच्या उद्देशाने जवळच असलेल्या रेल्वे रुळावर फेकले. रेल्वे ट्रॅकवर पडलेल्या अजयचे गुडघ्याखालील पाय रेल्वेमुळे कापल्याने तो गंभीर जखमी झाला.

दोन तासात दोन आरोपींना बेड्या, तिसऱ्याचा शोध सुरु

हा युवक जखमी अवस्थेत पडलेला असल्याचं बकऱ्या चारणाऱ्याला मंगळवारी सकाळी दिसला. याची माहिती चांदूर रेल्वे पोलिसांना देण्यात आली. यानंतर जखमी तरुणाला पुढील उपचारासाठी नागपूरमधील रुग्णालयात रेफर करण्यात आले. चांदूर रेल्वे पोलिसांनी या प्रकरणाची खोलात जाऊन चौकशी केली आणि वेगाने तपास चक्रे फिरवली. अवघ्या दोन तासात आरोपी गणेश मोरे आणि धनंजय उर्फ सोनू बाबर या दोघांना ताब्यात घेतलं. या दोन्ही आरोपींनी संबंधित गुन्ह्याच्या कबुली दिली आणि संपूर्ण माहिती पोलिसांना सांगितली. तर याची तिसरा आरोपी पसार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

हेही वाचा

Amravati Crime News: अल्पवयीन मुलीला आमिष दाखवून राज्यस्थानमध्ये विकलं, मात्र एका निर्णयामुळे ती वाचली...

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

गुहेतून सापडला 188 वर्षांचा वृद्ध? कोणी म्हणतंय सियाराम बाबा तर कोणी म्हणतंय खोटारडेपणा, नक्की प्रकार काय?
गुहेतून सापडला 188 वर्षांचा वृद्ध? कोणी म्हणतंय सियाराम बाबा तर कोणी म्हणतंय खोटारडेपणा, नक्की प्रकार काय?
Bacchu Kadu : आमदार राजकुमार पटेल प्रहारची साथ सोडणार? ग्राफिक्सवरुन बच्चू कडूंचं नाव अन् फोटो गायब, सत्ताधारी पक्षात जाण्याचे संकेत
बच्चू कडूंना मोठा धक्का, प्रहारचे आमदार राजकुमार पटेल पक्ष सोडणार? पोस्टरमधून मोठे संकेत
वेटरच्या नोकरीसाठी कॅनडात भारतीय तरुणांनी लावल्या रांगा, परदेशातील भीषण वास्तव
वेटरच्या नोकरीसाठी कॅनडात भारतीय तरुणांनी लावल्या रांगा, परदेशातील भीषण वास्तव
Rajeev Patil: हितेंद्र ठाकूरांच्या बविआला खिंडार पडणार? राजीव पाटील भाजपच्या तिकीटावर विधानसभा लढण्याची शक्यता
हितेंद्र ठाकूरांच्या बविआला खिंडार पडणार? राजीव पाटील भाजपच्या तिकीटावर विधानसभा लढण्याची शक्यता
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Nitin Gadkari Nagpur Bus : विमानासारख्या सुविधा बसमध्ये मिळणार, गडकरींनी सांगितलेली बस नेमकी कशी?एबीपी माझा हेडलाईन्स : Abp Majha Headlines : 07 AM 04 October 2024NIA Action Special Report :  NIAच्या महाराष्ट्रातील कारवाईचा ग्राऊंड झिरो रिपोर्ट एबीपी माझावरRangnath Pathare Majha Katta | अभिजात मराठी भाषा समितीचे अध्यक्ष  रंगनाथ पठारे माझा कट्टावर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
गुहेतून सापडला 188 वर्षांचा वृद्ध? कोणी म्हणतंय सियाराम बाबा तर कोणी म्हणतंय खोटारडेपणा, नक्की प्रकार काय?
गुहेतून सापडला 188 वर्षांचा वृद्ध? कोणी म्हणतंय सियाराम बाबा तर कोणी म्हणतंय खोटारडेपणा, नक्की प्रकार काय?
Bacchu Kadu : आमदार राजकुमार पटेल प्रहारची साथ सोडणार? ग्राफिक्सवरुन बच्चू कडूंचं नाव अन् फोटो गायब, सत्ताधारी पक्षात जाण्याचे संकेत
बच्चू कडूंना मोठा धक्का, प्रहारचे आमदार राजकुमार पटेल पक्ष सोडणार? पोस्टरमधून मोठे संकेत
वेटरच्या नोकरीसाठी कॅनडात भारतीय तरुणांनी लावल्या रांगा, परदेशातील भीषण वास्तव
वेटरच्या नोकरीसाठी कॅनडात भारतीय तरुणांनी लावल्या रांगा, परदेशातील भीषण वास्तव
Rajeev Patil: हितेंद्र ठाकूरांच्या बविआला खिंडार पडणार? राजीव पाटील भाजपच्या तिकीटावर विधानसभा लढण्याची शक्यता
हितेंद्र ठाकूरांच्या बविआला खिंडार पडणार? राजीव पाटील भाजपच्या तिकीटावर विधानसभा लढण्याची शक्यता
सोशल मीडियावर नंबर वन पण कामात...  या महिला अधिकाऱ्याच्या बदलीची देशभरात चर्चा
सोशल मीडियावर नंबर वन पण कामात... या महिला अधिकाऱ्याच्या बदलीची देशभरात चर्चा
अकोल्यात दोघा बहि‍णींना फेकल्याच्या संशयाने खळबळ, नदी पात्रात शोध मोहिम सुरु
अकोल्यात दोघा बहि‍णींना फेकल्याच्या संशयाने खळबळ, नदी पात्रात शोध मोहिम सुरु
लातूरमध्ये शासकीय वस्तीगृहातील मुलींना भोजनातून विषबाधा, उपचार सुरु, प्रकृती धोक्याबाहेर
लातूरमध्ये शासकीय वस्तीगृहातील मुलींना भोजनातून विषबाधा, उपचार सुरु, प्रकृती धोक्याबाहेर
Nitin Gadkari : नागपूरमध्ये विमानासारख्या सोयी असलेली बस सेवा, काय काय उपलब्ध असणार? नितीन गडकरींचं नवीन स्वप्न
नागपूरमध्ये विमानासारख्या सोयी असलेली बस सेवा, काय काय उपलब्ध असणार? नितीन गडकरींचं नवीन स्वप्न
Embed widget